प्रतिदिन रामायण अनुभवण्यातील आनंद घ्या !

‘अंतःकरणात सतत रामाशी अनुसंधान ठेवणे (रामाचा, म्हणजे देवाचा नामजप किंवा भक्ती करणे), अर्थात् रामाला अनुभवणे’, हे अंतर्-रामायण. ‘रामाप्रमाणे धर्मसंस्थापना, म्हणजे ‘साधना’ म्हणून रामराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करणे’, हे बाह्य-रामायण. या दोन्ही रामायणांचा परिपोष जीवनात होणे, म्हणजे रामायण खर्‍या अर्थाने अनुभवणे होय. प्रतिदिन रामायण अनुभवण्यातील आनंद घ्यायचा प्रयत्न करा !’ – (पू.) श्री. संदीप आळशी (१५.४.२०२१)

देवाच्या अनुसंधानात राहून केलेली सेवा देवाला आवडेल !

‘पुढीलपैकी कोणत्या साधकाची सेवा देवाला आवडेल ? एक साधक सेवा करतांना ‘चूक तर होणार नाही ना ?’, या विचाराने (भीतीने) सतर्क राहून एक प्रकारे ‘चुकांच्या’ अनुसंधानात राहून सेवा करतो, तर दुसरा साधक ‘देवाच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा देवच करवून घेत आहे, ती करतांना काही चुका झाल्यास, देव मला माझ्या स्वभावदोषांची जाणीव करून देत मला साधनेत … Read more

कुठे आदर्श प्रभु श्रीराम आणि कुठे आजचे अकार्यक्षम राजकारणी !

‘कुठे सहस्रो दावे प्रलंबित असतांना काही कृती न करणारी आतापर्यंतची सरकारे, तर कुठे जनतेतील एकाने केवळ संशय व्यक्त केल्यावर सीतेचा त्याग करणारे प्रभु श्रीराम ! यामुळे प्रभु श्रीराम अजरामर आहेत, तर राजकारण्यांना जनता काही वर्षांतच विसरते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देशाची स्थिती सुधारण्यासाठी आता केवळ साधकांचे राज्य आवश्यक

‘सरकारी कर्मचारी हे देशाची सेवा करण्यासाठी असतात. असे असले, तरी त्यांना पगार असतोच. त्यांना त्यांचा पगार अल्प वाटू लागला की, त्यांची लगेच आंदोलने आणि संप चालू होतात. काम करतांनाही त्यामध्ये कामचुकारपणा आणि भ्रष्टाचार असतो, तो निराळाच ! त्यामुळे ‘सध्याच्या काळात देशासाठी कुणी सरकारी कर्मचारी बिनपगारी नोकरी करील का ?’, असा प्रश्न हास्यास्पद ठरतो. याउलट राष्ट्र … Read more

आपल्याच मतदारकेंद्रातील जनतेला लुबाडणारे लोकप्रतिनिधी !

‘एखादा वडील झाला, म्हणजे त्याच्यावर मुलाचे उत्तरदायित्त्व असते. तो ते दायित्त्व पार पाडतो, म्हणजे त्या मुलाची सर्वतोपरी काळजी घेतो. याउलट निवडून आलेले बहुतेक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारकेंद्रातील जनतेला ‘लुबाडण्याचे एक हक्काचे स्थान’ समजतात !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

पोलीसखाते आणि प्रशासन यांची झालेली दुःस्थिती !

‘सध्याचे पोलीसखाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती पहाता पुढील काळात ‘भ्रष्टाचार न करणारा १ तरी पोलीस आणि सरकारी अधिकारी दाखवा आणि इनाम मिळवा !’, अशी जाहिरात आल्यास आश्चर्य वाटणार नाही ! ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारतात गुन्ह्यांची नोंद अल्प प्रमाणात होण्याचे कारण

‘बहुतेक जण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जात नाहीत; कारण त्यांना ठाऊक असते की, तेथे वेळ फुकट जाऊन कधीकधी पोलिसांच्या उद्धटपणामुळे अपमान सहन करावा लागेल आणि शेवटी फलनिष्पत्ती काहीच मिळणार नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातनचे कार्य प्रत्येक जिज्ञासूच्या उद्धारासाठी असणे !

‘भगवान त्याच्या केवळ एका भक्तासाठीही अवतार घेतो. याच तत्त्वाने सनातनचे कार्य चालू आहे, उदा. सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याला एखाद्या ठिकाणी चांगला प्रतिसाद नसला, तरी त्या भागातील एका जिज्ञासूसाठी तेथे कार्य केले जाते. त्या एका जिज्ञासूची आध्यात्मिक प्रगती होणे महत्त्वाचे आहे. एखादा ग्रंथ प्रकाशित केल्यावर त्याची खूप विक्री झाली नाही, तरी चालेल; पण ‘ज्या जिज्ञासूला तो आवश्यक … Read more

आपल्यातील गुण ओळखून त्यांचा ईश्वराच्या सेवेत योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे !

देवाने प्रत्येकाला काहीतरी चांगले गुण दिलेले असतात. स्वतःमधील त्या दैवी गुणांना ओळखून त्यांचे संवर्धन करायला हवे. या गुणांचा देवाची सेवा, समष्टी सेवा आणि गुरुकार्य करणे यांसाठी लाभ करून घेता आला पाहिजे, तरच ईश्वराने आपल्याला देऊ केलेल्या या गुणांचे सार्थक झाल्यासारखे होईल. गुणसंवर्धनाने आपल्यातील साधनेचा उत्साह वाढल्याने मन अधिकाधिक सकारात्मक बनते. मनोबळ वाढले की, सेवाही चांगली … Read more

‘सेवेचे दायित्व घेणे, म्हणजे काय ?’, याची जाणीव होण्यासाठी मनाला पुढील प्रश्न विचारणे आवश्यक !

‘देवाने माझ्यावर सेवेचे दायित्व दिले आहे. त्या अनुषंगाने माझ्याकडून सेवा होत आहे ना ? मी देवाला अपेक्षित अशी सेवा करत आहे ना ? ‘सेवेतून पूर्ण फलनिष्पत्ती मिळून सेवेच्या माध्यमातून साधनेचे ध्येय गाठणे’, या अनुषंगाने माझी सेवा चालू आहे ना ? ‘ही सेवा मला गुरूंच्या कृपेने मिळाली आहे’, याची सतत जाणीव ठेवून मी सेवेतून आनंद मिळवण्यासाठी … Read more