रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला ह.भ.प. संजय कोटणीस यांची सहपरिवार सदिच्छा भेट

सांगली येथील संत प.पू. गुरुनाथ कोटणीस महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव ह.भ.प. संजय कोटणीस, कनिष्ठ चिरंजीव श्री. धनंजय कोटणीस आणि कुटुंबीय यांनी ४ मे २०१९ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

मुंबईतील प्रतिष्ठित ज्योतिषी कनुभाई शास्त्री यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

बोरीवली येथील प्रतिष्ठित ज्योतिषी श्री. कनुभाई शास्त्री यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

सनातनच्या प्रदर्शनस्थळी सुगंध आणि प्रसन्नता जाणवते ! – सौ. मेधा कुलकर्णी, भाजप आमदार, पुणे

कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीतील राम मंदिराच्या समोर सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला कोथरूडच्या भाजप आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी भेट दिली.

कल्याण (ठाणे) येथील ‘श्री सद्गुरु स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट मठा’चे मठाधिपती श्री. अरुण सीताराम मोडक महाराज आणि त्यांचे शिष्य यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

कल्याण (जिल्हा ठाणे) येथील ‘श्री सद्गुरु स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट मठा’चे मठाधिपती श्री. अरुण सीताराम मोडक महाराज आणि त्यांचे शिष्य यांनी १ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्योतिर्विद डॉ. मधुसूदन घाणेकर यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्योतिषी तथा पुणे येथील ज्येष्ठ ज्योतिर्विद डॉ. मधुसूदन घाणेकर (वय ६३ वर्षे) यांनी २६ मार्च या दिवशी त्यांची पत्नी सौ. मेघना घाणेकर यांनी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली

सात्त्विक शक्तीच्या आधारावर धर्मबोध आणि शौर्यबोध जागृत करण्याचे सनातन संस्थेने हाती घेतलेले कार्य पुष्कळ स्तुत्य आहे ! – के.एन्. गोविंदाचार्य, इटर्नल हिंदू फाऊंडेशन

श्री. के.एन्. गोविंदाचार्य हे ‘इटर्नल हिंदू फाऊंडेशन’च्या एका कार्यक्रमानिमित्त पनवेल येथे ११ मार्च या दिवशी आले होते. त्यानिमित्ताने त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

राष्ट्र आणि धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या सनातनसारख्या संस्थांच्या विचारांचा प्रचार आम्ही सतत करणार ! – राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीपबुवा मांडके, पुणे

देव, देश  आणि धर्म संरक्षणाचे कार्य करणार्‍या संस्थांच्या विचारांचा प्रसार आम्ही सतत करू, असे उद्गार पुणे येथील राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीपबुवा मांडके यांनी हुमरमळा, वालावल येथे कीर्तन कार्यक्रमात काढले.

गिरनार (गुजरात) येथील अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला आशीर्वाद

गिरनार (जुनागढ, गुजरात) येथील श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांची गुजरात समन्वयक श्री. संतोष आळशी, समितीचे कार्यकर्ते श्री. सुहास गरुड आणि श्री. गजानन नागपुरे यांनी भेट घेतली.

सोप्या भाषेत धर्मशिक्षण देणे, हे सनातन संस्थेचे वैशिष्ट्य आहे ! – श्री. रमाकांत गोस्वामी, वृंदावन

कुंभमेळ्यात गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे. पापांचे परिमार्जन होणे आणि पितरांना मुक्ती मिळणे, यांसाठी गंगास्नान केले जाते.

सनातनची ग्रंथसंपदा व्यक्तिमत्त्व विकासासाठी उत्कृष्ट मार्गदर्शक ! – विजय वडोदकर, सचिव, श्रीसिद्धिविनायक मंदिर, अकोला

स्थानिक जठारपेठ चौकात सनातनच्या धर्मरथाचे पूजन श्री. वडोदकर यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी धर्मरथाच्या पूजनाची संधी दिल्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.