साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व लक्षात घ्या !

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करायची असल्यास जगातील भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू नका; कारण भारतियांची स्थिती वाईट असली, तरीही भारताइतका सात्त्विक देश जगात कुठेही नाही. इतर सर्व देशांत रज-तमाचे प्रमाण अत्यधिक आहे. ५० टक्के आध्यात्मिक पातळीहून अधिक पातळी असलेले मात्र जगात कुठेही राहून साधना करू शकतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्राची केविलवाणी स्थिती झाल्यामागील कारण !

‘स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकप्रतिनिधी राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करणारे होते. स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या उत्तरदायित्वाचा नाही, तर केवळ स्वार्थाचाच विचार करणार्‍या लोकप्रतिनिधींची संख्या वाढत गेल्याने राष्ट्राची केविलवाणी स्थिती झाली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, हिंदूंच्या सद्य:स्थितीचा विचार मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर न करता आध्यात्मिक स्तरावर करा !

‘मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर विचार करणार्‍यांना काळजी वाटते, ‘पुढे हिंदु अल्पसंख्यांक होणार.’ याउलट आध्यात्मिक स्तरावर विचार करणार्‍यांना कळते की, कालचक्रानुसार पुढे हिंदु धर्म असणार आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधना करतांना आपली प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याची दृष्टी पालटते !

एखादी कृती किंवा घटना यांना काळानुसार आपण ‘देवाची लीला’ म्हणू शकतो. साधना करतांना आपली प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याची दृष्टी पालटते. जीवनात दुःख आले, तरी साधकाला ती भगवंताची एक लीलाच वाटते; परंतु सामान्य माणसाला मात्र तीच गोष्ट दुःख देऊन जाते. श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

जनतेने नशेला बळी पडू नये, यासाठीचा मूलगामी उपाय !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या भक्तीची गोडी निर्माण केली असती, तर कुणी दारू अन्‌ सिगारेट यांच्या नशेला बळी पडला नसता !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

निरर्थक बुद्धीप्रामाण्यावादी !

‘भारतातील हिंदूंनाच नव्हे, तर जगातील मानवजातीला आधार वाटतो हिंदु धर्माचा ! त्यामुळे जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात. बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मविरोधी आणि साम्यवादी यांचे तत्त्वज्ञान शिकण्यासाठी भारतात कुणीही येत नाही; पण हेही त्यांच्या लक्षात येत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आद्य शंकराचार्यांचा काळ आणि आताचा काळ यांतील धर्मविरोधकांमधील भेद !

‘आद्य शंकराचार्यांनी भारतात सर्वत्र फिरून हिंदु धर्माच्या विरोधकांबरोबर वाद-विवादात त्यांना जिंकून हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली. त्या काळचे विरोधक वाद-विवाद करत. याउलट हल्लीचे धर्मविरोधक वाद-विवाद न करता केवळ शारीरिक आणि बौद्धिक गुंडगिरी करतात.‘ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बालवयातील मुलांसारखे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कधी विश्‍वबुद्धीतून ज्ञान मिळते का ? ‘विश्‍वबुद्धी’ असे काहीतरी आहे आणि विश्‍वबुद्धीतून ज्ञान मिळते, हे तरी त्यांना ठाऊक आहे का ? ठाऊक नसल्यानेच ते बालवयातील मुले बडबडतात, तसे बडबडतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आदर्श हिंदु राष्ट्र, म्हणजेच रामराज्य !

‘हिंदु राष्ट्रात, म्हणजेच रामराज्यात लहानपणापासूनच साधना करवून घेण्यात येत असल्यामुळे व्यक्तीतील रज-तम गुणांचे प्रमाण अल्प होऊन व्यक्ती सात्त्विक बनते. त्यामुळे ‘गुन्हा करावा’, असा विचारही तिच्या मनात येत नाही ! साधनेमुळे सर्व प्रजा सात्त्विक असल्यामुळे कुणी गुन्हा करत नाही ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्‍वरप्राप्ती करून देणार्‍या संतांचे महत्त्व जाणा !

‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्‍वरप्राप्ती करून देणारे संत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले