ईश्वरप्राप्तीच्या प्रवासात गुरुच साधकांसाठी अधिक प्रमाणात प्रयत्नशील असतात
जो साधक ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्म करत रहातो, तो चुकला, तरी चालेल; गुरु त्या जिवाचा स्वीकार करतात आणि त्याला शिष्य बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. ईश्वरप्राप्तीच्या प्रवासात केवळ साधकच नाही, तर त्याहूनही अधिक गुरुच त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात. -श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)