कोणता जयघोष कधी करावा ?
१. लढ्याचा आरंभ होतांना आणि चालू असतांना : हर हर महादेव । २. लढा जिंकल्यावर : जयतु जयतु हिंदू राष्ट्रम् । या सूचनेत प्रसंगानुसार पालट करता येईल.- डॉ. आठवले (३१.१२.२०१३)
१. लढ्याचा आरंभ होतांना आणि चालू असतांना : हर हर महादेव । २. लढा जिंकल्यावर : जयतु जयतु हिंदू राष्ट्रम् । या सूचनेत प्रसंगानुसार पालट करता येईल.- डॉ. आठवले (३१.१२.२०१३)
एकुलता एक मुलगा असला की, वडिलांची सर्व संपत्ती मिळते; पण भावंडांबरोबर कसे रहायचे ? भावंडांचे प्रेम म्हणजे काय ?, हे शिकायला मिळत नाही. पुढे आई-वडिलांचे सर्व उत्तरदायित्वही सांभाळावे लागते. ते नको असल्याने हल्लीची मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. साधना केल्यास मुले कृतज्ञतापूर्वक आई-वडिलांचे शेवटपर्यंत सर्व करतात आणि त्यांच्या मुलांसमोरही एक आदर्श ठेवतात. – डॉ. आठवले … Read more
गेले ४ – ५ महिने मी तोंडाला अतिशय कोरड पडते, या त्रासासाठी डॉक्टर आणि वैद्य यांचे उपाय केले. तेव्हा लिमलेटच्या गोळ्या चघळायचो; पण फरक पडला नाही. कोरड पडते तेव्हा पाणी प्यायला हवे, हे लक्षात यायचे नाही. काल ते लक्षात आले आणि पाणी अधिक प्रमाणात प्यायला लागलो. तेव्हापासून तोंडाला कोरड पडणे कमी झाले. – डॉ. आठवले … Read more
विज्ञानाने शोधून काढलेल्या यंत्रांमुळे दैनंदिन कार्य, प्रवास इत्यादींसाठी लागणारा बराच वेळ वाचला; मात्र त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा, हे विज्ञानाने न शिकवल्यामुळे व्यसने, स्वैराचार इत्यादी गोष्टींत मानव वेळ घालवू लागला. त्यामुळे त्याची अधोगती अती वेगाने झाली आणि होत आहे. – डॉ. आठवले (१९.१.२०१४)
शिरस्त्राण, चिलखत इत्यादी स्थुलातून आक्रमण झाल्यास त्या त्या भागाचे रक्षण करतात. साधनेमुळे संरक्षककवच निर्माण होते. ते स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवरच्या आक्रमणांपासून पूर्ण देहाचे आणि मनाचे रक्षण करते. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष १३, कलियुग वर्ष ५११५ (२१.६.२०१३))
साधनेत तन-मन-धनाचा त्याग केला की झाले, असे बर्याच ६० टक्क्यांहून अधिक पातळीच्या साधकांना आणि काही संतांनाही वाटते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, साधनेत पुढे जायची तळमळ, जिज्ञासा, शिकण्याची वृत्ती, प्रीती आणि समष्टीतील नेतृत्व इत्यादी गुणही अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशिवाय पुढील प्रगती होणे अशक्य आहे. एवढेच नव्हे, तर या गुणांशिवाय अधोगतीही होऊ शकते. – डॉ. … Read more
‘काही जणांकडे ३-४ पिढ्यांपूर्वीचीही देवघरातील देवतांची जुनी चित्रे आणि मूर्ती पूजेत ठेवलेली असतात. चित्रे आणि मूर्ती जुनी झाल्यामुळे त्यांच्यातील देवतेचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अल्प झालेली असते. एवढेच नव्हे, तर काही वेळा त्यांतून त्रासदायक स्पंदनेही प्रक्षेपित होतात. भावनाप्रधानतेमुळे अशी चित्रे आणि मूर्ती देवघरात ठेवण्यात येतात. अशांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, मंदिरातील मूर्तीचीही … Read more
व्यक्ती कितीही सुंदर असली, तरी ती आरशात स्वतःकडे फारच थोडा वेळ पहाते. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. अतिपरिचयात् अवज्ञा ।, म्हणजे (आरशात पहाणे) नेहमीचेच झाल्याने त्याचे काही अप्रूप वाटत नाही. २. बहुतेक सर्वच जण बहिर्मुख असल्यामुळे स्वतःकडे पहाण्यापेक्षा त्यांना इतरांकडे पहाणे जास्त आवडते. – डॉ. आठवले (आषाढ शुक्ल पक्ष ५, कलियुग वर्ष ५११५ (१३.७.२०१३))
आपण नेहमी बोलतो, त्या वाणीला वैखरी वाणी म्हणतात. साधनेत नामजप करतांना वैखरीतून मध्यमा, पश्यंती आणि परा या वाणींत जप करत करत पुढे जायचे असते. हे साध्य करणे सुरुवातीला कठीण असते. तेव्हा वैखरी वाणीत जप करतांना जप ऐकू येत असल्यामुळे जपावर मन एकाग्र व्हायला साहाय्य होते. त्यामुळे पुढच्या वाणींतील जप करणे सुलभ होते. – डॉ. आठवले … Read more
‘सनातन प्रभातमध्ये दृश्य जगाबरोबर अदृश्य (सूक्ष्म) जगाबद्दलही माहिती देण्यात येते; कारण दृश्य जगातील घटनांसाठी अदृश्य जगातील घटना कारणीभूत असतात व ‘दृश्य जग सुखी करायचे असेल, तर अदृश्य जगातील घटनांबद्दल उपाय केले पाहिजेत’, याची जाणीव मानवाला व्हावी.’ – डॉ. आठवले (२६.५.२००७, दुपारी १२.०५ )