खरा बुद्धीवान !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रातील राजकारणी कसे असतील ?

‘हिंदु राष्ट्रात ‘स्वतःकडे सत्ता असावी’, अशा विचाराचे स्वार्थी आणि अहंभावी राजकारणी नसतील, तर ‘मानवजातीने साधना करून ईश्वरप्राप्ती करावी’, या विचाराचे धर्मसेवक आणि राष्ट्रसेवक असतील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वृक्षारोपण राजकारण्यांच्या हस्ते नको, तर संतांच्याच हस्ते करा !

‘वृक्षारोपण राजकारण्यांच्या हस्ते नको, तर संतांच्याच हस्ते करा ! जसे बी, तसे फळ येते; म्हणूनच राजकारण्यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना रज-तमात्मक अहंकाराची, तर संतांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना साधकत्व निर्माण करणारी फळे येतात !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

सेवा कशी करावी ?

अ. सेवा करतांना अहंचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू असते. अहंमुळे साधक सेवा करतांना मनाला वाटेल, तसे पालट करत असतो. यासाठी मनाचे न ऐकता उत्तरदायी साधकांना विचारून सेवा करायला हवी. आ. सेवा करतांना सेवेत मन पूर्णपणे एकरूप केले, तरच मनाचे अर्पण होऊन मनाचे प्रारब्ध अल्प होणार आहे. त्यामुळे मानसिक त्रासही न्यून होणार आहेत. इ. साधकांनी सेवा … Read more

सेवा करण्याचे महत्त्व !

साधकांचे तन, मन आणि बुद्धी अर्पण व्हावी, यासाठी सेवा आहे. साधकांतील अहं न्यून होण्यासाठी गुरुसेवा करणे आवश्यक आहे. ‘आपली तळमळ वाढावी, आपले मन आणि बुद्धी शुद्ध व्हावी, तसेच अहंचे निर्मूलन व्हावे’, यासाठी गुरुदेवांनी सर्व सेवा निर्माण केल्या आहेत. – पू. (सौ.) संगीता जाधव

मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील असल्याने केवळ तोच साधना करू शकतो !

‘मनुष्य वगळता अन्य सर्व प्राणी उपलब्ध अन्न ग्रहण करतात. मनुष्याला मात्र स्वतःसाठी अन्न बनवावे लागत असल्यामुळे मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील झाला. या कृतीशीलतेमुळेच केवळ मनुष्य साधना करू लागला आणि अन्य प्राणी आहे तसेच राहिले.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (५.४.२०२२)

सर्वव्यापक ब्रह्मांडाच्या नक्षत्रलोकातून येणारे सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे ज्ञान !

‘या ब्रह्मांडात अनेक नक्षत्रे आहेत. एका नक्षत्राचा एक कण म्हणजे मनुष्य वास करतो, ती भूमी होय ! एवढ्या मोठ्या नक्षत्राचा एक कण म्हणजे ही भूमी आहे, तर एक नक्षत्र किती मोठे असेल ? अशी अनंतकोटी नक्षत्रे असलेले ब्रह्मांड किती मोठे असेल ! सप्तर्षी जीवनाडीपट्टीतील ज्ञान अशा त्या सर्वव्यापक ब्रह्मांडाच्या नक्षत्रलोकातून आलेले आहे !’ – सप्तर्षी … Read more

मनुष्याने अधर्माचरणाची परिसीमा गाठल्यावर श्रीविष्णूचे सुदर्शनचक्र आपोआप सुटून नरसंहाराला आरंभ होईल !

१. शिशुपालाचे १०० अपराध भरल्यावर श्रीकृष्णाने त्याचा वध करणे १ अ. शिशुपालाच्या जन्माच्या वेळी झालेली आकाशवाणी जेव्हा शिशुपालाचा जन्म झाला, तेव्हा त्या बाळाला रूप नव्हते. ते बाळ म्हणजे काळ्या मांसाचा एक विकृत आकार होता. त्याला ३ डोळे आणि ४ हात होते. तेव्हा आकाशवाणी झाली, ‘एका दिव्य पुरुषाची दृष्टी या बाळावर पडली की, त्याला मूळ रूप … Read more

आस्तिक मनुष्याने नास्तिकाची संगत धरू नये !

बांबू उसासारखा दिसतो; मात्र आपण जसा ऊस खातो, तसा बांबू खाऊ शकत नाही. बांबू म्हणजे ‘नास्तिक’ आणि ऊस म्हणजे ‘आस्तिक’. देवावर श्रद्धा असणारे म्हणजे ‘मध’ आणि देवावर श्रद्धा नसणारे म्हणजे ‘साखर’. मध खाल्ल्याने रोग होत नाहीत. साखर अधिक खाल्ल्याने रोग होतात. या उदाहरणांतून असे लक्षात येते की, आस्तिक मनुष्याने नास्तिकाची संगत धरू नये ! – … Read more

अध्यात्म स्वतः अनुभवल्याविना त्यातील चैतन्याचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही !

ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध घेतल्याविना त्याचा सुगंध कळत नाही, त्याचप्रमाणे साधना करून अध्यात्माचा अनुभव घेतल्याविना मनुष्याने त्याविषयी बोलू नये. ज्याप्रमाणे फुलातील सुगंधाचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही, त्याचप्रमाणे अध्यात्मातील चैतन्याचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. – सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९२ (२९.१०.२०२१))