ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धार्मिक उत्सवाला गर्दी जमवण्यासाठी नाटक, चित्रपट, वाद्यवृंद असे कार्यक्रम ठेवावे लागत नाहीत. याउलट हिंदूंच्या धार्मिक उत्सवाच्या वेळी मात्र असे कार्यक्रम ठेवावे लागतात. यावरून ‘हिंदू केवळ करमणुकीसाठी धार्मिक उत्सव साजरे करतात का ?’, असा प्रश्‍न पडतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

पाण्यात आणि मनात साम्य काय ?

पाणी आणि मन हे दोन्ही जर गढूळ असतील, तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात. दोन्ही जर उथळ असतील, तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात. दोन्ही स्वच्छ असतील, तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात; पण पाण्यात आणि मनात मुख्य भेद तो काय ? पाण्याला बांध घातला, तर पाणी ‘संथ’ अन् मनाला बांध घातला, तर माणूस ‘संत’ होतो. – अज्ञात

हिंदू धर्मांतर करण्यामागील कारण !

‘हिंदू धर्मांतर करतात, ते ईश्‍वरप्राप्तीसाठी नाही, तर आर्थिक सुख-सोयींसाठी.असे लोक हिंदु धर्मात नाहीत, हेच बरे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे सर्वश्रेष्ठत्व !

‘जगातील वैद्य, अभियंता, अधिवक्ता, वास्तूविशारद इत्यादी विविध विषयांतील तज्ञ, तसेच गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान इत्यादी एकही विषय दुसर्‍या विषयासंदर्भात एक वाक्य सांगू शकत नाहीत. फक्त अध्यात्म हा एकच विषय विश्‍वातील सर्व विषयांशी संबंधित त्रिगुण, पंचमहाभूते, तसेच शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती इत्यादींच्या संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ शकतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्वसामर्थ्यवान असूनही भारताने इतिहासात एकाही देशावर आक्रमण न करण्याचे कारण

‘भारत सोडून जगातील इतर सर्वच राष्ट्रांनी दुसर्‍या राष्ट्रांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आपली शक्ती वापरली आहे आणि अजूनही वापरत आहेत. याउलट त्रेता आणि द्वापर या युगांत भारत जगात सर्वसामर्थ्यवान असतांनाही भारताने एकाही देशावर आक्रमण केले नाही. याचे कारण हे की, भारतातील हिंदु धर्मामुळे त्या युगांतही सर्वांचे लक्ष ईश्वरप्राप्तीकडे आणि ऋषीमुनींचे लक्ष ‘१४ विद्या आणि ६४ कला यांच्या … Read more

महत्त्व तर भगवंतालाच आहे !

भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही सेवक । भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही दास । भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही साधक ।। – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

भाव, श्रद्धा आणि भक्ती

अ. ‘जेवढा वेळ ईश्वराची अनुभूती येते’, ती अवस्था म्हणजे ‘भाव.’ आ. ‘ईश्वर जे करेल, ते योग्यच आहे’, असे वाटणे, म्हणजे ‘श्रद्धा.’ इ. ‘ईश्वराने जे केले, ते योग्यच आहे’, असा विचार करणे, म्हणजे ‘भक्ती.’ – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे