वर्गात गडबड करणार्‍या मुलांना शिक्षक वर्गाबाहेर घालतात. संसदेत आरडाओरडा करून…

वर्गात गडबड करणार्‍या मुलांना शिक्षक वर्गाबाहेर घालतात. संसदेत आरडाओरडा करून जनतेचे प्रतिदिन २ कोटी रुपये उधळणार्‍या खासदारांना लोकसभापती तात्काळ सभागृहाबाहेर का घालवत नाहीत ? त्यांना शिक्षकांएवढेही समजत नाही का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारत अधोगतीच्या परमावधीला जाण्यामागील कारण !

पूर्वीचे राजे राज्याचा त्याग करून वानप्रस्थाश्रम स्विकारायचे आणि अरण्यात जायचे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एका तरी राज्यकर्त्याने असे केले आहे का ? त्यांच्यामुळेच भारत अधोगतीच्या परमावधीला गेला आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सर्वपक्षीय राज्यकर्ते

गाढवाला गुळाची चव काय ? ही म्हण भारतात असलेल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या संदर्भात सार्थ करणारे स्वातंत्र्यापासूनची ६९ वर्षे भारतावर राज्य केलेले सर्वपक्षीय राज्यकर्ते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात; मात्र स्वातंत्र्यापासूनची ६९ वर्षे भारतावर राज्य केलेल्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना न स्वतःला अध्यात्म जाणून घेण्याची इच्छा आणि न जनतेलाही अध्यात्म शिकवण्याची इच्छा … Read more

आतंकवाद्यांमुळे हिंदूंच्या ऐक्याची नितांत आवश्यकता असतांना, तसेच देशापुढे अस्तित्वाचा प्रश्‍न…

आतंकवाद्यांमुळे हिंदूंच्या ऐक्याची नितांत आवश्यकता असतांना, तसेच देशापुढे अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असता स्त्रियांच्या मंदिरातील प्रवेशावर आंदोलन करणे, म्हणजे भुकेला अन्न नसतांना घर हवे, यासाठी आरडाओरडा करणे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वातावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी आधी साधनेने वैचारिक प्रदूषण रोखा !

सगळीकडे प्रदूषण, पर्यावरणाची हानी इत्यादी विषयांच्या चर्चा होत असतात. शासनही काही उपाययोजना उद्घोषित करते. हे केवळ वरवरचे असते. प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे मानवाच्या मनातील रज-तमांचे प्रदूषण ! त्यावर उपाय न करता वरवरचे उपाय करणे हास्यास्पद आहे ! मनातील रज-तमाचे प्रदूषण दूर करण्यासाठी सर्वत्रच्या मानवांना साधना शिकवून त्यांच्याकडून ती करवून घेणे, हा एकच उपाय आहे ! … Read more

क्षमा

चूक झाल्यास सर्वसाधारण व्यक्तीही क्षमा मागते; पण असंख्य चुका करणारे पोलिस, प्रशासनातील व्यक्ती, राजकारणी आणि राज्यकर्ते एकदा तरी क्षमा मागतात का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

निवडणुकीला उभे रहाणारे काही मंदिरांतील पुजारी आणि महंत !

काही पुजारी आणि महंत निवडणुकीला उभे रहातात. देवाने आपल्याला निवडावे, याऐवजी मतदारांनी आपल्याला निवडावे, अशी त्यांची अपेक्षा असते, म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी देवापेक्षा त्यांचा मतदारांवर अधिक विश्‍वास असतो ! असे पुजारी आणि महंत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले, तरी ते राज्य चांगले चालवतील का ? त्यांच्या हे लक्षात येत नाही की, देवाने त्यांना निवडले, तर त्यांच्याकडून … Read more

खाऊ देऊन मुलगा ऐकत नसेल, तर त्याला शिक्षा करावी लागते,…

खाऊ देऊन मुलगा ऐकत नसेल, तर त्याला शिक्षा करावी लागते, नाहीतर मूल डोक्यावर बसते. हेही ज्ञात नसलेले सर्वधर्मसमभाववाले आणि अल्पसंख्यांकांचे सर्व तर्‍हेने लाड करणारे हिंदू आतंकवाद्यांविरुद्धचे युद्ध कधी जिंकतील का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अडचणी दूर करण्याचे मूलभूत चार उपाय ज्ञात नसलेले हिंदू कधी जिंकतील का ?

१. साम (सामोपचाराने अडचण दूर करणे), २. दाम (पैसे देऊन अडचण दूर करणे), ३. दंड (शिक्षा करून अडचण दूर करणे) आणि ४. भेद (विरोधकांत फूट पाडून अडचण दूर करणे) हे अडचणी दूर करण्याचे चार उपाय आहेत. ते ज्ञात नसलेले सर्वधर्मसमभाववाले हिंदू कधी जिंकतील का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुटुंबात सर्वपुत्रसमभाव नसतांना राष्ट्रात मात्र सर्वधर्मसमभाव अशी घोषणा करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही !

कुटुंबातील ४ मुलांपैकी सगळ्यात सक्षम मुलाला वडील त्यांचा व्यवसाय चालवण्यास देतात. ते सर्वपुत्रसमभाव म्हणून इतर मुलांनाही चालवायला देत नाहीत. असे असतांना राष्ट्राचा कारभार मात्र सर्व राजकीय पक्ष आरक्षण ठेवून सर्वांच्या हातात देतात आणि सर्वधर्मसमभाव म्हणत केवळ अल्पसंख्यांकांना अधिक साहाय्य करतात; म्हणूनच देशाचे दिवाळे निघाले आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले