पगार देणारी नोकरी आणि आनंद देणारी सेवा !

‘सनातन संस्थेमध्ये विद्यावाचस्पती (पीएच्.डी.), आधुनिक वैद्य, अभियंते यांसारखे उच्च विद्याविभूषित साधक त्यांची नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करत आहेत. नोकरीमध्ये त्यांना प्रतिदिन ८ – १० घंट्यांच्या कामासाठी प्रतिमास सहस्रो रुपये पगार मिळत होता. सनातन संस्थेमध्ये नोकरीप्रमाणे पगार मिळत नसला, तरी हे साधक प्रतिदिन स्वतःहून नोकरीपेक्षा अधिक घंटे सेवा करतात. याचे कारण हे की, त्यांना नोकरीच्या ठिकाणी … Read more

केवळ हिंदु धर्मात अनेक देव कसे ?

‘काही इतर धर्मीय हिंदूंना चिडवतात, ‘देव एकच आहे, तर तुमच्या धर्मात अनेक देव कसे ?’ अशा अभ्यासशून्य व्यक्तींच्या हे लक्षात येत नाही की, हिंदु धर्म सर्वांत परिपूर्ण असा धर्म आहे. पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राचे उदाहरण घेतले, तर हे लक्षात येईल की, पूर्वी विविध रोगांवर असलेली औषधे मर्यादित संख्येची होती. विज्ञानाने प्रगती केली, तशी औषधांची संख्या बरीच वाढली. … Read more

शिकवण्‍यापेक्षा शिकण्‍याची वृत्ती ठेवली, तर अधिक लाभ होणे

‘ईश्‍वर सर्वज्ञानी आहे. आपल्‍याला त्‍याच्‍याशी एकरूप व्‍हायचे असल्‍यामुळे आपण सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाणे आवश्‍यक असते. कोणत्‍याही क्षेत्रामध्‍ये ज्ञान मिळवणे, ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. अध्‍यात्‍म हे अनंताचे शास्‍त्र आहे. आपण कितीही शिकलो, तरी ते अल्‍पच असते. आपण शिकत असतांना ‘मी अज्ञानी आहे’, याची जाणीव ठेवून ज्ञान मिळवण्‍याची प्रक्रिया केली पाहिजे. त्‍यामुळे ‘मी’पणा अल्‍प होणे … Read more

कर्मकांडाचे महत्त्व !

‘बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु धर्मातील कर्मकांडाला ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात; पण कर्मकांडाचा अभ्यास केला, तर त्यात प्रत्येक गोष्टीचा किती सखोल अभ्यास केला आहे, हे लक्षात येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?

‘भारतात उपलब्ध असलेली जमीन, धान्य आणि पाणी यांचा विचार करून भारताची लोकसंख्या किती होऊ द्यायची, यांचा विचार करा, नाहीतर पुढे होणार्‍या गर्दीत सर्वजण गुदमरतील ! हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

गुरूंवर अढळ श्रद्धा असली पाहिजे !

‘आपले डॉक्टर, अधिवक्ता, लेखा परीक्षक इत्यादींवर आपला विश्वास असतो. त्याहून कित्येक पटींनी अधिक केवळ विश्वासच नाही, तर श्रद्धा गुरूंवर असली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

कुठे ढोबळ अंदाज व्यक्त करणारे विज्ञान, तर कुठे ज्योतिषशास्त्र !

‘कुठे भविष्यात काय होणार, याचे एकाही व्यक्तीच्या संदर्भात सर्व तपासण्या करूनही सांगता न येणारे आणि निसर्गाच्या संदर्भात केवळ ढोबळ अंदाज व्यक्त करणारे विज्ञान, तर कुठे केवळ निसर्गाचेच नाही, तर प्रत्येक व्यक्तीचे भविष्य जन्मकुंडली आणि नाडीपट्ट्या अन् संहिता यांच्या आधारे सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ असण्यामागील शास्त्र !

‘अनंत कोटी ब्रह्मांडनायकाचे इतर धर्मांत असते, तसे एकेका पुस्तकात वर्णन करता येईल का ? म्हणूनच हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ आहेत. त्यांतून पूर्ण माहिती मिळते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अनंत कोटी ब्रह्मांडांचा पालनकर्ता ईश्वर !

‘कुठे कुटुंबाचे किंवा आपल्या जातीबांधवांचे हित पहाणारे संकुचित वृत्तीचे मानव, तर कुठे अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्राणीमात्रांचे हित सांभाळणारा ईश्‍वर !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी समष्टी साधना आवश्यक !

‘व्यष्टी साधनेत एकाच देवतेची उपासना असते; पण समष्टी साधनेत अनेक देवतांची उपासना असते. लष्करात पायदळ, रणगाडे, हवाईदल, नाविकदल इत्यादी अनेक विभाग असतात. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या समष्टी कार्यात अनेक देवतांची उपासना, यज्ञ-याग इत्यादी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले