म्हातारपण, म्हणजे दुसरे बालपण – ‘आई गं’ !

‘म्हातारपणी शरीर जर्जर होऊन कोणतीही हालचाल करतांना वेदना अनुभवयास येतात. त्या वेदनांमुळे आपोआपच तोंडातून ‘आई गं’ हा शब्द बाहेर पडतो ! लहान मुलाप्रमाणे म्हातारपणातही अशी आईची सतत आठवण काढणे, म्हणजे दुसरे बालपणच अनुभवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातनच्या साधनेचे वैशिष्ट्य

‘साधनेचे एक मूलभूत तत्त्व आहे, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग !’ अशी साधना केवळ सनातन संस्थाच शिकवते. प्रत्येकाचा साधनामार्ग, उदा. भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग इत्यादी आणि आध्यात्मिक पातळी, वय, शारीरिक क्षमता इत्यादी निरनिराळे असते. त्यामुळे प्रत्येकाची प्रकृती पाहून सनातनमध्ये प्रत्येकाला निरनिराळी साधना सांगितली जाते. डॉक्टर जसे प्रत्येक रुग्णाला निरनिराळे औषध देतात, विद्यार्थी जसे निरनिराळे शिक्षण घेतात, … Read more

सनातन संस्थेचे महत्त्व

‘मुलाने आणि काही इतरांनी कसे चालावे ? बोलावे ? आणि वागावे ? हे त्यांचे आई-वडील किंवा हितचिंतक त्यांना शिकवतात; पण ‘ते कृतीत कसे आणावे ?’, हे ते शिकवत नाहीत. ते सनातन संस्था शिकवते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

सध्याचा प्रतिकूल काळ म्हणजे आत्मचिंतन करण्याचा काळ आहे !

‘अनुकूल काळात नव्हे, तर प्रतिकूल काळातच साधकाच्या साधनेची खरी परीक्षा होते. आपत्कालीन स्थितीत आत्मपरीक्षण करण्याची नामी संधी असते. ‘अशा काळात आपली मनःस्थिती कशी आहे ? प्रतिकूलतेला सामोरे जाण्याची मनाची कितपत सिद्धता आहे ?’, याचे चिंतन करता येते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली अमूल्य शिकवण आपल्या अंतर्मनात खरोखरंच रुजली आहे का ?’, याचे मूल्यमापन करणेही सोयीचे जाते. … Read more

म्हातारपणाचा लाभ मृत्यूही हवासा वाटणे

‘म्हातारपणात शरीर कोणत्याही स्तरावर साथ देत नसले की, अंथरुणावर खिळून रहावे लागते. अशा स्थितीत ना पैसा कमावण्याची इच्छा होते ना आयुष्यभर स्वकष्टाने कमावलेला पैसा ‘खाणे, पिणे आणि फिरणे’ यांसारख्या सुखांसाठी खर्च करण्याची इच्छा होते. अशा वेळी आयुष्यभर नको असलेला मृत्यूच हवा-हवासा वाटू लागतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे शास्त्रज्ञ, तर कुठे ऋषि-मुनी !

‘कुठे परग्रहावर जाणारे यान शोधले की, विज्ञानाचे कौतुक करणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे सूक्ष्मदेहाने विश्‍वातच नाही, तर सप्तलोक आणि सप्तपाताळ यांतही क्षणार्धात सूक्ष्मातून जाऊ शकणारे ऋषि-मुनी !’ –सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सुखासाठी कर्तव्याकडे दुर्लक्ष करणारी सध्याची पिढी !

​‘सांसारिक जीवनात सर्वांत अधिक सुख नवरा-बायको हेच एकमेकांना देतात. त्यामुळे मोठेपेणी ते स्वतःच्या आई-वडिलांना सांभाळण्याचे कर्तव्य सोडून स्वतंत्र रहातात आणि त्यांच्याकडे जातही नाहीत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देवाच्या कृपेचे महत्त्व !

‘देवाची कृपा अनुभवल्यावर समाजातून कुणी कौतुक केले, तरी त्याची किंमत शून्य वाटते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘साधना’ हीच खरी लस

‘एखादा रोग होऊ नये; म्हणून लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करतो, तसेच तिसर्‍या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना हीच लस आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देश रसातळाला जाण्यामागील कारण !

‘प्रथम मोगल, नंतर इंग्रज आणि आता राष्ट्रप्रेम नसलेले विविध राजकीय पक्ष यांच्यामुळे देश रसातळाला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले