सुप्रसिद्ध संवादिनीवादक सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे आणि सुप्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध संवादिनीवादक (‘हार्मोनियम’वादक) सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे आणि गोव्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली.

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कु. मुग्धा वैशंपायन यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

कु. मुग्धा वैशंपायन या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातील अंतिम ५ गायकांपैकी एक आहेत.त्यांना ‘रायगड भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सनातन संस्थेमध्ये उच्चशिक्षित लोक सर्वस्वाचा त्याग करून सनातन धर्माच्या उत्थानासाठी सेवारत ! – सतीश महाना, विधानसभा अध्यक्ष, उत्तरप्रदेश

सनातन धर्मासाठी सनातन संस्था निःस्वार्थीपणे अखंड कार्यरत आहे. संस्थेमध्ये अनेक उच्चशिक्षित सर्वस्वाचा त्याग करून सेवारत आहेत.

रेल्वेच्या प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष रमेशचंद्र रतन यांची सनातन संस्थेच्या साधकांनी घेतली भेट !

श्री. रमेशचंद्र रतन यांनी सनातन संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले. त्यावर त्यांनी साधकांना सांगितले, ‘‘पुढे कधीही रेल्वेशी संबंधित काही साहाय्य पाहिजे असल्यास मी सेवेसाठी सदैव तत्पर आहे.’’

जैन संप्रदायाचे पू. विनम्रसागरजी महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

चौक (जिल्हा रायगड) येथून पायी चालत सकाळी ८ वाजता पू. महाराजांचे आश्रमात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी संस्थेचे साधक उपस्थित होते. आश्रमदर्शनाच्या वेळी पू. विनम्रसागरजी महाराज आणि त्यांचे सर्व शिष्य यांनी जिज्ञासेने आश्रम पाहून त्यानुसार काही प्रश्नसुद्धा विचारले. आश्रम भेटीनंतर आश्रमातील पूर्णवेळ साधना करणार्‍या काही साधकांसमवेत त्यांनी आस्थेने संवाद साधला.

पुणे येथील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

भाजपचे पुणे येथील आमदार श्री. सुनील कांबळे यांनी १२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष तथा प्रवक्ते डॉ. श्रीपाद ढेकणे आणि काही कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते.

सनातन संस्थेच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी आल्यानंतर परत निघायची इच्छा होत नाही ! – जगजीतन पांडे, महामंत्री, अखिल भारतीय धर्मसंघ शिक्षा मंडळ, वाराणसी

सनातन संस्था आमचेच कार्य करत आहे. संस्थेच्या कार्याला आमचे नेहमीच सहकार्य राहील, असे कौतुकोद्गार अखिल भारतीय धर्मसंघ शिक्षा मंडळाचे महामंत्री श्री. जगजीतन पांडे यांनी व्यक्त केले.

भारत शासनाचे माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

भारत शासनाचे माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांनी ८ जानेवारी २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. आश्रमभेटीच्या वेळी श्री. माहूरकर यांनी साधकांना मार्गदर्शन केले.

श्री क्षेत्र द्वारापूर, धारवाड (कर्नाटक) येथील संत श्री परमात्माजी महाराज यांची वाराणसी येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २० वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्राविषयी सांगितले होते आणि आता समाजालाच नव्हे, तर संतांनादेखील हिंदु राष्ट्राविषयी कुठेतरी जाणीव व्हायला लागली आहे, असे प्रतिपादन श्री क्षेत्र द्वारापूर,…

नाथपंथानुसार साधना करणाऱ्या पू. यशवंत शिवनगिरीकर महाराजांची सनातनच्या रामनाथी, गोवा आश्रमाला सदिच्छा भेट !

आश्रमातील सर्व साधकांचा निःस्वार्थ सेवाभाव आणि झोकून देऊन सेवा करण्याची वृत्ती पू. शिवनगिरीकर महाराज यांना पुष्कळ आवडली. आश्रम पहातांना पू. महाराज स्वतःहून सर्व साधकांना विनम्रतेने नमस्कार करत होते.