दया म्हणजे दुसऱ्याच्या जीवनाचे मूल्य समजणे
आपल्या आतील परमात्म्याला पहाणे हे ज्ञान आहे. दुसऱ्यांमध्ये परमात्मा आहे हे न विसरणे, म्हणजे करुणा, दया. घराचा आश्रम किंवा आश्रमाचे घर होणे घरात राहूनही तुम्ही कोणाला उद्विग्न करत नसाल, तर तुमचे घर आश्रमच आहे. वाल्मीकींच्या आश्रमात जाऊनही तुमचे मन उद्विग्न होत असेल, तर तुम्ही वाल्मीकींना ओळखले नाही. – डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)