काही संप्रदायवाल्यांची नियतकालिके आणि सनातन प्रभात

काही संप्रदायवाले आपल्या संप्रदायाचे महत्त्व इतरांवर बिंबावे; म्हणून त्यांच्या नियतकालिकांत काही जणांना आलेल्या शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील सकामातील चांगल्या अनुभूती छापतात; पण हजारोंना अनुभूती आल्या नसल्याचे छापत नाहीत. त्यामुळे यांच्याकडे गेलो, तर आपल्या सर्व अडचणी दूर होतील, असे बर्‍याच जणांना वाटते आणि ते त्या संप्रदायात जातात. त्यांतील बहुतेकांना अनुभूती न आल्याने त्यांचा केवळ त्या संप्रदायावरीलच … Read more

अध्यात्मात वयाला महत्त्व नसते, तर आध्यात्मिक स्तराला महत्त्व असते !

व्यावहारिक जीवनात आपल्याहून अधिक वयाच्या व्यक्तीला आपण नमस्कार करतो. याउलट अध्यात्मात वयाला महत्त्व नसते, तर आध्यात्मिक स्तराला महत्त्व असते ! लहान वयाच्या संतांनाही मोठ्या व्यक्ती आदराने नमस्कार करतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

याज्ञिकांनो, यज्ञात हविर्द्रव्यांसह, म्हणजे आहुती द्यायच्या वस्तूंसह स्वतःतील अहंभाव आणि…

याज्ञिकांनो, यज्ञात हविर्द्रव्यांसह, म्हणजे आहुती द्यायच्या वस्तूंसह स्वतःतील अहंभाव आणि स्वभावदोष यांचीही आहुती द्या ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंना ‘धर्म’ शिकवण्याची आवश्यकता !

मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांचे हित पहाणार्‍यांनाच मते देतात, तर हिंदू बुद्धीप्रामाण्यवाद, समाजवाद, साम्यवाद इत्यादी निरनिराळ्या विचारसरणींप्रमाणे मते देतात. त्यामुळे त्यांची मते फुटतात. त्यामुळे त्यांना भारतात किंमत उरली नाही ! हिंदूंना धर्म शिकवला, तरच त्यांची मते इतर धर्मियांप्रमाणे एकगठ्ठा होतील. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

इतर संघटना कार्याचे वार्षिक आणि आर्थिक अहवाल सादर करतात, तर…

इतर संघटना कार्याचे वार्षिक आणि आर्थिक अहवाल सादर करतात, तर सनातन संस्था साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा आणि ग्रंथ प्रकाशनांचा अहवाल सादर करते आणि हिंदु जनजागृती समिती धर्मसभा आणि धर्मरक्षणासाठीची राष्ट्रीय आंदोलने यांचा अहवाल सादर करते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राष्ट्रप्रेमींनो आणि धर्मप्रेमींनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिदिन भावपूर्ण सेवा केल्यासच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !

बहुतेक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी एखादा प्रसंग आला, तरच कार्य करतात, उदा. गोरक्षा करणारे गायी कत्तलखान्यात जात असल्याचे कळले, तरच कार्यरत होतात. अयोध्येत राममंदिर, गंगाप्रदूषण इत्यादींच्या संदर्भात कार्य करणारे कधीतरी कार्य करतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साध्य करायचे असेल, तर असे कार्य करून चालणार नाही. चाकरी करणार्‍यांनी प्रतिदिन ३ – ४ घंटे तरी कार्य करायला हवे. … Read more

देवघरातील देवांची संख्या

साधनेच्या मार्गानुसार देवघरातील देवांची संख्या पालटते. १. व्यष्टी साधना : व्यष्टी साधना करणार्‍यांना अनेकातून एकात जायचे असते. त्यामुळे त्यांनी देवघरातील देवांची संख्या अल्प करत एकाच देवाच्या मूर्तीची किंवा छायाचित्राची पूजा करावी. कुटुंबातील इतर भक्तीमार्गी असल्यास देवघरात इतर देवांच्या मूर्ती किंवा चित्रे असतात; पण आपण मनातून एकाच देवतेकडे लक्ष द्यावे. २. समष्टी साधना : समष्टी साधना … Read more

संतांच्या तुलनेत राजकारण्यांचे महत्त्व शून्य

राजकारणी जनतेला पैसे देऊन आणि वाहनाची सोय करून सभेला बोलावतात. याउलट संतांकडे आणि धार्मिक उत्सवात न बोलावताही भक्त लाखोंच्या संख्येने येतात आणि पैसे अर्पण करतात ! यावरून संतांच्या तुलनेत ‘राजकारण्यांचे महत्त्व शून्य आहे’, हे लक्षात येईल. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुठल्याही पुरस्कारापेक्षा ६० टक्के पातळी गाठणे किंवा संत होणे, हे महत्त्वाचे !

पद्मभूषण, राष्ट्रपती पदक, नोबेल प्राइस यांपेक्षा ६० टक्के पातळी गाठणे किंवा संत होणे, हे अधिक महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे व्यक्ती जन्म-मृत्यूच्या चक्रांतून सुटते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले