साधना कुणाची होते ?

जे साधक ध्येय निश्चित करून स्वतःकडून झालेल्या चुका स्वीकारतात, स्वतःच्या चुका लक्षात आल्यावर इतरांचे साहाय्य घेतात आणि इतरांच्या चुका लक्षात आल्यावर त्यांनाही साहाय्य करतात, त्या साधकांची साधना होत असते. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

आदर्श साधक कुणाला म्हणावे ?

जे साधक ईश्वरप्राप्तीच्या ध्येयासाठी मायेचा त्याग करायला सिद्ध आहेत, स्थुलातून शरीर अर्पण करत आहेत, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून मन समर्पित करण्याचा प्रयत्न करत आहेत, दुर्बुद्धीचा त्याग करून स्वतःचे तन, मन, बुद्धी अन् अहं अर्पण करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते ‘आदर्श साधक’ आहेत. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

वैज्ञानिक संशोधनाची मर्यादा !

‘विज्ञानातील संशोधनाचे ध्येय म्हणजे मानवाला ईश्‍वरप्राप्ती नव्हे, तर फक्त शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सुखप्राप्ती करून देणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हल्लीच्या पिढीची कृतघ्नता !

‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी कृतघ्न झालेल्या हल्लीच्या पिढीला आई-बाबांची मालमत्ता हवी असते; पण वृद्ध झालेल्या आई-बाबांची सेवा करायची नसते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

निरर्थक साम्यवाद

‘शरिराची ठेवण, स्वभावातील गुण-दोष, कला, बुद्धी, धन इत्यादी घटकांचे ७५० कोटींपैकी २ व्यक्तींमध्येही साम्य नसते. असे असतांना ‘साम्यवाद’ या शब्दाला काही अर्थ आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देवाप्रती भाव ठेवण्याचे महत्त्व

अ. आपण देवाचा एक हात धरला की, देव आपले दोन्ही हात धरतो. आ. श्रद्धेतून भाव आणि भावातून भक्ती असेल, तरच आपल्याला मुक्ती मिळू शकेल. इ. अध्यात्मात बुद्धी खुंटीला टांगून ठेवूया आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न करूया. – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये

सेवा करतांना लक्षात ठेवावयाची सूत्रे

अ. धर्माच्या कार्यात खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा उचलूया ! आ. सनातनचा एक जरी ग्रंथ प्रत्येक हिंदूच्या घरी गेला, तरी ते घर साधनारत होईल. इ. आपण ‘काही घेण्यासाठी नाही, तर पुष्कळ काही देण्यासाठी जात आहोत’, असा भाव ठेवून जिज्ञासूंना संपर्क करण्याच्या सेवेला जाऊया. ई. साधकाने पाठपुरावा केल्यानंतर झालेली सेवा देवाजवळ पोचत नाही. उ. एखाद्या सेवेचे … Read more

साधकत्व

अ. साधकांनो, स्वतःतील स्वभावदोषांचा त्याग करता आला पाहिजे. आ. लहान व्हायला शिका ! (साधनेत न्यूनता घ्यायला शिका !) इ. मनासारखे झाले, तर हरिकृपा आणि मनाच्या विरुद्ध झाले, तरीही हरीची इच्छा ! – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये

सत्संगाचे महत्त्व

जेव्हा तांदुळ कुंकवासह असतात, तेव्हा ते अक्षता होऊन देवाच्या चरणी जातात. जेव्हा तांदुळ डाळीसह असतात, तेव्हा त्यांची खिचडी होते. सत्‌चा संग मिळाला, तरच आपण देवाच्या चरणांशी जाऊ शकतो. – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये

हिंदु राष्ट्राच्या फलश्रुतीच्या संदर्भातील दृष्टीकोन !

‘जेव्हा हिंदु राष्ट्र येईल, तेव्हा आपण सर्व जण मागील बाकड्यांवर (बॅकबेंचर) बसलेले असू आणि हिंदु राष्ट्राचे विजय ढोलक वाजवणारे दुसरे कुणीतरी असतील ! आपल्याला केवळ समाधान असेल की, आपण काळानुसार कार्य केले.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले