हे अधिक भयावह प्रदूषण !
‘स्थुलातील, म्हणजे देह आणि वस्तू यांनी केलेल्या तात्कालिक प्रदूषणापेक्षा सूक्ष्मातील, म्हणजे मन आणि बुद्धी यांनी केलेले प्रदूषण अनेक पटींनी अधिक काळ हानीकारक असते, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘स्थुलातील, म्हणजे देह आणि वस्तू यांनी केलेल्या तात्कालिक प्रदूषणापेक्षा सूक्ष्मातील, म्हणजे मन आणि बुद्धी यांनी केलेले प्रदूषण अनेक पटींनी अधिक काळ हानीकारक असते, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी होण्यापेक्षा साधक किंवा शिष्य होणे लाखो पटींनी श्रेष्ठ असते; कारण राजकीय पक्षात गेल्यावर रज-तम गुण वाढतात, तर साधक किंवा शिष्य झाल्यास सत्त्वगुण वाढतो. त्यामुळे देवाकडे वाटचाल होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘रुग्णालयात रुग्णांचे विविध कारणांनी मृत्यू होतात, उदा. अपघातग्रस्त, दीर्घकाळ रुग्णाईत असलेले रुग्ण, अकाली मृत्यू झालेले; तसेच लहान मुले इत्यादी. मृत्यूनंतर प्रत्येकाला लगेच पुढील गती मिळतेच, असे नाही. त्यांपैकी अतृप्त लिंगदेह किंवा वाईट लिंगदेह त्या रुग्णालयातील आधुनिक वैद्य, परिचारिका, स्वच्छता करणारे कर्मचारी, उपचारांसाठी आलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक इत्यादींना त्रास देऊ शकतात. रुग्णालयात विविध व्याधींनी त्रस्त … Read more
‘मीही ४१ व्या वर्षापर्यंत देवाला मानत नव्हतो. पुढे संमोहन उपचारशास्त्राची मर्यादा कळल्यावर मी साधनेला लागलो. तेव्हा जिज्ञासेपोटी संतांना सहस्रो प्रश्न विचारून आणि साधना करून अध्यात्मशास्त्र समजून घेतले. नाहीतर मीही आणखीन एक निर्बुद्ध बुद्धीप्रामाण्यवादी झालो असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
मन आणि बुद्धी यांना घालवणे सोपे आहे; पण देहबुद्धी घालवणे कठीण आहे ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
मी गुरुसेवा करत आहे’, असा भाव असला, तर समष्टी साधना चांगली होऊन त्याबरोबर व्यष्टी साधनाही होते ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सनातन संस्थेमध्ये विद्यावाचस्पती (पीएच्.डी.), आधुनिक वैद्य, अभियंते यांसारखे उच्च विद्याविभूषित साधक त्यांची नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करत आहेत. नोकरीमध्ये त्यांना प्रतिदिन ८ – १० घंट्यांच्या कामासाठी प्रतिमास सहस्रो रुपये पगार मिळत होता. सनातन संस्थेमध्ये नोकरीप्रमाणे पगार मिळत नसला, तरी हे साधक प्रतिदिन स्वतःहून नोकरीपेक्षा अधिक घंटे सेवा करतात. याचे कारण हे की, त्यांना नोकरीच्या ठिकाणी … Read more
‘काही इतर धर्मीय हिंदूंना चिडवतात, ‘देव एकच आहे, तर तुमच्या धर्मात अनेक देव कसे ?’ अशा अभ्यासशून्य व्यक्तींच्या हे लक्षात येत नाही की, हिंदु धर्म सर्वांत परिपूर्ण असा धर्म आहे. पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राचे उदाहरण घेतले, तर हे लक्षात येईल की, पूर्वी विविध रोगांवर असलेली औषधे मर्यादित संख्येची होती. विज्ञानाने प्रगती केली, तशी औषधांची संख्या बरीच वाढली. … Read more
‘ईश्वर सर्वज्ञानी आहे. आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचे असल्यामुळे आपण सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आवश्यक असते. कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्ञान मिळवणे, ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. आपण कितीही शिकलो, तरी ते अल्पच असते. आपण शिकत असतांना ‘मी अज्ञानी आहे’, याची जाणीव ठेवून ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया केली पाहिजे. त्यामुळे ‘मी’पणा अल्प होणे … Read more
‘बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु धर्मातील कर्मकांडाला ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात; पण कर्मकांडाचा अभ्यास केला, तर त्यात प्रत्येक गोष्टीचा किती सखोल अभ्यास केला आहे, हे लक्षात येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले