दिव्यत्वाच्या प्रचीतीचा ऊर्जास्रोत सनातन आश्रम ! – ह.भ.प. बाळासाहेब बडवे, भागवत कथाकार, पंढरपूर.

धर्मचैतन्य, धर्मऊर्जा आणि धर्मसंस्कार जिवंत ठेवण्याचे महान कार्य गोव्यातील सनातनच्या आश्रमातून निर्माण होत आहे. तो नुसता आश्रम नव्हे, तर ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ आहे.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट !

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते श्री. रवींद्र चव्हाण यांनी ७ जुलै या दिवशी सनातनच्या देवद येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

विनामूल्य आयुर्वेदिक न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिरात सहभागी झालेल्या वैद्यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

म्हापसा येथे २४ ते ३० जून कालावधीत पार पडलेल्या विनामूल्य आयुर्वेदिक न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिरात सामाजिक कर्तव्य म्हणून सेवाभावी वृत्तीने सहभागी झालेल्या वैद्यांनी येथील सनातनच्या आश्रमाला २ जुलै या दिवशी सदिच्छा भेट दिली.

सनातन संस्था ही सर्व संतांनी सांगितलेले ज्ञान संकलित करते ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी व्यवस्थापकीय संचालक

सनातन संस्था ही सर्व संतांनी सांगितलेले ज्ञान संकलित करते, असे प्रतिपादन पितांबरी आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.

सनातनचा रामनाथी आश्रम हा पृथ्वीवर वैकुंठस्वरूप ! – अधिवक्ता प्रशांत गोरे, अकोला

अधिवक्ता प्रशांत गोरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रारंभ करतांना विष्णुस्वरूप गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करून केला. त्यांच्या मार्गदर्शनात ते म्हणाले, ‘‘सनातनचा रामनाथी आश्रम हा पृथ्वीवर वैकुंठस्वरूप आहे. या वैकुंठाची अनुभूती मी अनेक वेळा घेतली आहे…

सप्तम ‘अखिल भारतीय हिदू अधिवेशना’ला उपस्थित हिदुत्वनिष्ठांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या समवेत मी यापुढे नेहमी कार्य करीन ! – स्वामी संवित् सोमगिरीजी महाराज

हिंदु राष्ट्र स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतल्याविषयी मी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना धन्यवाद देतो. हे कार्य मौलिक असल्याने तुमच्यासमवेत मी यापुढे नेहमी कार्य करीन !…

रामनामाचा १३ कोटी जप करणारे पू. अरुण शिवकामत आणि पू. (सौ.) मंगला अरुण शिवकामत यांची सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतली सदिच्छा भेट !

रामनामाचा १३ कोटी जप करणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे भक्त बेळगाव (कर्नाटक) निवासी पू. अरुण शिवकामत आणि पू. (सौ.) मंगला अरुण शिवकामत यांची सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नगर येथे १९ मे या दिवशी सदिच्छा भेट घेतली.

सनातन संस्था ही धर्मजागृती करण्याचे अतिशय चांगले कार्य करत आहे !

सनातन संस्थेचे साधक अतिशय मधुरभाषिक असतात. ते न्यूनतम आवश्यकतांमध्ये जगतात आणि राष्ट्र अन् धर्म यांचे अधिकाधिक कार्य करण्याची कामना करतात. कठीण प्रसंगातही स्वत:चे निरीक्षण करणे, ही अतिशय आश्‍चर्याची गोष्ट मी त्यांच्यात पाहिली आहे.

‘राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार’ प्राप्तकर्ते डॉ. श्रीनारायण सिंह यांची त्यांच्या कुटुंबियांसमवेत सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला सदिच्छा भेट

डॉ. श्रीनारायण सिंह यांना वर्ष २०१३ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून ‘तोंडखुरी पायखुरी’ या गायीच्या लसीच्या शोधासाठी प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.