कुटुंबकर्ता घरच्या लोकांची अन्न, वस्त्र, निवारा आदी व्यवस्था करतो, त्याचप्रमाणे समाज आणि राष्ट्र यांची व्यवस्था करणारे नेते हवेत !

कुटुंबातच तर सहिष्णुता श्‍वासाश्‍वासातून उमटू शकते. घरच्या लोकांची अन्न, वस्त्र, निवारा आदी व्यवस्था केल्यावर कुटुंबकर्ता आपल्या भोजनादीचा विचार करतो. हेच सूत्र समाज आणि राष्ट्र यांच्या स्थैर्याकरिताही आवश्यक नाही का ? तसेच ग्रामपती हा जर आदर्श कुटुंबघटक असेल, कुटुंबांचे व्यवस्थापन करणारा असेल, तर गावाच्या लोकांचे भोजन आणि निवारा यांचा प्रबंध केल्यावरच स्वतःचे जेवण आणि वस्त्र यांचा … Read more

ऋषींचे अध्यात्मिक महत्व!

ऋषींनी सगुण-निर्गुण, पंचमहाभूते, कालमाहात्म्य, कर्मफलन्याय, पुनर्जन्म इत्यादींविषयी सांगितले नसते, तर अध्यात्म कधी शब्दांत मांडता आले असते का ? – डॉ. आठवले (७.५.२०१४)

देवळे आणि व्यासपीठ येथे चपला न वापरण्याची कारणे

१. देऊळ आणि तीर्थक्षेत्र अशा चैतन्यमय जागी चपला वापरल्या, तर पावलांतून चैतन्य ग्रहण होत नाही. २. व्यासपीठ व्यासपिठाला व्यासपीठ म्हणतात; कारण त्यावर खरा अधिकार महर्षी व्यासांचाच आहे. ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।’ म्हणजे या जगातील अध्यात्मविषयक सर्व ज्ञान हे महर्षि व्यासांचे उच्छिष्ट (उष्टे) आहे, अशी लोकोक्ती रूढ झाली आहे. आपण तेथे जातो, तेव्हा त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून … Read more

धर्मद्रोह्यांची देणगी:दुर्योधनाची प्रशंसा करणारी एक कादंबरी !

दुर्योधनाची प्रशंसा करणारी एक कादंबरी गुरुदेवांना दाखविली ते म्हणाले, “महाभारत, रामायण आदी इतिहासातील आमच्या काळ्या व्यक्तीरेखा, मुद्दाम उजळ करून त्यांना प्रतिष्ठित करण्याची गेल्या पन्नास-पाऊणशे वर्षांत अनेकांनी कसोशी केली. साक्षात व्यास दुर्योधनासंबंधी सांगतात कंलेरंशस्तु संजज्ञे भुवि दुर्योधनो नृपः ।दुर्बुद्धिःदुर्मतिश्चैवैव, कुरूणामयशस्करः । जगतो यस्तु सर्वस्य विदिष्टा कालपुरुषः । यः सर्वां घातमायास पृथिवीं पृथिवीपते । (महा. आदिपर्व) राजा … Read more

विभक्त कुटुंब आणि भारताचे विभाजन !

बर्‍याच पती-पत्नींचेच एकमेकांशी पटत नाही. अशा स्थितीत ते एकत्र कुटुंब पद्धतीत राहू शकत नाहीत. असे पती-पत्नी समाजाशी आणि राष्ट्राशी कसे एकरूप होणार ? अशा विभक्त कुटुंबांमुळे भारताचे विभाजन होण्यास साहाय्य होत आहे ! – डॉ. आठवले (६.५.२०१४)

कलियुगातील आध्यात्मिक गुरू !

हे कलियुग आहे. हे दांभिकपणा आणि ढोंगीपणा यांचे युग आहे. आजच्या युगातले काही स्वामी जे शिकवितात, ते स्वतः ते आचरणात आणत असतीलच असे नाही. काही आध्यात्मिक गुरु लबाड असू शकतात. याचा असा अर्थ नाही की, आध्यात्मिक गुरु प्रामाणिक असूच शकत नाहीत. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (वाङ्मय पत्रिका घनगर्जित, वर्ष दुसरे, अंक ११)

अधर्म म्हणजे पुरोगामित्व !

नीती, प्रामाणिकपणा, अस्मिता वगैरेंचा लेशदेखील या युरोपियन गोर्‍यांत आढळायचा नाही. अधर्म हा धर्म झाला आहे. यालाच पुरोगामित्व म्हणतात. तीच प्रगती ! तीच आधुनिकता ! – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (आचारधर्म, पृ. ८.)

स्वकर्मत्यागाने सर्वांची अधोगती !

अमेरिका आणि युरोप येथे पूर्वी संसार आणि मातृपद हा धर्म होता; परंतु सुधारलेल्या पश्चिमेत त्या स्त्रियांना स्वधर्म न पाळता आल्यामुळे त्यांना सर्व आधीव्याधींनी पछाडले. अशा तऱ्हेचा कर्मत्यागरूप वर्णसंकर जगभर वणव्यासारखा पसरला. त्यामुळे अर्थ-कामावर व्यक्तीची दृष्टी खिळली. मग ‘वंशसंकर फैलावला. विद्यादानाची शक्ती नसलेले शिक्षक पैशाकरिता ज्ञानदान करीत आहेत. प्रजा रक्षणाकरिता नेमलेले अधिकारी प्रजा भक्षक झाले आहेत. … Read more

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे !

पतीला पत्नीचे नियंत्रण नको आणि पत्नीला पतीचे नको. दोघांनाही स्वातंत्र्य हवे. विवाहामुळे, विशेषतः स्त्री-स्वातंत्र्यावर बंधने येतात; म्हणून आजची स्त्री बंधनमुक्त होऊ इच्छिते. तिला स्वातंत्र्य (?) हवे आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. काही मर्यादा सांभाळाव्याच लागतील. व्यक्तिस्वातंत्र्य, अभिरुचीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य ही केवळ स्वैराचाराची वेगळी नावे आहेत. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (स्त्री-धर्म – ६, नोंदणी विवाहाच्या निमित्ताने…, पृ. … Read more

दया

अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन हे दयाळू म्हणून प्रसिद्ध होते. एकदा मित्रासमवेत घोडागाडीतून जात असतांना मित्र त्यांच्यावर थोर असूनही केवढा दयाळू इत्यादी स्तुतीसुमने उधळीत होता. लिंकन मित्राला सांगत होते, “बाबा रे, मी सत्यच सांगतो की, मी काही दयाळू नाही”. जाता जाता एक घोडा तारेच्या कुंपणात अडकून रक्तबंबाळ झालेला दिसला. लगेच लिंकन गाडीतून उतरले आणि त्यांनी घोड्यास … Read more