राष्ट्र आणि धर्मप्रेम !

‘व्यक्तीगत प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम करून पहा. त्यात अधिक आनंद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

…तरच हिंदूंमध्ये अभिमान जागृत होईल !

‘भारत ९०० वर्षे पारतंत्र्यात असल्याने हिंदूंच्या कित्येक पिढ्या गुलामगिरीत जगल्या. आता मनातील गुलामगिरीचे विष नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची (ईश्‍वरी राज्याची) स्थापना करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे केल्यावरच ४ – ५ पिढ्यांत राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी हिंदूंमध्ये अभिमान जागृत होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

साधनेच्या प्रवासात अखंड सावधानता असणे आवश्यक आहे

१. महर्षींनी साधकांना श्रद्धा वाढवायला सांगितल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना ‘विविध त्रास होत असतांनाही साधक साधना करतच आहेत, अजून किती करणे अपेक्षित आहे ?’, असा प्रतिप्रश्न विचारणे ​ ‘एकदा एका नाडीपट्टीवाचनामध्ये महर्षींनी साधकांना उद्देशून सांगितले, ‘‘साधकांची देवावरील श्रद्धा अजून वाढायला हवी.’’ यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘या आपत्काळातही तीव्र त्रासांमध्ये माझे साधक … Read more

मानवाचा संसाराशी तात्कालिक संबंध

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे । समेत्य च व्यपेयातां कालमासाद्य कञ्चन ॥ -रामायण, काण्ड २, सर्ग १०५, श्‍लोक २६ अर्थ : ज्याप्रमाणे महासागरात वहात जाणारी दोन लाकडे कधी एकमेकांना भेटतात आणि काही काळाने विलग होतात, त्याप्रमाणे दोन माणसे काही काळासाठी एकत्र येतात आणि कालचक्राच्या गतीने विलग होतात. ‘कुठून तरी या संसारात एकत्र आलेले, … Read more

आहाराचा मनावर होणारा परिणाम !

‘आहार पवित्र अथवा अपवित्र असल्यामुळे तो खाल्ल्यामुळे आपले मनही पवित्र अथवा अपवित्र बनते. भोजन करतांना उद्भवणारे मानसिक संस्कार आणि विचारांचे प्रकार यांचा खाल्लेल्या अन्नावर परिणाम होऊन मनाची विशिष्ट स्थिती होते. शुद्ध आहार, शुद्ध वृत्तीच्या मनुष्याकडून झालेली शुद्ध पाकसिद्धी, भोजनाच्या पंक्तीतही आपल्या नुसत्या दर्शनाने सद्भाव उत्पन्न करू शकणार्‍या उच्चकोटीतील आदर्श व्यक्तींची उपस्थिती आणि त्या समवेतच त्या … Read more

साधनेत आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होण्यासाठी ‘सेवा परिपूर्ण करणे’ अतिशय महत्त्वाचे आहे !

रामनाथी आश्रमात नामजपादी उपाय करण्यासाठी, तसेच एका हवन विधीची सिद्धता म्हणून एका पुरोहितांनी सांगितलेले महत्त्वाचे पूजा साहित्य एका साधकाने खोक्यातून चेन्नईहून रामनाथी आश्रमात पाठवले होते. हे साहित्य पाठवल्यावर त्याचा योग्य तो पाठपुरावा संबंधित साधकाकडून घेतला गेला नाही. तेव्हा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘साधनेत परिपूर्ण सेवा करण्याला अतिशय महत्त्व आहे. आपण जी सेवा करतो, त्या … Read more

लोकांचे एकमेव ध्येय ‘सुखप्राप्ती’ !

‘विश्व ही सुखाची एक प्रयोगशाळा आहे. येथे जो प्रयत्न केला जातो, तो एका सुखप्राप्तीसाठीच. जगातील सर्व लोकांचे एकमेव ध्येय कोणते असेल, तर ते ‘सुखप्राप्ती’ हेच होय. असे अगदी ठळक अक्षरांनी लिहून दाखवता येईल.’ यःकश्चित् सौख्यहेतोः त्रिजगति यतते नैव दुःखस्य हेतोः ॥ – शतश्लोकी, श्लोक १५ अर्थ : या त्रैलोक्यात प्रत्येक जण सुखासाठी प्रयत्न करत असतो, … Read more

दुसऱ्या कुणामुळे आपल्याला सुख-दुःख वाटणे, ही कुबुद्धी (चुकीचे) असून ‘मी करतो, मला येते’, असे वाटणे हा वृथा अभिमान असणे

१. ‘आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक बऱ्या-वाईट घटना आणि प्रसंग यांसाठी आपण इतरांना उत्तरदायी समजत असतो; परंतु ‘जे घडत असते, ते केवळ आपल्या प्राब्धानुसार घडत असते. आपल्याच कर्माचे ते फळ असते’, हे समजून घेतल्यास इतरांविषयी येणाऱ्या प्रतिक्रिया अल्प होऊ शकतात. २. मनुष्य पराधीन (ईश्वराधीन) आहे. कर्मयोगातील प्रसिद्ध श्लोक, तरी दुसरे काय सांगतो ? पुढील श्लोकातून हे … Read more

लोका सांगे ब्रह्मज्ञान !

‘राष्ट्र-धर्मासंदर्भात इतरांना ‘काहीतरी करा’, असे शिकवणारे; पण स्वतः काही न करणारे पत्रकार ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥’ या गटात येतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

अन्नरसांचा प्रकृतीवर उत्तम परिणाम होण्यासाठी नामजप करत जेवणे श्रेयस्कर !

‘अन्न हे पवित्र घरचे आणि पवित्र भावनेने केलेले अन् पवित्र धान्यांचे असावे. अन्नाप्रमाणे मन बनते. जेवतांना चालू असलेल्या विचारांचे संस्कार अन्नरसावर होतात आणि तेच पुढे आपल्या प्रकृतीतही रुजू लागतात. आपणास इतर काही साध्य झाले नाही, तर जेवणास बसण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवून नामस्मरण करत वायफळ न बोलता, वाईट न ऐकता, ध्यानातच मन ठेवून अथवा पवित्र अध्यात्म … Read more