परमात्म्याचे होण्यासाठी काय करावे ?

परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अतीदक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस; पण फळ देणारा मी आहे, ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे. ते तुला सर्व रोगांतून मुक्त … Read more

हास्यास्पद साम्यवाद !

‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ या शब्दाकडे आणि ईश्‍वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधक जन्म-मृत्यूच्या फे-यांतून मुक्त झाल्यास गुरूंना आनंद होणे !

‘एखाद्या दीर्घकाळ रुग्णाईत असणार्‍या रुग्णावर उपचार केल्यावर तो बरा झाल्यास, त्या वैद्यालाच त्या रुग्णापेक्षा कितीतरी अधिक आनंद होतो ! त्याप्रमाणे एखादा साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतो, तेव्हा त्याच्या गुरूंना किती आनंद होत असेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (१९.६.२०२२)

शासनकर्ते असे असावेत !

‘देवाला पहायला चष्मा लागत नाही आणि देवाचे बोलणे ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही. त्यासाठी फक्त शुद्ध अंतःकरण लागते. प्रजावत्सल शासनकर्ता तसाच असतो. त्याला दुःखी जनता दिसायला चष्मा लागत नाही आणि जनतेच्या समस्या ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नामजप करतांना मनात विचार येत असल्यास काय करावे ?

नामजप करतांना मनात विचार येत असल्यास सूक्ष्मातून हवेत किंवा समोरील भिंतीवर नामजप लिहावा आणि तो पुनःपुन्हा वाचावा. त्यानंतर तो श्वासाला जोडावा. असे केल्याने नामजप एकाग्रतेने होतो.’ – पू. भगवंत कुमार मेनराय

नामजप परिणामकारक होण्यासाठी काय करावे ?

नामजप करत असतांना श्वासावर लक्ष केंद्रित करावे आणि त्याला नामजप जोडावा. नामजपाला श्वास जोडण्याचा प्रयत्न करू नये; कारण तसे करतांना लय साधली गेली नाही, तर गुदमरल्यासारखे होईल. – पू. भगवंत कुमार मेनराय

अखंड कृतज्ञता…!

‘जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात देवाने मला कसे साहाय्य केले ?’ तसेच ‘तो मला साधनेत सतत साहाय्य करत आहे’, हे आठवून कृतज्ञता व्यक्त करावी. सतत आणि अखंड कृतज्ञता व्यक्त केल्याने ‘भगवंतच सर्वकाही करत आहे’, हा संस्कार अंतर्मनावर होऊन अहंभाव अल्प होण्यास साहाय्य होते. – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

आस्तिकतेचे महत्त्व

‘आस्तिकता कोहिनूर हिर्‍यापेक्षा मोलाची आहे. भगवंताविना सगळे आधार तकलादू खोटे आणि कोसळणारे आहेत. धनाचा आधार हा आधारच नव्हे. अर्थ (धन) हेच सर्व अनर्थांचे मूळ कारण आहे. प्रतिष्ठा, पत, मित्र, स्वकीय सगळे निरर्थक आहेत. स्वत:च्या शरिराचाही भरवसा नाही. मृत्यूपासून केवळ आस्तिकताच सोडवते. आस्तिकताच अमृतत्त्व देते. आस्तिकच मृत्यूचे निर्भयपणे स्वागत करू शकतो. आस्तिकाचे चित्त अखंड भगवंतातच असते. … Read more

स्वभावदोष आणि अहं

अ. (वाईट) सवयी मोडण्यासाठी ईश्वरासमोर ध्येय ठरवून घेऊन कृती करण्याचा प्रयत्न करणे. आ. स्वतःचे निरीक्षण जागृत असले पाहिजे, तरच स्वतःतील अहंचे पैलू आणि त्रुटी लक्षात येतात. इ. जो स्वतःच्या चुका सांगतो आणि मान्य करतो, तोच ईश्वराला आवडतो अन् ईश्वर त्याचे रक्षण करतो. ई. ‘आम्ही जे करत आहोत, ते स्वतःच्या शुद्धीसाठी आहे’, हे लक्षात घ्यावे. – … Read more