९० टक्क्यांच्या पुढे अद्वैत निर्माण होत असल्याने वासनेचे विचार नष्ट होणे
जोपर्यंत मी आणि अन्य कोणीतरी असे द्वैत आहे, तोपर्यंत वासनेचे विचार येतात. कोणाशीतरी एकरूप व्हायचे आहे, असे वाटत असते; पण ९० टक्क्यांच्या पुढे द्वैत अल्प होऊ लागतेे. मी आणि अन्य कोणी हा भेद रहात नाही. त्यामुळे आपण सर्वजण एकच आहोत, असे वाटत असल्याने वासना रहात नाहीत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले