ईश्वरप्राप्तीसंदर्भात मनुष्याची लाजिरवाणी उदासीनता !
‘धनप्राप्ती, विवाह, आजारपण इत्यादी अनेक कारणांसाठी अनेक जण तोडगे विचारतात; पण ईश्वरप्राप्तीसाठी तोडगा विचारण्याचा कोणी विचारही करत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘धनप्राप्ती, विवाह, आजारपण इत्यादी अनेक कारणांसाठी अनेक जण तोडगे विचारतात; पण ईश्वरप्राप्तीसाठी तोडगा विचारण्याचा कोणी विचारही करत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्याला केवळ त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्राने नोकरी न देता त्याचे वैयक्तिक गुण पाहूनही निवड करणे आवश्यक आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘जगात अनेक विषयांच्या अनेक पदव्या आहेत. ‘डॉक्टरेट’ सारख्या अनेक उच्च स्तरावरच्या पदव्या आहेत; मात्र त्यांपेक्षाही सर्वश्रेष्ठ पदवी आहे, ‘खर्या गुरूंचा ‘खरा शिष्य’ ! ’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘पूर्वी समाजात असलेली सात्त्विकता, सामंजस्य, प्रेमभाव इत्यादी गुणांमुळे समाजव्यवस्था नीट रहावी; म्हणून काही करावे लागायचे नाही. आता समाजात ते घटक निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षण दिले जात नसल्यामुळे कायद्याचे साहाय्य घेऊन समाजव्यवस्था नीट रहाण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जातो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘अनेक नवरा-बायको आयुष्यभर भांडत असतात आणि मग म्हातारपणी ‘या त्रासावर उपाययोजना, म्हणजे केवळ साधनाच आहे’, हे त्यांच्या लक्षात येते. त्या वेळी ‘आयुष्यभर साधना केली नाही’, याचा पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘साधनेचे प्रयत्न करतांना प्रथम बुद्धीच्या स्तरावर ‘देवच माझ्या माध्यमातून सर्व करत आहे’, असा भाव ठेवावा लागतो. साधना वाढली की, पुढे पुढे ‘देवच माझ्यातून सर्व करत आहे’, अशी अनुभूती येते. ‘देवाची अनुभूती घेणे, म्हणजेच देवाला अनुभवणे’, हेच खरे अध्यात्म आहे !’ – (पू.) संदीप आळशी (२६.१२.२०२२)
१. राजकारणातील क्षणभंगुरता अ. ‘एखादी व्यक्ती सत्तेवर असतांना तिला शासनाच्या वतीने सुख-सुविधा पुरवल्या जातात. त्या व्यक्तीला पोलिसांकडून संरक्षण दिले जाते. आ. त्या व्यक्तीचा पदाचा कालावधी पूर्ण झाला की, तिला दिलेल्या सुविधा काढून घेतल्या जातात. त्या व्यक्तीवर अकस्मात् पद (सत्ता) सोडण्याची वेळ आली, तर एका रात्रीत तिच्याकडे असलेले दायित्व काढून घेतले जाते आणि दुसर्या व्यक्तीला दायित्व … Read more
‘साधना’, म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी करावयाचे प्रयत्न ! अनेकजण साधना म्हणून त्या संदर्भातील अनेक ग्रंथांचा अभ्यास करतात. यामध्ये केवळ बुद्धीचा वापर होतो. साधनेच्या प्राथमिक टप्प्याला साधनेचे महत्त्व मनावर बिंबवण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. त्यामुळे या टप्प्यावर साधनेसाठी बुद्धीचे महत्त्व ७० टक्के आणि मनाचे महत्त्व ३० टक्के असते. साधनेचे महत्त्व कळल्यावर मात्र साधनेसाठी मनाच्या स्तरावरील प्रयत्न वाढवणे आवश्यक असते, … Read more
‘ज्ञानयोगानुसार साधना केल्यास ती प्रामुख्याने बुद्धीने होते. कर्मयोगानुसार साधना केल्यास ती शरीर आणि बुद्धी यांनी होते, तर भक्तीयोगानुसार साधना केल्याने ती मन, बुद्धी आणि शरीर यांद्वारे होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आपण तळमळीने साधनेचे प्रयत्न केले की, पुढे देवच ‘पुढचे प्रयत्न कोणते करायचे ?’, हे आतून सुचवतो. आपण बुद्धीने ठरवलेल्या प्रयत्नांपेक्षा देवाने सुचवलेले प्रयत्न आपल्याला साधनेत पुढे जाण्यासाठी अधिक योग्य असतात. हे प्रयत्न केल्यामुळे आपली साधनेची तळमळ आणखी वाढते. असे चक्र चालू रहाते. यावरून आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी साधनेत तळमळ आणि देवाचे साहाय्य यांचे असलेले महत्त्व लक्षात … Read more