हिंदु धर्म

युगानुयुगे जगात भारताला महत्त्व आहे, ते केवळ हिंदु धर्मामुळे आहे आणि त्यालाच नष्ट करायला निघाले आहेत बुद्धीप्रामाण्यवादी, विद्रोही आणि साम्यवादी ! पुढे त्यांच्या लक्षात येईल की, ते स्वतःच नष्ट होत आहेत आणि हिंदु धर्म अनंत काळ टिकणार आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

इतरांना मानसिक किंवा आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे

मानसिक स्तर वरवरचे तात्कालिक साहाय्य करणारा असतो, तर आध्यात्मिक स्तर अडचण मुळापासून दूर करणारा असतो. हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. १. मानसिक स्तर : भुकेलेल्याला अन्न द्या, असे म्हणणारे मानसिक स्तरावरचे असतात. ते भुकेलेला भुकेला का आहे ?, याचा विचार करत नाहीत. त्यामुळे भुकेल्याला कोणालातरी आयुष्यभर अन्न द्यावे लागते. २. आध्यात्मिक स्तर : साधना कर. … Read more

नैतिकता आणि आचारधर्म बालपणापासून न शिकवणारे पालक आणि राज्यकर्ते असल्यामुळे भारतात सर्वत्र अनाचार, राक्षसी वृत्ती प्रबळ झाल्या आहेत !

या स्थितीमुळे बलात्कार, भ्रष्टाचार, विविध गुन्हे, देशद्रोह आणि धर्मद्रोह यांचे प्रमाण अपरिमित होऊन देश रसातळाला गेला आहे. त्यावर उपाय एकच आणि तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंच्या ज्योतिषशास्त्राचे महत्त्व

व्यक्तीगत ग्रहांवरून व्यक्तीचे कालमहात्म्य कळते, तर मेदनीय ज्योतिष आणि संख्याशास्त्र आदींवरून समष्टीचे कालमहात्म्य कळतेे, उदा. भारताचे भविष्य पहाण्यासाठी देशाचे नाव, देश स्वतंत्र कधी झाला ती कुंडली; एखाद्या संस्थेचे भविष्य पहाण्यासाठी संस्था स्थापन झाली त्या वेळेची कुंडली, संस्थेचे नाव, संस्था प्रमुखाचे नाव आणि त्याची कुंडली; एखाद्या कुटुंबाचे भविष्य पहाण्यासाठी कुटुंब प्रमुखाची कुंडली. यावरून ज्योतिषशास्त्रात भारत इतर … Read more

काही साधकांना सेवा करत नामजप करण्यात आनंद मिळण्याचे कारण

बसून नामजप करण्यापेक्षा काही साधकांना सेवा करत नामजप करण्यात अधिक आनंद मिळतो. याचे कारण म्हणजे जे ध्यानमार्गी असतात, त्यांना बसून नामजप करणे चांगले वाटते. समष्टी साधना करणार्‍यांना सेवा करत नामजप करण्यात अधिक आनंद मिळतो. (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रेष्ठ कोण संत चोखामेळा कि विद्रोही ?

संत चोखामेळा यांना विठोबाच्या दर्शनासाठी देवळात जाऊ दिले नाही. तेव्हा त्यांनी विद्रोहींसारखा हट्ट केला नाही. त्यांच्या भक्तीमुळे विठोबाने त्यांना स्वतःच्या गळ्यातला हार दिला. श्रेष्ठ कोण संत चाेखामेळा कि विद्रोही ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पांडित्य आणि साधना

१. पोहोण्याचे पुस्तक वाचून पोहता येत नाही, तसे नामजपाची अनेक पुस्तके वाचून नामजप होत नाही किंवा साधनेवरील अनेक पुस्तके वाचून साधना होत नाही; कारण साधना हे कृतीचे शास्त्र आहे. २. ग्रंथांचा अभ्यास करून त्यांतील विषयावर एखाद्या प्राध्यापकांप्रमाणे प्रवचन देता येईल; पण त्यामुळे साधनेत प्रगती होत नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राष्ट्राभिमान

आता केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट यांदिवशी राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी झेंडावंदन करणे, भाषणे करणे आणि देशभक्तीपर गीते लावणे असे करून चालणार नाही, तर प्रतिदिनच यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे, नाहीतर हिंदूंचे आणि भारताचे अस्तित्व टिकणार नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गोमाता

आपण आईचे दूध पितो, त्याप्रमाणे गायीचे दूध पितो; म्हणून गायीला गोमाता म्हणतात. असे असतांना गायीचीच हत्या करणे, हे आईची हत्या करण्यासारखेच झाले. हा कृतघ्नपणाचा कळस होय ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अनुभूती येण्यामागील कारणे

१. प्रवासात असतांना एखादे दृष्य का दिसते ? त्याच्यापाठी काही कारण नसते, तर वाटेतील ते अनुभव असतात. त्याप्रमाणे अध्यात्मातल्या सूक्ष्मातील प्रवासात अनुभूती येतात. २. ईश्‍वराला अनुभूतीतून काहीतरी शिकवायचे असते. ३. कधी मायावी वाईट शक्तीही चांगल्या अनुभूती देतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले