कर्माचे महत्त्व

कर्माविना तुम्हाला गती नाही; कारण कर्मालाच गती आहे. भावार्थ : दैनंदिन जीवनव्यापार असो, सुखप्राप्तीच्या साधनांचा शोध असो, दुःख टाळण्याचे उपाय असोत… सारी जगरहाटी, सारे विश्‍वचक्र कर्मामुळेच चालते. आध्यात्मिकदृष्ट्याही मनुष्याचा जन्म ही त्याच्यासाठी कर्मभूमीच आहे; कारण मनुष्य कर्म (साधना) करूनच ईश्‍वरप्राप्ती करून घेऊ शकतो. – संत भक्तराज महाराज

भारताच्या परमावधीच्या अधोगतीला रज-तमप्रधान राज्यकर्ते आणि प्रजा उत्तरदायी !

द्वापरयुगापर्यंत बहुसंख्य हिंदु राजे आणि प्रजा सत्त्वगुणप्रधान होती. त्यामुळे त्यांच्यावर भगवंताची कृपा असल्याने ते समर्थ होते. आता कलियुगातील बहुसंख्य हिंदु राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी, तसेच प्रजाही रज-तमप्रधान असल्याने कोणीच व्यष्टी साधनाही करत नाही. त्यामुळे त्यांच्यावर भगवंताची कृपा नसल्याने भारताची परमावधीची अधोगती झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंना स्वतःची काळजी घेता आली नाही; म्हणून ते मोगल आणि…

हिंदूंना स्वतःची काळजी घेता आली नाही; म्हणून ते मोगल आणि इंग्रज यांच्या पारतंत्र्यात हजार वर्षे राहिले. अशा हिंदूंच्या मतानुसार लोकशाहीत निवडून आलेल्यांनी स्वातंत्र्यापासून ६८ वर्षे भारतात राज्य करणे यांसारखी हास्यास्पद, तसेच भारत आणि हिंदु धर्म यांचा नाश करणारी दुसरी गोष्ट कोणती नसेल ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प्राधान्य न कळणारे धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी !

लव्ह जिहाद, महिलांची असुरक्षितता, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी, जिहादींची आक्रमणे, गंगाप्रदूषण इत्यादी अनेक ज्वलंत प्रश्‍न देशापुढे उभे असतांना बुद्धीप्रामाण्यवादी स्त्रियांनी शनीदेवाच्या चौथर्‍यावर चढणे इत्यादी गोष्टींना प्राधान्य देतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांनी हे लक्षात ठेवावे !

काम न करणे, भ्रष्टाचार करणे इत्यादींची सवय झालेले बहुतेक पोलीस आणि सरकारी कर्मचारी अन् अधिकारी यांना एकही खाजगी आस्थापन एकही दिवस नोकरीत ठेवणार नाही ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील मुख्य अडथळा म्हणजे हिंदु धर्माचे महत्त्व न समजलेले हिंदू !

मुसलमानांना इस्लाम धर्माचे आणि ख्रिस्तींना ख्रिस्ती धर्माचे महत्त्व ज्ञात असते. त्यामुळेच ते सर्व जग इस्लाम धर्माचे किंवा ख्रिस्ती धर्माचे करण्याचे शेकडो वर्षे अहर्निष प्रयत्न करत असतात. याउलट अतीशहाण्या, आंग्लाळलेल्या, बुद्धीप्रामाण्यवादी आणि स्वतःला सुधारक म्हणवणार्‍या हिंदूंनी हिंदु धर्माचा अभ्यास केलेला नसल्याने आणि थोडीफारही साधना केलेली नसल्यामुळे त्यांना हिंदु धर्माचे महत्त्व समजत नाही. याउलट जगात कोठेही ईश्‍वरप्राप्तीची … Read more

समष्टी प्रारब्ध

युगानुसार व्यष्टी आणि समष्टी प्रारब्धाचे प्रमाण : व्यक्तीचा आध्यात्मिक स्तर जितका अधिक असेल, तितके त्या व्यक्तीला समष्टी प्रारब्ध भोगावे लागण्याचे प्रमाण अल्प होत जाते.   युग व्यष्टी प्रारब्ध (प्रमाण – टक्के) समष्टी प्रारब्ध (प्रमाण – टक्के) १. सत्य १०० – २. त्रेता ७० ३० ३. द्वापर ५० ५० ४. कलि अ. आरंभी आ. मध्य इ. … Read more

अध्यात्माने विज्ञानाला प्रमाणपत्र दिले पाहिजे !

विज्ञानवाद्यांनो, हे लक्षात घ्या की, विज्ञानाने अध्यात्माला प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही, उलट अध्यात्माने विज्ञानाला प्रमाणपत्र दिले पाहिजे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

शिष्यांना शिकवण्याच्या संदर्भात एका संतांचा अहंभाव !

एका संतांनी माझ्याशी बोलतांना शिष्यांना बाहेर जायला सांगितले. तेव्हा मला वाटले, त्यांना काहीतरी खाजगी बोलायचे असेल. बोलतांना खाजगी असे काहीच नव्हते. नंतर शिष्य भेटले. तेव्हा त्यांनी सांगितले, गुरूंनी आज खूप छान सांगितले. मी म्हणालो, मला सांगा. मलाही काही शिकता येईल. शिष्यांनी जे सांगितले, ते मी गुरूंशी बोलतांना त्यांना सांगितलेलेच होते ! असे अहंभावी गुरु शिष्यांचे … Read more

ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग

विश्‍वाची उत्पत्ती कशी झाली, यासंदर्भात ज्ञानयोगात अनेक पाठभेद आहेत; पण ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गांसंदर्भात निरनिराळे मार्ग असले, तरी त्यांत पाठभेद नाहीत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले