मनाला साधना करण्याचे वळण लावा !

‘ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।’, म्हणजे ‘मी यथोचित असेच सांगत आहे; सत्य तेच सांगत आहे.’ सत्य पालटू शकते, उदा. ‘देवदत्त तरुण आहे’, हे वाक्य आता सत्य असले, तरी देवदत्त वृद्ध झाल्यावर हे वाक्य असत्य ठरते; परंतु ऋत कधीही पालटत नाही, उदा. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. ऋत म्हणजे न पालटणारे नैसर्गिक सत्य. म्हणजे सत्य आणि … Read more

स्नेही सदाचारी असावा !

धनवान स्नेही दुराचारी असेल, तर तो कधीही तुमचा विश्वासघात करू शकतो; पण तुमचा स्नेही सदाचारी असेल, तर तो कितीही निर्धन असला, तरी नित्य तुम्हाला साथच देतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

सकारात्मकतेतील शक्ती !

घडणाऱ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले की, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आपले हितच आहे, याची जाणीव होते. नेहमी सकारात्मक बोलणारी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. नैराश्यपूर्ण विचारांची व्यक्ती समाजातील लोकांना नकोशी वाटते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

मायेचे आकर्षण

सततच्या दिव्याकडे कोणाचे लक्ष नसते. लुकलुकणार्‍या दिव्याकडे लक्ष जाते. भावार्थ : सततचा दिवा म्हणजे आत्मज्योत (ब्रह्म). ही स्थिर असते. लुकलुकणारा दिवा म्हणजे माया. तिच्याकडे सर्वांचे लक्ष चटकन वेधले जाते. (संदर्भ : प.पू. डॉ. आठवले संकलित सनातनचा ग्रंथ ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’)

धर्माचे महत्त्व !

‘धर्म पाप-पुण्य, धर्माचरण इत्यादी संदर्भांत शिकवतो. त्यामुळे मुळातच व्यक्ती सात्त्विक बनते. तिच्या मनात चुकीची गोष्ट करण्याचा विचारही येत नाही. ती पापभीरू बनते, म्हणजे पाप करण्याचे, चुकीची गोष्ट करण्याचे टाळते. त्यामुळे कायद्यांची आवश्यकताच नसते. सत्ययुगात असे होते. तेव्हा राजाही नव्हता आणि कायदेही नव्हते; कारण सर्व जण सात्त्विक असल्याने राजाची अन् कायद्यांची आवश्यकताच नव्हती. आपणही सर्वांना धर्म … Read more

हिंदु राष्ट्राची स्थापना ही ईश्वरनियोजित प्रक्रिया !

‘हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शारीरिक आणि मानसिक स्तरावर क्षात्रतेजाच्या संवर्धनाचे कार्य करत आहेत, तर संत आणि सनातन संस्थेसारख्या अन्य संघटना ब्राह्मतेजाच्या संवर्धनाचे कार्य करत आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना ही ईश्वरनियोजित प्रक्रिया आहे. ती काळानुसार पूर्ण होणारच आहे. आपण मात्र आपली साधना आणि हिंदु धर्माविषयीचे कर्तव्य म्हणून या प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे. ‘असे केल्याने आपली … Read more

मोक्षाचे अधिदैवत !

‘मोक्षाचे अधिदैवत म्हणजे सदगुरु !’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, ऑक्टोबर २००२)

ज्ञानोपदेश करणारे गुरु !

गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा. या दिवशी पाऊस असतोच. गुरुपौर्णिमा आणि पावसाळा यात काहीतरी समजून घेण्यासारखे आहे. पाऊस म्हणजे जलवर्षाव आणि जल म्हणजे जीवन. जीवनधारा तत्त्वांचा वर्षाव म्हणजे पावसाळा आणि याच वेळी गुरुपौर्णिमा येते. या दिवशी गुरुही जीवनधारा असे तत्त्व पावसाप्रमाणे वर्षतो. आत्मतत्त्वाचा म्हणजे आत्मज्ञानाचा वर्षाव करतो. पावसामध्ये सर्वसमत्व आहे. त्याचप्रमाणे गुरुही आप-पर, सुष्ठ-दुष्ट असे न … Read more

सकाम साधना आणि आनंदप्राप्तीसाठी साधना

‘एखाद्या इच्छेसाठी (सकाम उद्देशाने) कुणी साधना करत असल्यास साधनेमुळे त्याच्या मनातील ती इच्छा गेल्यावर ‘त्याची वासनापूर्तीसाठी साधना होत नाही’, तर आनंदप्राप्तीसाठी साधना होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्वरप्राप्ती लवकर कशी होईल ?

‘ईश्‍वरप्राप्‍तीसाठी तन-मन-धनाचा त्‍याग करायचा असतो. त्‍यामुळे आयुष्‍य धन मिळवण्‍यात फुकट घालवण्‍यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्‍याग केला, तर ईश्‍वरप्राप्‍ती लवकर होते.’ – (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले