माता अमृतानंदमयी यांच्या चेन्नई येथील आश्रमाचे स्वामी विनयांमृत चैतन्य यांनी दिले सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद !

सनातन संस्थेचे साधक श्री. जयकुमार आणि सौ. सुगंधी जयकुमार यांनी येथील माता अमृतानंदमयी आश्रमात स्वामी विनयांमृत चैतन्य यांची १ डिसेंबर या दिवशी साधकांनी भेट घेतली.

सनातन संस्थेचे साधक वानरसेनेप्रमाणे प्रभु श्रीरामाचेच कार्य करत आहेत ! – श्री श्री १०८ हनुमानदासजी महाराज टाटंबरी, उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेश येथील श्री श्री १०८ हनुमानदासजी महाराज टाटंबरी यांनी वाराणसी येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्राला नुकतीच भेट दिली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनेक महामृत्यूयोग टाळणारी संजीवनी आणि सनातन संस्थेवरील बंदीची संकटे दूर करणारे विघ्नहर्ते योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या ९८ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन परिवाराकडून त्यांच्या सुकोमल चरणी कोटी कोटी प्रणाम ! भक्तांच्या उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहिलेल्या काही मोजक्या विभूतींपैकी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे एक होत. वयाची शंभरी समीप आली असतांना आजही ते भक्तांच्या जीवनातील समस्या निवारणासाठी अहोरात्र झटत असतात. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे पूर्ण नाव आहे श्री. … Read more

संत रामदासस्वामी यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद आहेत ! – पू. कौस्तुभबुवा रामदासी

२९ सप्टेंबर या दिवशी संत वेणास्वामी मठाचे मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी हस्ते नवरात्रीच्या निमित्ताने ब्राह्मणपुरी येथील श्री अंबामाता मंदिर परिसरात लावण्यात आलेले सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनकक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

सनातन संस्थानिर्मित गणेशपूजा आणि आरती हे अ‍ॅप सर्व गणेशभक्तांनी डाऊनलोड करावे ! – महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, फैजपूर (जळगाव)

गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याविषयीचे सनातन संस्थानिर्मित गणेशपूजा आणि आरती हे अँप सर्व गणेशभक्तांनी डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्ह्यातील फैजपूर येथील महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी केले.

संन्याशी स्वामी निर्मलानंद गिरी यांची सनातन संस्थेकडून सदिच्छा भेट

वाराणसीस्थित संन्याशी स्वामी निर्मलानंद गिरी यांची मलकापूर येथील महादेव टेकडी येथे असणा-या शिव मंदिरामध्ये सनातनचे साधक वैद्य संजय गांधी यांनी सदिच्छा भेट घेऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले.

परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत आणि त्यांनी हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जाणारच आहे ! – जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश

जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश त्यांच्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच सर्व कार्य होत आहे. तेच सर्वांचे प्रेरणास्रोत आहेत. आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत.

वृंदावन येथील ब्रह्मलीन श्री नीब करौरी महाराज यांचे सुपुत्र पंडित धर्मनारायण शर्माजी यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद आणि मार्गदर्शन

२.८.२०१९ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने साधक श्री. राम होनप यांनी वृंदावन येथील ब्रह्मलीन श्री नीब करौरी महाराज यांचे सुपुत्र आदरणीय पंडित धर्मनारायण शर्माजी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.

सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी घेतली श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीदंडी स्वामी यांची सदिच्छा भेट

शक्तिपात संप्रदायाचे श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीनृसिंह आश्रय यति (श्रीदंडी स्वामी) यांनी सनातनच्या धर्मप्रसाराच्या कार्याचे कौतुक करून ‘लवकरच हिंदु राष्ट्र येणार आहे’, असा आशीर्वाद दिला.

संतांविषयी ऐकून होतो; परंतु संत निर्माण करणारी एखादी संस्था कधी पाहिली नव्हती ! – ह.भ.प.सुहासबुवा वझे

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधक संतपदापर्यंत पोचत आहेत.संतपदी विराजमान झालेल्या साधकांची संख्या ऐकून चांगले वाटले.