हिंदु धर्माचे संवर्धन करण्याचे महान कार्य सनातन संस्था करत आहे – श्री. भास्करराव पाटील खतगावकर, भाजप

महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन काँग्रेस शासनातील माजी मंत्री, नांदेड मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी खासदार तथा भाजपचे विद्यमान नेते श्री. भास्करराव पाटील खतगावकर यांनी २६ मे या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य स्पृहणीय ! – डॉ. सुनिल कुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देशभर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अनेक स्तरांवर कार्य केले जात आहे. हे प्रयत्न अत्यंत आवश्यक आणि स्पृहणीय आहेत.

प्रत्येकाने शुद्ध धर्माचरण केल्यास विश्‍व राममय होईल ! – प.पू. श्रीराम महाराज

प्रत्येकाने आद्य कर्तव्य म्हणून सनातन धर्माचे रक्षण केले पाहिजे. प्रत्येकाने मनापासून शुद्ध धर्माचरण साधना म्हणून केले, तर संपूर्ण विश्‍व राममय होऊन जाईल, असे प्रतिपादन प.पू. श्रीराम महाराज रामदासी यांनी केले.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त संत आणि मान्यवर यांनी दिलेला संदेश अन् अभिप्राय !

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त निरोगी दीर्घायुष्य चिंतितो, तसेच सनातन संस्थेला शुभेच्छा देतो. सनातन संस्थेचे समाजाला धर्मशिक्षण देण्याचे कार्य प्रशंसनीय आहे.

तमिळनाडू येथील सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे भक्त वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य आणि त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती यांचे सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात आगमन

महर्षींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य, त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती आणि नातू श्री. आदर्श बालाजी (वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य यांची मुलगी सौ. अभिरामी यांचा मुलगा) यांचे १४ मे या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सनातनच्या आश्रमात आगमन झाले.

श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री महंत शांतिगिरी महाराज यांची पनवेल येथे सदिच्छा भेट !

सनातन संस्थेची विचारधारा चांगली असून सनातन संस्था आदरणीय आणि सन्माननीय आहे. संस्था उत्थानाचे कार्य करत आहे.

श्री नवनाथ महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत. त्यांनी आरंभलेले कार्य पूर्ण होणारच आहे. तुम्ही त्यांचे चरण सोडू नका. तुम्हाला त्याचे फळ ते नक्कीच देतील.

सनातन संस्था वैदिक संस्कृतीचे पालन करणारी आदर्श संस्था ! – योगी अरविंद, ऋषिकेश

सनातन संस्था ही धर्माप्रती आदरभाव निर्माण करणारी आणि धार्मिक मूल्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारी संस्था आहे. वैदिक सनातन संस्कृतीची जपणूक करणार्‍या या संस्थेचे समाजात अत्यंत मानाचे स्थान आहे. संस्थेच्या कार्यास माझ्या शुभेच्छा ! – योगी अरविंद, ऋषिकेश

हम्पी (कर्नाटक) येथील प्रसिद्ध चित्रकार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांची रामनाथी येथील सनातन आश्रमास सहकुटुंब भेट !

माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत अशी संस्था आणि सेवाभावी साधक मी कुठेही पाहिले नाहीत. यापुढेही मला कुठे हे पहायला मिळेल, असे वाटत नाही, असे उद्गार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांनी आश्रम पहातांना काढले.

आमदार श्री. बाळाराम पाटील आणि माजी आमदार श्री. विवेकानंद पाटील यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

शेतकरी कामगार पक्षाचे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री. बाळाराम पाटील आणि माजी आमदार श्री. विवेकानंद पाटील यांनी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला १५ फेब्रुवारीला सदिच्छा भेट दिली.