भक्त प्रल्हादासारखी खडतर साधना करणारा साधकच या आपत्काळात जिवंत राहील !

आपत्काळाची तीव्रता आता इतकी वाढत चालली आहे की, जे देवाचे खरे भक्त असतील, तेच या कठीण काळात टिकाव धरू शकतील. देवाने आता अशी चाळण लावली आहे की, ‘जे समष्टीचा विचार करून साधना करतील आणि ज्यांची देवावर पूर्ण श्रद्धा असेल, त्यांनाच तो पुढे घेऊन जाणार आहे. नाहीतर, आता ‘सुक्यासह ओलेही जळते’, या उक्तीप्रमाणे कधीतरी छंद म्हणून … Read more

आता केवळ रामराज्य हवे !

‘भारतातील लोकशाहीचा स्वातंत्र्योत्तर ७४ वर्षांचा इतिहास पहाता ‘आता राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षासाठी कोणत्याही भ्रष्ट आणि दुराचारी राजकीय पक्षाचे राज्य नको, तर केवळ रामराज्य हवे’, असे वाटते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बुद्धीचा वापर, हेच ज्ञानयोगानुसार साधना करतांना प्रगती जलद न होण्याचे कारण !

‘ज्ञानयोगामध्ये ‘का ? कशासाठी ?’ या प्रश्नांच्या माध्यमातून ज्ञान मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी बुद्धी सतत कार्यरत असते. त्यामुळे बुद्धीलय होण्यास अधिक वेळ लागतो. अन्य साधनामार्गांमध्ये ‘सांगितलेले केवळ कृतीत आणणे’, इतकेच असते. त्यात प्रारंभापासूनच बुद्धी कार्यरत नसते. त्यामुळे बुद्धीलय लवकर होतो. यामुळेच ज्ञानयोगाच्या तुलनेत अन्य साधनामार्गांमध्ये आध्यात्मिक प्रगती जलद होते.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (४.१.२०२२)

अनुभूती विकत घेता येत नाही, तर त्यासाठी पात्र व्हावे लागते !

‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. आपण ज्या प्रमाणात किंवा ज्या टप्प्याची साधना (कृती) करू, त्या टप्प्याचे अध्यात्माचे विविध पैलू अनुभूतींच्या माध्यमातून लक्षात येऊ लागतात. प्रत्येक टप्प्याची अनुभूती येण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात साधना करून त्यासाठी सक्षम (पात्र) असणेही आवश्यक असते. कुणालाही पैसे देऊन अनुभूती विकत घेणे शक्य नसते. दुसरे म्हणजे एखाद्याने पात्रता नसतांना ती घेण्याचा प्रयत्न … Read more

निवडणुका हा पोरखेळ झाला आहे

‘निवडणुकीसंदर्भात प्रतिदिन येणार्‍या बातम्या वाचून वाटते, ‘आता निवडणुका हा पोरखेळ झाला आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राजकीय पक्ष आणि साधक यांच्यातील भेद !

‘तत्त्वशून्य राजकीय पक्ष जनतेला खूश करून निवडून येण्यासाठी काहीही करतात, तर साधक केवळ ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी कठोर प्रयत्न करायला सिद्ध असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधनेच्या प्रयत्नांची ताकदच आपत्काळात आपल्याला तारून नेईल !

‘साधनेसाठीच्या अनुकूल परिस्थितीत साधनेचे प्रयत्न चांगले होतात. साधनेसाठीच्या प्रतिकूल परिस्थितीत मात्र साधनेचे प्रयत्न चांगले होणे, हे साधनेच्या प्रयत्नांच्या ताकदीवर अवलंबून असते. ही ताकद प्रयत्नांची तळमळ आणि प्रयत्नांमधील नियमितता यांवर अवलंबून असते. ‘आगामी आपत्काळात कोणकोणत्या भीषण परिस्थितींचा आपल्याला सामना करावा लागेल’, याचा आपण आता अंदाजही करू शकत नाही. यासाठी आताच साधनेच्या प्रयत्नांची ताकद वाढवली, तरच आपण … Read more

साधना केल्याने आयुष्यभर आनंद मिळतो !

‘जेवतांना आवडीचे पदार्थ खातांना थोडा वेळ सुख मिळते. वासनेचे सुखही काही तासच टिकते. याउलट साधना करणार्‍याला आयुष्यभर आनंद मिळतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.१२.२०२१)

लोकांच्या प्रारब्धानुरूप समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना, म्हणजे त्यांना साधना न शिकवता केवळ वरवरची उपाययोजना काढणारे संत !

‘बरेच संत त्यांच्याकडे येणार्‍या भक्तांच्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक यांसारख्या अडचणी सोडवण्यावर भर देतात. वस्तुतः या सर्व समस्या व्यक्तीच्या प्रारब्धानुसार किंवा त्याला असणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासामुळे होत असतात. त्यावर मूळ उपायोजना म्हणजे संबंधितांनी साधना करणे. संतांनी स्वतःची साधना खर्च करून त्यांच्या भक्तांच्या अडचणी दूर केल्या, तर तो भक्त परावलंबी होतो आणि प्रारब्धभोग भोगण्यासाठी पुन्हा जन्माला … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्मातील विषय समजून घेण्याची जिज्ञासा नसते !

‘आंधळा म्हणतो, ‘दृश्य जग असे काही नाही.’ त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आणि बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतात, ‘सूक्ष्म जग’, भूते इत्यादी काही नाही’; कारण त्यांना सूक्ष्मातील विषय समजून घेण्याची जिज्ञासा नसते आणि त्यांच्यात सूक्ष्म जग अनुभवण्यासाठी जी साधना करावी लागते, ती करण्याची क्षमता नसते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव … Read more