भारताची कल्पनातीत भयानक अशी वस्तूस्थिती !

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशात ५००० चपराशांच्या नोकर्‍यांसाठी २३ लक्ष अर्ज आले होते. अर्ज करणार्‍यांपैकी काही जण विद्यावाचस्पती (डॉक्टरेट केलेले) होते ! – अज्ञात ————————————————————————————————————— लोकशाहीने दिलेल्या या वस्तूस्थितीवर मात करण्याचा एकमेव उपाय, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा काळ

एका वर्षात १२ मास असतात. प्रत्येक मासात ४ आठवडे असतात. प्रत्येक आठवड्यात ७ वार असतात. प्रत्येक वारात २४ घंटे (तास) असतात. प्रत्येक घंट्यात ६० मिनिटे असतात आणि प्रत्येक मिनिटात ६० सेकंद असतात. त्यामुळे एखाद्या सेकंदाचा काळाच्या संदर्भात उल्लेख करायचा असेल, तर तो वर्ष २०१५ मधील जुलै मासांतर्गत तिसर्‍या आठवड्यातील गुरुवार, सकाळी १० वाजून १० मिनिटे … Read more

कुठे आधुनिक न्यायप्रणाली, तर कुठे अध्यात्मशास्त्र !

अध्यात्मात वय पाहिले जात नाही, तर वृत्ती, कृती पाहिली जाते; म्हणून लहान वयांच्या संतांच्याही सर्वजण पाया पडतात. याउलट आधुनिक विचारसरणीची न्यायप्रणाली केवळ वय पहाते; म्हणून गुन्हेगारी करायची बुद्धी असलेल्यालाही बालच समजते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परमेश्‍वर आणि मानव यांतील मुख्य भेद !

परमेश्‍वर अनंत कोटी ब्रह्मांडांचा व्याप सांभाळतो; पण कार्याचे श्रेय विविध देवता, अवतार आणि संत यांना देतो, म्हणजेच त्याच्यात अहं नसतो. यावरून लक्षात येईल की, दुसर्‍याला श्रेय देतो तो परमेश्‍वर. याउलट अहं असलेला माणूस स्वतःला मोठेपणा मिळावा म्हणून प्रयत्न करतो ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जे जमत नाही, त्यासाठी प्रयत्न करणे, ही साधनाच आहे !

काही साधक सेवा परिपूर्ण जमत नाही म्हणून निराश होतात. काही साधक व्यष्टी साधनेतील प्रयत्न नीट जमत नाहीत म्हणून निराश होतात. परिपूर्ण सेवा करणे आणि साधनेच्या प्रयत्नांतील परिपूर्णता, हे साध्य आहे. एखाद्या गोष्टीतील अपूर्णत्व, हे त्यासंदर्भात अजून आपल्याला शिकायचे आहे, याचेच निर्देशक आहे. शिकण्यात आनंद आहे, हे प.पू. डॉक्टरांचे वाक्य सतत लक्षात ठेवले, तर आपण करत … Read more

प्रचारात साहाय्य करणे आणि स्वतः प्रचार करणे

मी तुम्हाला प्रचारात साहाय्य करतो, यापेक्षा स्वतः प्रचार करणे, ही वरच्या स्तराची साधना आहे. याचे कारण हे की, मी तुम्हाला प्रचारात साहाय्य करतो, यात एक प्रकारे अहं असतो आणि प्रचारात काही चुका झाल्या, तर स्वतःकडे त्यांचे उत्तरदायीत्व नसते. याउलट स्वतः प्रचार करणे यात स्वतःवर असलेल्या उत्तरदायीत्वाची जाणीव असते. त्यामुळे प्रगती जलद होते. – (परात्पर गुरु) … Read more

एखाद्या व्यक्तीसाठी, व्यष्टीसाठी प्राणांचा त्याग करण्यापेक्षा राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी,…

एखाद्या व्यक्तीसाठी, व्यष्टीसाठी प्राणांचा त्याग करण्यापेक्षा राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी, म्हणजे समष्टीसाठी प्राणांचा त्याग करणे अधिक महत्त्वाचे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

त्याग आणि दान

एखाद्या गोष्टीचा त्याग करतांना त्या गोष्टीवरील आपले स्वामीत्व सोडले जाते, उदा. संसाराचा त्याग करून संन्यासी बनणे. याचा स्वतःला लाभ होतो; पण दुसर्‍याला होत नाही. दान करतांनाही स्वामीत्व सोडले जाते. तेव्हा त्याचा दुसर्‍याला लाभ होतो. ते दान सत्पात्राला केल्यास स्वतःलाही योग्य साधना झाल्यामुळे लाभ होतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पाश्‍चात्त्य आणि हिंदु संस्कृती यांतील भेद !

पाश्‍चात्त्य संस्कृती स्वेच्छेला प्रोत्साहन देणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करते आणि दुःखाला निमंत्रण देते, तर हिंदु संस्कृती स्वेच्छा नष्ट करून सत्-चित्-आनंदावस्था कशी प्राप्त करायची, हे शिकवते. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

वेदमंत्रपठण ही व्यष्टी आणि समष्टी साधना असणे

वेदमंत्रपठण ही नामजपाप्रमाणे व्यष्टी साधना आहे. त्याचप्रमाणे ती समष्टी साधनाही आहे; कारण वेदमंत्रपठण मोठ्याने करत असल्याने त्याचा परिणाम ऐकणार्‍या व्यक्ती आणि वातावरण यांच्यावरही होतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले