वृंदावन येथील ब्रह्मलीन श्री नीब करौरी महाराज यांचे सुपुत्र पंडित धर्मनारायण शर्माजी यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद आणि मार्गदर्शन

२.८.२०१९ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने साधक श्री. राम होनप यांनी वृंदावन येथील ब्रह्मलीन श्री नीब करौरी महाराज यांचे सुपुत्र आदरणीय पंडित धर्मनारायण शर्माजी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.

सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी घेतली श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीदंडी स्वामी यांची सदिच्छा भेट

शक्तिपात संप्रदायाचे श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीनृसिंह आश्रय यति (श्रीदंडी स्वामी) यांनी सनातनच्या धर्मप्रसाराच्या कार्याचे कौतुक करून ‘लवकरच हिंदु राष्ट्र येणार आहे’, असा आशीर्वाद दिला.

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चैतन्यमय भेट

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’चे प.पू. देवबाबा यांनी २३ जुलै २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चैतन्यमय भेट दिली.

सनातन संस्थेचे कार्य जग व्यापेल ! – प.पू. आबा उपाध्ये यांचे आशीर्वचन

सनातन संस्थेच्या साधकांना होत असलेले वाईट शक्तींचे त्रास न्यून व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी आध्यात्मिक स्तरावर सातत्याने प्रयत्न करणारे पुणे येथील थोर संत प.पू. नरसिंह (आबा) उपाध्ये यांचे २१ जुलै या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात शुभागमन झाले.

कर्नाटकातील मणिपाल विद्यापिठातील मुख्य उपक्रम अधिकारी डॉ. अरुण शानभाग यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहपरिवार भेट

कर्नाटकातील सुप्रसिद्ध मणिपाल विद्यापिठातील मुख्य उपक्रम अधिकारी (चीफ इनोवेशन ऑफिसर) डॉ. अरुण शानभाग यांनी २० जुलै २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सहपरिवार सदिच्छा भेट दिली.

संतांविषयी ऐकून होतो; परंतु संत निर्माण करणारी एखादी संस्था कधी पाहिली नव्हती ! – ह.भ.प.सुहासबुवा वझे

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधक संतपदापर्यंत पोचत आहेत.संतपदी विराजमान झालेल्या साधकांची संख्या ऐकून चांगले वाटले.

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांची देवद, पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला चैतन्यमय भेट !

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांनी २३ जून २०१९ या दिवशी सायंकाळी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला चैतन्यमय भेट दिली.

पुणे येथील सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य तथा ‘ग्रहांकित’ मासिकाचे संपादक श्री. चंद्रकांत शेवाळे यांची रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट

पुणे येथील सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य तथा ‘ग्रहांकित’ मासिकाचे संपादक श्री. चंद्रकांत शेवाळे यांनी त्यांचा परिवार आणि नातेवाईक यांच्या समवेत २ जुलै २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिली.

सनातन संस्थेचे कार्य समाजाला योग्य दिशा देणारे ! – पू. श्यामपुरी महाराज

सातारा येथे १६ जुलै या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता सातारा-कोरेगाव रस्त्यावर असलेल्या वेदभवन मंगल कार्यालय येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘गुरुपौर्णिमा महोत्सव २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे.

प्रयागराज येथील ‘प्रयागराज टाइम्स’चे संपादक अनुपम मिश्रा यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहपरिवार भेट

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील ‘प्रयागराज टाइम्स’चे संपादक श्री. अनुपम मिश्रा, त्यांचे बंधू ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’चे तांत्रिक व्यवस्थापक श्री. पंकज मिश्रा, त्यांचे आई-वडील आणि मेरठ येथील ‘बीएस्एन्एल्’चे महाव्यवस्थापक ज्ञानेंद्रकुमार द्विवेदी यांनी १३ जून या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहपरिवार भेट दिली.