भगवंतच प्रत्येकाचा खरा आधार !

‘कठीण समय येता कोण कामास येतो ?’ या प्रश्‍नाचे उत्तर आहे, ‘कठीण समय येता देवच कामास येतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नागरिकांच्या आत्महत्यांना स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सरकारे उत्तरदायी !

‘पाश्‍चात्त्य देशांत अन्न-वस्त्र-निवारा असूनही मानसिक अस्वास्थ्यामुळे तेथील नागरिक आत्महत्या करतात. याउलट भारतातील जनतेच्या अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजाही स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सरकारांनी पूर्ण न केल्यामुळे येथील नागरिक आत्महत्या करतात. हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण आवश्यक !

‘धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण करणे, ही समष्टी साधनाच आहे ! ‘यामुळे ‘धर्मविरोधकांचे विचार अयोग्य आहेत’, हे काही जणांना तरी पटते आणि ते योग्य मार्गाने वाटचाल करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्वरी राज्यात असे नसेल !

‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण आहे’, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्‍वरी राज्यात असे नसेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, काळाप्रमाणे साधना पालटते, हे लक्षात घ्या !

‘संपत्काळात, म्हणजे पूर्वीच्या युगांत ‘गोदान देणे’ही साधना होती. आता आपत्काळात गायींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असतांना ‘गोदान देणे’ नव्हे, तर ‘गोरक्षण करणे’ महत्त्वाचे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

खरा ज्ञानी हा अतिशय नम्र असतो !

‘खरा ज्ञानी हा अतिशय नम्र असतो. ज्ञान होणे, म्हणजेच ‘आपण अज्ञानी आहोत’, हे गवसणे. जेव्हा जिवाला कळते, ‘देवाच्या या अथांग ज्ञानसागरातील केवळ एका थेंबाइतकेच ज्ञान तो ग्रहण करू शकला आहे आणि तेही भगवंताच्या कृपेनेच त्याला शक्य झाले आहे’, तेव्हा त्याचा अहं वाढत नाही.’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)

जिज्ञासू

जिज्ञासूपणा असणे, म्हणजे आपल्यामध्ये नवनवीन शिकण्याची वृत्ती असणे. प्रत्येक गोष्टीतील नाविन्यता साधना करण्यात आपला उत्साह वाढवते. उत्साहामुळे नवनवीन शिकण्याची वृत्ती जागृत राहिल्याने आपला आनंदही टिकून रहातो. याच आनंदात ईश्वराची प्रसन्नता असते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)

ईश्वरप्राप्तीसाठी सर्वसंगपरित्याग केलेल्या साधकाचा गुरूंनी सांगितलेली सेवा झोकून देऊन करतांना कितीही संघर्ष झाला, तरीही त्याने तो सहन करणे आवश्यक !

‘जर एखाद्या साधकाने सर्वसंगपरित्याग करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे, तर त्याने गुरु सांगतील ती सेवा झोकून देऊन करावी, मग कितीही संघर्ष करावा लागला, तरी चालेल. या संघर्षाचे फळ गोडच असते. गुरु शेवटी साधकाला चिरंतन अशा आनंदमय ईश्वराची प्राप्ती करून देतातच; परंतु मायेचे तसे नसते. मायेत होणारा संघर्ष शेवटी आपल्या पदरात दुःखच टाकतो. … Read more

वर्तमानकाळाचे सोने करा !

‘अध्यात्मात भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे मूल्य शून्य आहे. त्यामुळे भूत-भविष्याच्या विचारांत न अडकता वर्तमानकाळाचे सोने करा !’ – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२८.१.२०२२)

खरे प्रदूषणनिवारण करायचे असेल, तर प्रथम मनातले प्रदूषण दूर करा !

‘प्रदूषणासंदर्भात सगळीकडे गाजावाजा करून जो उपाय केला जातो, तो रोगाच्या मुळावर उपाय न करता वरवरचे उपाय करण्यासारखे आहे. प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या रज-तमप्रधान मनाला आणि बुद्धीला साधनेने सात्त्विक न बनवता, म्हणजे मुळावर उपाय न करता केलेले वरवरचे उपाय हास्यास्पद आहेत. क्षयरोग झालेल्याला क्षयरोगाची औषधे न देता केवळ त्याला येणार्‍या खोकल्यासाठी औषध देण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद … Read more