व्यवहार आणि अध्यात्म

‘व्यवहारामध्ये ‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये’, असे सांगितले जाते; परंतु अध्यात्मात साधनेसाठीच्या प्रयत्नांचा जितक्या प्रमाणात अतिरेक करू, त्याचा अधिकाधिक लाभच होत जातो आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.१२.२०२१)

संतांचे चैतन्य !

‘संतांच्या चैतन्यामुळे त्यांच्या संपर्कातील निर्जीव वस्तूतही सकारात्मक पालट होतो, तर त्यांच्या शिष्यांमध्ये होणार नाही का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.१२.२०२१)

ध्यानाचे लाभ आणि तोटे

ध्यानामुळे व्यष्टी साधना होते; पण समष्टी साधना होत नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.११.२०२१)

‘साधनेविना ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ करणे अशक्य आहे’, हेही न कळणा-या हिंदुत्वनिष्ठ संघटना !

‘बहुतांश हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्य हे शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील आहे. त्यांच्या कार्याला साधनेने मिळणार्‍या आध्यात्मिक बळाचा काहीच आधार नाही. अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भात बोलतात; पण त्यांच्या लक्षात येत नाही की, हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. साधनेविना ईश्वराचा आशीर्वाद मिळत नाही आणि ईश्वराच्या आशीर्वादाविना काहीच साध्य होऊ शकत नाही. त्यांना ‘हिंदु … Read more

जन्मभर आणि मृत्यूनंतरही काळजी घेणा-या देवाला विसरणारे वयोवृद्ध !

‘म्हातारपणी मुलगा-सून काळजी घेतात; म्हणून त्यांचे कौतुक करणारे वयोवृद्ध जन्मभर आणि मृत्यूनंतरही काळजी घेणार्‍या देवाला मात्र विसरतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.११.२०२१)

अध्यात्मशास्त्र आणि विज्ञान यांमधील भेद !

‘सच्चिदानंद ईश्वराची प्राप्ती कशी करायची, हे अध्यात्मशास्त्र सांगते, तर ‘ईश्वर नाहीच’, असे काही विज्ञानवादी, म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी ओरडून सांगतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भक्ताला अहंभाव नसणे

‘मी साधना करतो’, असा भक्ताला अहंभाव नसतो; कारण ‘त्याच्याकडून सर्व काही, म्हणजे साधनाही देवच करवून घेतो’, हे त्याला ज्ञात असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.११.२०२१)

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पाश्चात्त्य संशोधनाचा फोलपणा !

‘एखाद्या व्यक्तीच्या जीवनात असे का घडते ?, तसेच प्रारब्ध, वाईट शक्ती, सात्त्विकता इत्यादी शब्दही ज्ञात नसलेले पाश्चात्त्य संशोधन वरवरचे आहे, म्हणजे पोरखेळ आहे ! अशा पाश्चात्त्यांचे हिंदू अनुकरण करतात, हे हास्यास्पद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘आंधळे’ बुद्धीप्रामाण्यवादी !

‘एखाद्या आंधळ्याने दृश्याचे वर्णन करावे, याप्रमाणे धर्माचे शून्य ज्ञान असलेल्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे धर्मासंदर्भातील बोलणे असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले