वरवरचे उपाय योजणारे शासनकर्ते !

‘निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी एकरूप झाल्यावरच खरी शांती अनुभवता येते. असे असतांना शासनकर्ते जनतेला साधना न शिकवता वरवरचे मानसिक स्तरावरचे उपाय करतात, उदा. जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी वरवरचे प्रयत्न करणे, मनोरुग्णालये स्थापन करणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योग्य आचार-विचार !

दुसऱ्याच्या आधाराची अपेक्षा करत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; म्हणूनच धडपडत का होईना; पण स्वत:च्या हिमतीवर उभे राहून स्वावलंबी होणे इष्ट ! – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

मानवी जीवन

परमेश्वराने देणगी दिलेल्या देहाचा उपयोग नेहमी सत्कर्मासाठी करावा. ‘इतरांच्या त्रासाला आपला देह कारणीभूत होणार नाही’, याची नेहमी काळजी घ्यावी. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

परमेश्वरावरील श्रद्धा !

परमेश्वरावरील श्रद्धा म्हणते, ‘हे कार्य देवच करू शकतो.’ त्यापेक्षा अधिक प्रमाणातील श्रद्धा म्हणते, ‘देव हे करीलच !’; पण परमेश्वरावरील परमश्रद्धा म्हणते, ‘हे काम झालेच आहे !’ – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

बाह्यरूपापेक्षा आत्म्याचे रूप महत्त्वाचे !

नुसते बाह्यरूपच देखणे असून काय उपयोग ? आत्माही तेवढाच देखणा हवा ! दिव्याची काच घासून पुसून ठेवली; पण त्यात ज्योतच नसेल, तर त्याचा काय उपयोग ? – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

खरा हितचिंतक !

‘अहो रूपम् अहो ध्वनिः ।’ म्हणजे ‘(गाढवाने उंटाला म्हणावे) वा ! काय रूप आहे आणि (उंटाने गाढवाला म्हणावे) वा ! काय आवाज आहे’, असे म्हणणारा कधीही मित्र नसतो. तुम्हाला तुमच्यातील दोष सांगणाराच तुमचा खरा मित्र आणि खरा हितचिंतक असतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

मनाला साधना करण्याचे वळण लावा !

‘ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।’, म्हणजे ‘मी यथोचित असेच सांगत आहे; सत्य तेच सांगत आहे.’ सत्य पालटू शकते, उदा. ‘देवदत्त तरुण आहे’, हे वाक्य आता सत्य असले, तरी देवदत्त वृद्ध झाल्यावर हे वाक्य असत्य ठरते; परंतु ऋत कधीही पालटत नाही, उदा. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. ऋत म्हणजे न पालटणारे नैसर्गिक सत्य. म्हणजे सत्य आणि … Read more

स्नेही सदाचारी असावा !

धनवान स्नेही दुराचारी असेल, तर तो कधीही तुमचा विश्वासघात करू शकतो; पण तुमचा स्नेही सदाचारी असेल, तर तो कितीही निर्धन असला, तरी नित्य तुम्हाला साथच देतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

सकारात्मकतेतील शक्ती !

घडणाऱ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले की, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आपले हितच आहे, याची जाणीव होते. नेहमी सकारात्मक बोलणारी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. नैराश्यपूर्ण विचारांची व्यक्ती समाजातील लोकांना नकोशी वाटते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

मायेचे आकर्षण

सततच्या दिव्याकडे कोणाचे लक्ष नसते. लुकलुकणार्‍या दिव्याकडे लक्ष जाते. भावार्थ : सततचा दिवा म्हणजे आत्मज्योत (ब्रह्म). ही स्थिर असते. लुकलुकणारा दिवा म्हणजे माया. तिच्याकडे सर्वांचे लक्ष चटकन वेधले जाते. (संदर्भ : प.पू. डॉ. आठवले संकलित सनातनचा ग्रंथ ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’)