सद्‍गुरुनाथा तू अपराधी । तुझेच अपराध घे पदरात ।।

भावार्थ : सद्‍गुरूंना शिष्याने एकदा सर्वस्व अर्पण केले की, शिष्याचे स्वतःचे असे काही उरत नाही; म्हणून अशा शिष्याच्या शरिराने किंवा मनाने काही चुका झाल्या, तर त्या एकप्रकारे गुरूंच्याच ठरतात ! गुरुच अपराधी ठरतात ! – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्‍तराज महाराज

सासूके घरसे जवाई, बहनके घरसे भाई औरगुरुके घरसे शिष्य कभी खाली हाथ वापस नहीं जाते ।

भावार्थ : ‘गुरुके घरसे शिष्य कभी खाली हाथ वापस नहीं जाते’ म्हणजे शिष्यावर गुरुकृपा झाल्याशिवाय रहात नाहीत. एकदा एखाद्याला शिष्य केले की, त्याला पूर्णत्वाला न्यायची जबाबदारी गुरु पार पाडतात. – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्‍तराज महाराज

जिज्ञासेमुळे तळमळ निर्माण होऊन आत्मज्ञान प्राप्त होण्यास साहाय्य होणे

‘एखाद्या गोष्टीची जिज्ञासा असली, तरच ती जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. त्यातूनच तळमळ निर्माण होते. आत्मज्ञानासंदर्भात तळमळ असली, तरच साधकाकडून साधनेसाठी तीव्र प्रयत्न होतात आणि शेवटी त्याला आत्मज्ञान होते.’ – डॉ. आठवले (मार्गशीर्ष शुद्ध पक्ष ६, कलियुग वर्ष ५११४ (१८.१२.२०१२)

शिवसेनाप्रमुखांचे हिंदू राष्ट्र-स्थापनेचे विचार सत्यात आणून दाखवणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ! – प.पू. डॉ. जयंत आठवले, सनातन संस्थेचे प्रेरणास्थान, ‘सनातन संस्था’

राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्यासाठी जीवन वाहून घेण्याची समष्टी साधना करणारे महान कर्मयोगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ! ‘मी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना ‘आंतरमहाविद्यालयीन मराठी वाङ्मय मंडळा’ची स्थापना केली. तेव्हा शिवसेनेची ‘विद्यार्थी सेना’ नुकतीच कार्यरत होत होती. तेव्हा कुमार कदम इत्यादी ‘विद्यार्थी सेने’च्या कार्यकर्त्यांबरोबर माझी जवळीक झाली. तेव्हापासून शिवसेनेबद्दल माझ्या मनात जवळीक निर्माण झाली. ती किती … Read more

पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे अध्यात्म आहे म्हणजे काय ?

‘एखाद्याचे अक्षर सुंदर आहे, हे डोळ्यांना दिसते, ते मनाला आवडते. आवडण्याचे कारण ‘अक्षर सुंदर आहे’, हे बुद्धीला कळते. याउलट पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे गेलेल्यांना सूक्ष्मातील स्पंदने कळतात. त्यामुळे त्यांना संतांचे अक्षर चांगले नसले, त्यांनी वेड्यावाकड्या रेखाट्या ओढल्या, तरी त्यांत चैतन्य असल्याचे जाणवते; म्हणून ‘ते चांगले आहे’, असे ते म्हणतात.’ – डॉ. आठवले (२४.६.२००७)

हिंदूंनो, हिंदुराष्ट्र स्थापनेच्या ऐतिहासिक अध्यायातील अमरज्योत बना आणि गुरु-शिष्य परंपरेचा वारसा जपा !

गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! भौतिकतेकडे झुकलेल्या समाजाला साधनेकडे वळवणे आणि खर्‍या शिष्यांना मोक्षाला नेणे, हे गुरूंचे खरे कार्य आहे. खरे शिष्य याच मार्गाचे अनुसरण करून आयुष्यभर समष्टी कार्य करतात. शिष्याने गुरु करत असलेल्या समष्टी कार्यासाठी तन-मन-धनाने समर्पित होणे, ही गुरूंप्रतीची खरी कृतज्ञता होय ! गुरु-शिष्य परंपरेने दिलेले समष्टी योगदान मोठे आहे. … Read more