साधना म्हणजेच आनंद !

‘साधना म्हणजेच आनंद ! साधनेतील आनंद अनुभवण्यासाठी त्या मार्गात येणार्‍या अडथळ्यांवर चिकाटीने मात करतो, तो खरा साधक !’ – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी रहाणे हे सातत्याने आचरणात आणायला हवे !

‘गुरुदेवांनी आपल्याला शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी रहाण्याचा मार्ग शिकवला आहे. तो आपण सातत्याने आचरणात आणायला हवा !’ – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

विज्ञान हे कधी समजून घेईल ?

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !

‘आपली शिकण्याची स्थिती अल्प असेल, तर साधनेच्या एका टप्प्यावर निरुत्साह येऊ शकतो. त्यामुळे साधकाने सतत शिकण्याच्या स्थितीत राहिले पाहिजे. सतत शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !’ – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

वरवरचे उपाय योजणारे शासनकर्ते !

‘निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी एकरूप झाल्यावरच खरी शांती अनुभवता येते. असे असतांना शासनकर्ते जनतेला साधना न शिकवता वरवरचे मानसिक स्तरावरचे उपाय करतात, उदा. जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी वरवरचे प्रयत्न करणे, मनोरुग्णालये स्थापन करणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योग्य आचार-विचार !

दुसऱ्याच्या आधाराची अपेक्षा करत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; म्हणूनच धडपडत का होईना; पण स्वत:च्या हिमतीवर उभे राहून स्वावलंबी होणे इष्ट ! – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

मानवी जीवन

परमेश्वराने देणगी दिलेल्या देहाचा उपयोग नेहमी सत्कर्मासाठी करावा. ‘इतरांच्या त्रासाला आपला देह कारणीभूत होणार नाही’, याची नेहमी काळजी घ्यावी. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

परमेश्वरावरील श्रद्धा !

परमेश्वरावरील श्रद्धा म्हणते, ‘हे कार्य देवच करू शकतो.’ त्यापेक्षा अधिक प्रमाणातील श्रद्धा म्हणते, ‘देव हे करीलच !’; पण परमेश्वरावरील परमश्रद्धा म्हणते, ‘हे काम झालेच आहे !’ – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

बाह्यरूपापेक्षा आत्म्याचे रूप महत्त्वाचे !

नुसते बाह्यरूपच देखणे असून काय उपयोग ? आत्माही तेवढाच देखणा हवा ! दिव्याची काच घासून पुसून ठेवली; पण त्यात ज्योतच नसेल, तर त्याचा काय उपयोग ? – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

खरा हितचिंतक !

‘अहो रूपम् अहो ध्वनिः ।’ म्हणजे ‘(गाढवाने उंटाला म्हणावे) वा ! काय रूप आहे आणि (उंटाने गाढवाला म्हणावे) वा ! काय आवाज आहे’, असे म्हणणारा कधीही मित्र नसतो. तुम्हाला तुमच्यातील दोष सांगणाराच तुमचा खरा मित्र आणि खरा हितचिंतक असतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन