प्रारब्ध संपवण्याचे महत्त्व, पाप-पुण्य आणि कर्मफल !

१. इतरांमुळे प्रारब्धभोग संपण्यास साहाय्य होणे ‘एखादी व्यक्ती, उदा. पती, पत्नी, शेजारी, नातेवाईक अथवा अन्य आपल्याशी अयोग्य प्रकारे वागतात’, असे आपल्याला वाटते. प्रत्यक्षात ते आपल्या प्रारब्धानुसार आपल्या जवळ आलेले असतात आणि ‘बुद्धी प्रारब्ध सारिणी’ या उक्तीनुसार ते तसे वागून आपल्याशी असलेले देवाण-घेवाण हिशोब संपवत असतात. अशा प्रकारे ते आपले प्रारब्धभोग भोगून संपवण्यास साहाय्य करत असतात. … Read more

दुःख कुणीही पचवू शकणे; मात्र कौतुक पचवता न येणे आणि ते केवळ गुरुकृपेनेच शक्य होणे !​

कष्ट सहन करून दु:खाला सामोरे जाता येऊ शकते; पण जेव्हा आपले कौतुक होते, तेव्हा मात्र जिवाचे कर्तेपण वाढून ‘अहं’ जोपासला जाऊ शकतो. हा ‘अहं’ आपल्याला पुन्हा अधोगतीकडे नेण्यास कारण ठरतो. श्री गुरु साधकाला याची वेळोवेळी जाणीवही करून देतात आणि साधकाला ‘अहं’चा बळी होण्यापासून वाचवतात. दुःख असो वा कौतुक या दोन्ही गोष्टी मायेतील मृगजळासमानच आहेत. श्री … Read more

चराचरातील गुरुतत्त्व पहाता आल्याने सतत शिष्यभावात रहाता येऊन चिरंतन आनंदाकडे वाटचाल करता येणे, म्हणजेच ‘गुरुकृपा’ होणे !

‘सतत इतरांकडून शिकणे, म्हणजे अखंड ‘शिष्यभावात’ रहाणे. यामुळे चराचरात प्रत्येक ठिकाणी गुरुतत्त्वाला पहाणे शक्य होते. शिष्यभाव साधकाला श्री गुरूंच्या देहापलीकडे असलेल्या चैतन्याची जाणीव करून देतो. प्रत्येकालाच ‘गुरु’ या भावाने पाहिल्याने साधकाला कुणाविषयी प्रतिक्रिया येत नाहीत. त्यामुळे त्याच्या अपेक्षा संपतात आणि आपोआपच त्याचे मायेत अडकणेही संपते. मायाच संपुष्टात आल्याने साधकाला चिरंतन अशा शाश्‍वत आनंदाच्या दिशेने वाटचाल … Read more

बोलतांना वाणीही शिष्यभावात म्हणजे नम्र असण्याचे महत्त्व !

१. आपल्या वाणीमुळेच दुसर्‍याची वाणी आपल्याला ‘तथास्तु’ म्हणत असल्यामुळे बोलतांना अतिशय सांभाळून बोलावे ! : ‘आपल्या प्रत्येक कृतीत शिष्यभाव असायला हवा. इतरांशी बोलतांना आपली वाणीही शिष्यभावात असायला हवी, म्हणजेच नम्र असायला हवी. आपल्या वाणीमुळेच दुसर्‍याची वाणी आपल्याला ‘तथास्तु’ म्हणत असते. त्यामुळे बोलतांना अतिशय सांभाळून बोलावे. कुणालाही वावगे बोलू नये. तोंडातून अपशब्द काढू नयेत. २. शब्द … Read more

परिस्थिती स्वीकारणे

‘परिस्थिती साधकाला घडवत असते. परिस्थिती स्वीकारली की, तो घडतो, म्हणजेच त्यातून त्याची साधना होते. स्वीकारले नाही, तर तो बिघडतो. म्हणजेच त्याच्या मनामध्ये विकल्प येऊन तो देवापासून दूर जातो. १. निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारल्यास देवाची कृपा निश्‍चितच होते ! निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे देवाने आपल्यासाठी दिलेला प्रसाद आहे. तो प्रसाद या भावाने ग्रहण केल्यास (म्हणजे निर्माण … Read more

व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग

१. ‘सर्वांचेच अधिकार सारखे नसतात. नियम हे सर्वसाधारण माणसांच्या धोरणाने आखलेले असतात. एकच नियम सर्वांना लागू पडत नाही. पूर्वार्जिताप्रमाणे स्वभाववैचित्र्य असते. उत्तम आचार जरी असला, तरी एक आचार सर्वांनाच लागू होत नाही. २. ‘न हि सर्वहितः कश्‍चित् आचारः सम्प्रवर्तते ।’ – महाभारत, पर्व १२, अध्याय २६६, श्‍लोक १७ अर्थ : सर्वांसाठी हितकर असेल, असा कोणताही … Read more

परेच्छेने किंवा ईश्वरेच्छेने वागणे

‘परेच्छेने किंवा ईश्‍वरेच्छेने वागतांना आरंभी त्याचा त्रास झाला, तरी त्यातून साधना होते आणि पुढे त्यातून आनंदाची प्राप्ती होते.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

गुरूंना आवडणारी खरी गुरुदक्षिणा कोणती ?

ज्या गुरूंनी जन्मोजन्मी आपल्यासाठी कष्ट घेतले आहेत, त्यांना ‘स्वतः उत्तम शिष्य बनून दाखवणे’, हीच खरी त्यांना आवडणारी गुुरुदक्षिणा असणे ‘आतापर्यंत गुरूंनी आपल्यासाठी पुष्कळ कष्ट घेतले आहेत. ‘आपल्या अनेक पूर्वजन्मांमध्ये गुरूंनी आपल्याला कसे सांभाळले असेल ?’, याविषयी कल्पना करणेही कठीण आहे. त्यांनीच आपल्याला जीवनात क्षणोक्षणी सावरले आहे. त्यांच्या अनंत जन्मांच्या कृपेमुळेच आज आपण या देवमार्गाला लागलो … Read more

मन आणि बुद्धी यांच्या एकत्रित संगमाने केलेली सेवा ‘परिपूर्ण सेवा’ होऊन आनंद मिळताे

‘आपण तत्त्वरूपाने जे शिकलो, ते आता कृतीत आणणे आवश्यक आहे. केवळ शिकण्यातून मन सकारात्मक बनते; परंतु शिकलेले प्रत्यक्ष कृतीत आणले, तर बुद्धीही मनासोबत सेवा करू लागते. ‘मन आणि बुद्धी’ यांच्या एकत्रित संगमाने निर्माण झालेली ऊर्जा तुम्हाला सेवेतून पूर्ण फलनिष्पत्ती मिळवून देते. यालाच ‘परिपूर्ण सेवा करणे’, असे म्हणतात. परिपूर्ण सेवा करण्याचा संस्कार अंगी बाणवला असता ‘मन … Read more

आपत्काळात देवानेही आपली आठवण काढावी, यासाठी आतापासूनच साधना करा !

‘आपत्काळात आपल्याला पुढारी, राजकारणी, नटनट्या, कलाकार, साहित्यिक, गायक यांपैकी कुणाचीच आठवण येत नाही, तर आठवतो तो केवळ ईश्‍वर; परंतु आपत्काळात त्या देवानेही तुमची आठवण काढली पाहिजे, यासाठी आतापासूनच साधना करा !’ – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ