सनातन संस्थेचे कार्य संन्यस्तपदाकडे जाण्याचे आहे ! – महामंडलेश्‍वर परशुरामगिरी महाराज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांनाराजस्थान येथील महामंडलेश्वर परशुरामगिरी महाराज यांनी भेट दिली.

सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण प्रदर्शनातून समाजपरिवर्तन होणार ! – महामंडलेश्‍वर प.पू. रामभूषणदास महाराज

प्रदर्शनात दाखवण्यात आलेले विषय ही वास्तविकता आहे. हिंदु समाजाने हे प्रदर्शन पाहून त्यानुसार कार्य केले, तर समाजात परिवर्तन होईल. कोणी हिंदू ख्रिस्ती पंथ स्वीकारणार नाहीत

‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी तरुणांना जागृत करण्याचे कार्य सनातन संस्थेच्या प्रदर्शनातून होत आहे,’ – महामुनी श्रित: महागत:, नेपाळ

राष्ट्र आणि धर्म यांसाठी तरुणांना जागृत करण्याचे कार्य सनातन संस्थेच्या प्रदर्शनातून होत आहे, असे प्रतिपादन नेपाळ येथील सिरसीमधील दक्षिणेश्वर धामाचे महामुनी श्रित: महागत: यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी प्रयागराज येथे केले.

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून सनातन वैदिक धर्माविषयी आपण सर्वांना अवगत करत आहात ! – राजगुरु पू. स्वामी श्री विशोकानंद भारती महाराज, गोविंदमठ, काशी

प्रयागराज (कुंभनगरी) येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला काशी येथील गोविंदमठाचे निर्वाणी पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर राजगुरु पू. स्वामी श्री विशोकानंद भारती महाराज यांनी भेट दिली.

“कुंभमेळ्यामध्ये सनातनचे प्रदर्शन हे वास्तवत: ‘सनातन’चे दर्शन घडवत आहे. “- आनंद प्रकाश ब्रह्मचारी महाराज, हरिद्वार

शालेय शिक्षणातून धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उत्तराखंडच्या हरिद्वार येथील आनंद प्रकाश ब्रह्मचारी महाराज यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

सनातनचे ग्रंथप्रदर्शन शाळा आणि महाविद्यालये येथे लावले पाहिजे ! – स्वामी रामरसिकदास महाराज, अयोध्या

सर्व नागरिक आणि मुले यांना आध्यात्मिक ग्रंथांची माहिती होण्यासाठी सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय शिक्षणप्रद अन् बोधप्रद आहे. हे प्रदर्शन शाळा आणि महाविद्यालये येथे अवश्य लावले पाहिजे, असे प्रतिपादन स्वामी रामरसिकदास महाराज यांनी काढले.

धर्मापासून दूर गेलेल्या तरुण पिढीला धर्माच्या मार्गावर आणण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे ! – शनि महाराज, सातारा

सनातनचे कार्य हिंदु राष्ट्र निर्माण करण्याचे आहे. यामुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे. जिहादी लोक आपल्या मुलींना पळवून नेत आहेत, त्यांना प्रतिबंध करण्याचे काम सनातन करत आहे.

सनातन संस्थेचे कार्य उत्कृष्ट आहे ! – श्री रमेशगिरी महाराज, जनार्दन आश्रम, कोपरगाव

सनातन संस्थेचे कार्य उत्कृष्ट आहे, हे प्रदर्शन पाहिल्यानंतर लक्षात येते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जागृती होईल, अशी मी अपेक्षा करतो, असे प्रतिपादन कोपरगाव (महाराष्ट्र) येथील जनार्दन आश्रमाचे श्री रमेशगिरी महाराज यांनी केले.

धर्मशिक्षण प्रदर्शनातून हिंदु धर्माचे संवर्धन होण्यास साहाय्य होणार आहे ! – महामंडलेश्‍वर श्री गणेशानंदगिरी महाराज

धर्मशिक्षण प्रदर्शनातून हिंदु धर्माचे संवर्धन होण्यास साहाय्य होणार आहे, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्‍वर येथील महामंडलेश्‍वर श्री गणेशानंदगिरी महाराज यांनी ३० जानेवारी या दिवशी येथे केले.

सनातनचे ग्रंथप्रदर्शन सर्वत्र लावल्यास देशात धर्माचा अधिक प्रचार होईल ! – श्री स्वामी सत्यप्रसाददासजी महाराज, श्री स्वामीनारायण संप्रदाय, गुजरात

श्री स्वामी सत्यप्रसाददासजी महाराज हे श्री रामानुज वैष्णव परंपरेतील श्री स्वामी नारायण संप्रदायाचे आहेत. १ फेब्रुवारी या दिवशी कुंभनगरीतील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षण प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली.