‘परम पूज्य डॉ. आठवले यांनी कलियुगामध्ये गीतेत सांगितल्याप्रमाणे अवतार घेतला आहे ! ‘ – ह.भ.प. नामदेव महाराज वासकर

‘सनातन धर्माचे कार्य काळानुरूप अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लवकरच विश्‍वात हिंदु धर्माची स्थापना होईल’, असे ह.भ.प. नामदेव महाराज वासकर यांनी म्हटले.

“हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय घेऊन सनातन संस्थेचे साधक कार्य करत आहेत !” – नैमिष सेठ, रा.स्व. संघ

सनातनच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढतांना नैमिष सेठ म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे साधक या अधिवेशनात उपस्थित आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय घेऊन ते कार्य करत आहेत. त्यांना भेटून आनंद झाला.’’

उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची देहलीच्या विश्‍व पुस्तक मेळाव्यातील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास भेट

उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची देहलीच्या विश्‍व पुस्तक मेळाव्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली.

सनातन संस्थेचे कार्य उल्लेखनीय ! – महादेव जानकर, कॅबिनेट मंत्री

पुणे येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय गो सेवा परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री श्री. महादेव जानकर यांनी तेथे लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली. त्यांनी सनातन संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे, असे ते म्हणाले.

पुणे येथील एम्आयटीचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट

डॉ. पांडे यांनी आश्रमात झालेले दैवी पालट उत्सुकतेने पाहिले आणि ‘या संदर्भात कशा प्रकारे संशोधन करू शकतो’, याविषयी मार्गदर्शन केले, तसेच अधिक वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करण्याच्या संदर्भात रुची दर्शवली. त्यांनी आश्रमातील व्यवस्थापन अतिशय आदर्श असल्याचे म्हटले.

समाजात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांविषयी अनुभवलेले प्रेम !

प्रसारमाध्यमांतून संस्था आणि समिती यांबद्दल काही जरी येत असले, तरी ‘जनमानसात अन् त्यातही अभिजन समाजात संस्था अन् समिती यांबद्दल किती प्रेम आहे’, याचा मला प्रत्यय आला.

कल्याण येथील भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

कल्याण (प.) येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सचिव श्री. नरेंद्र पवार यांनी ३० डिसेंबर या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

सनातन संस्थेच्या आश्रमांना भेट दिल्यावर रामायणाची आठवण येते ! – दुर्गेश परूळकर, संस्थापक, गीता अभ्यास मंडळ

वसिष्ठ ऋषींनी स्वयंशासित समाजाविषयी जे लिहिले आहे, ते मला सनातनच्या आश्रमात जाणवते, असे प्रतिपादन डोंबिवली येथील गीता अभ्यास मंडळाचे संस्थापक, लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर यांनी केले

सनातनच्या साधकांचा समर्पण भाव आणि श्रद्धा कौतुकास्पद ! – श्री जगद्गुरु बद्री शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री कृष्णानंदतीर्थ महास्वामीजी

श्री महास्वामीजींनी सनातन संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले,सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुम्ही धीरोदात्तपणे कार्य करत आहात. तुम्हा सर्वांचा समर्पण भाव आणि श्रद्धा कौतुकास्पद आहे. तुमच्या कार्यास माझे आशीर्वाद आहेत.

सनातनच्या कार्यास माझे आशीर्वाद ! – श्री महास्वामीजी

चेंबूर येथील श्री. हरिहरपुत्र भजन समाज मंदिरात ३ ते ११ डिसेंबर या कालावधीत श्री महास्वामीजींचा सुवर्ण जन्मजयंती महोत्सव भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला.