ईश्वराचे सगुण रूप असलेल्या संतांमध्ये देवच असल्याने ते इतरांसाठी आधारस्तंभ असणे

ईश्‍वराचे सगुण रूप असलेल्या संतांमध्ये देवच असल्याने ते इतरांसाठी आधारस्तंभ बनणे, आपणही त्यांच्यासारखे साधनेने सक्षम बनून इतरांंचा आधार बनणे आवश्यक ! ‘स्वतःला एवढे सक्षम करा की, तुमचा इतरांना आधार वाटायला हवा. एवढे छान प्रयत्न (साधना) करा की, तुम्ही दुसर्‍यांचा आधार बना; कारण तुमच्या साधनेमुळे इतरांना तुमच्यात असणार्‍या ईश्‍वरी तत्त्वाचाच आधार वाटू लागतो. मानव मानवाला आधार … Read more

तळमळीने साधना करून भगवंताची लीला अनुभवण्यातच खरा आनंद असणे

‘आपण कधीही काही कमवत नाही आणि गमावतही नाही; कारण प्रत्येक कर्म करणारा कर्ता-करविता तर ईश्‍वरच आहे. मग कसले दुःख आहे ? त्या जगाच्या पालनकर्त्यावर सर्व सोडून द्या आणि निर्धास्त मनाने साधना करा आणि पहा तर खरं, तो आपल्यासाठी काय काय करतो ते ! भगवंताची लीला अनुभवण्यातच खरा आनंद आहे. तळमळीने साधना करण्याचे दायित्व केवळ आपले … Read more

उच्च विचारांमध्ये कमालीची सकारात्मक ऊर्जा साठवलेली असते

उच्च विचारांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे आणि त्यांमुळे दैवी कार्य घडत असल्याने मनाला त्यांचे खाद्य देऊन ते निरोगी ठेवावे ! ‘आयुष्यात कधीही स्वतःला न्यून लेखू नका. कनिष्ठ विचार करू नका. नकारात्मकतेत जाऊ नका. त्याऐवजी उच्च आणि व्यापक विचारांनी मोठे व्हा. उच्च विचारांमध्ये कमालीची सकारात्मक ऊर्जा साठवलेली असते. ही ऊर्जा तुमच्या मनाला चांगले कार्य करण्यासाठी प्रभावित … Read more

स्वतःतील उणिवा दूर केल्यामुळे होणारा आत्मसूर्याचा साक्षात्कार !

जो दुसर्‍याच्या उणिवा काढण्यात चांगल्या प्रकारे निपुण असतो, तसाच जर तो स्वतःतील उणिवा समजून घेऊन त्या काढण्यात निपुण झाला, तर तो मुक्त का होणार नाही ? ‘दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही’. ‘स्वाज्ञान जानि नो विरला ।’ स्वतःचे दुर्गुण जागरूकतेने जाणून घेणे ! त्याने जर जागरूकतेने स्वतःमधील दुर्गुण जाणून घेतले आणि … Read more

ईश्वरी नियोजनानुसार योग्य वेळी मनुष्याला त्याच्या पाप-पुण्याचे फळ मिळते

‘वरकरणी जरी ‘भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नही’, असे वाटत असले, तरी देवाच्या घरी उशीरही नाही आणि अंधारही नाही, तर ईश्‍वरी नियोजनानुसार अगदी वेळेवर (योग्य वेळेतच) मनुष्याला त्याच्या पाप-पुण्याचे फळ मिळते.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

किती जन्म घेऊ देवा !

‘किती जन्म घेऊ अभ्यास करण्या, ज्ञान तुझे अनंत । ज्ञानाऐवजी तूच मला हवास, देवा अनंता ।।’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.१.२०२२)

संतांप्रती भाव असण्याचे महत्त्व !

‘आपण संतांच्या केवळ चरणांना स्पर्श करून भावपूर्ण नमस्कार करतो. तेव्हा त्यांच्या चरणांमधून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्याने आपल्याला लाभ होतो. याउलट मर्दन करणारे संतांचे संपूर्ण अंग रगडतात; पण त्यांच्यात संतांप्रती भाव नसल्याने त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१०.२०२१)

पोलिसांनो, निर्दाेष व्यक्तीला त्रास दिल्याचे पाप लागू नये, म्हणून प्रतिदिन अधिकाधिक साधना करा !

‘पोलिसांचा प्रतिदिन गुन्ह्यांशी संबंधित अनेक संशयितांशी संपर्क येतो. या संशयितांकडून गुन्ह्याच्या संदर्भातील आवश्यक ती माहिती मिळवण्यासाठी प्रसंगी कठोर होऊन त्यांना मानसिक आणि शारीरिक दंडही द्यावा लागतो. हा त्यांच्या कार्यशैलीचा एक भाग असतो. चौकशीअंती एखादी संशयित व्यक्ती निर्दाेष असल्याचेही लक्षात येते; पण कर्मफलन्यायानुसार पोलिसांना त्या निर्दाेष व्यक्तीला दिलेल्या दंडाचे पाप लागते अन् त्या व्यक्तीबरोबर केलेल्या गैरवर्तणुकीमुळे … Read more