कोणालाही न्याय मिळणार नाही, अशी ब्रिटिशांची न्यायदान पद्धत !

स्वार्थाकरता ब्रिटिशांनी मेकॉलेची सदोष शिक्षणपद्धती रूजवली नव्हे, तर ब्रिटिशांची न्यायदान पद्धतीही रुजवली, जिच्यापासून न्याय मिळणे शक्य नव्हते. दुर्दैवाने स्वातंत्र्याची सहा दशके उलटून गेली, तरी तीच न्यायसंस्था आजही भारतात अस्तित्वात आहे. आम्ही न्यायाची अपेक्षा कशी करावी ? याचा विचार आमचा उत्तम (elite) वर्ग का करीत नाही ? गेल्या २५-३० वर्षात भारतात कोणती चांगली घटना घडली आहे … Read more

राज्यकर्त्यांनो, हे लक्षात घ्या ! षड्रिपुंमुळे नष्ट झालेले अनेक राजे, तर जितेंद्रिय असल्याने संपूर्ण पृथ्वी आपल्या नियंत्रणात ठेवणारा परशुराम

अनेक राजे इंद्रियांचे दास बनूनच नष्ट झाले आहेत. रावण आणि कीचक स्त्री वासनेने नष्ट झाले. दुर्योधन मत्सराने समाप्त झाला. शिशुपाल क्रोधाने. प्रजेवर प्रचंड कर लादणारा अभिजित राजा लोभाने नष्ट झाला. जितेंद्रिय परशुरामाने संपूर्ण पृथ्वी आपल्या नियंत्रणात ठेवली. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, ऑक्टोबर २०१०)

आमच्या शहाण्या शासनकर्त्यांना भारतीय राजनीतीचे अनुसरण करण्याची बुद्धी कधी येईल ?

पाकिस्तान आक्रमण करणार, या भीतीने भारतीय शासन जो अपरंपार पैसा, शक्ती आणि प्रज्ञा संरक्षणावर वेचते आहे, त्यामुळे विधायक योजना खोळंबून पडल्या आहेत, पुष्कळशी कामे स्थगित करावी लागली आणि त्यामुळे जनतेत नैराश्य पसरले आहे. केवळ पाकिस्तानच्या आक्रमणाच्या भयाने थरथरणारे आपले शासन. प्रचंड संपत्ती संरक्षणावर बरसते आहे. हे सगळे भारतीय प्रजेला एक वेळ उपाशी ठेवूनच करावे लागते … Read more

कर्तव्य

आई-वडील आणि इतर वडीलधारी माणसे देवघरातील मूर्तीसारखी सांभाळा. कर्तव्यात कुठेच न्यूनता ठेवू नका. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

राजकीय पक्षांना नव्हे, तर भक्तांना भारतावर राज्य करू द्या !

राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते स्वार्थासाठी पक्ष बदलतात, तसे विविध संप्रदायांचे भक्त संप्रदाय पालटत नाहीत; कारण त्यांच्यात गुरु आणि ईश्‍वर यांच्याप्रती श्रद्धा असते. असे असतांना राजकीय पक्षांना भारतावर राज्य करून द्यायचे कि भक्तांना ? – डॉ. आठवले (६.५.२०१४)

श्रद्धेचे महत्त्व

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला श्रद्धास्थान असणे आवश्यक आहे. त्यामुळे मनाला शांती मिळून मानसिक तणावाचे निर्मूलन होते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

चोरांनी चंद्राचा, मत्सरी लोकांनी महाकाव्याचा, तर कुलटा स्त्रियांनी पतिव्रतेचा द्वेष करणे

चन्द्रिकां तस्करो द्वेष्टि कवितां मत्सरी जनः । कुलटा च स्त्रियं साध्वीं स्वभावो दुरतिक्रमः ॥ अर्थ : चोर चंद्राच्या चांदण्याचा द्वेष करतो. मत्सरी मनुष्य कवितेचा द्वेष करतो. व्यभिचारिणी स्त्री पतिव्रतेचा राग करते. स्वभाव खरोखरच ओलांडून जाण्याजोगा (बलण्याजोगा) नसतो ! स्पष्टीकरण : चोराला काळाकुट्ट अंधार प्रिय असतो. शुभ्रधवल चंद्राकाशाचा तो द्वेष करतो. कुलटा, जारिणी स्त्री महासाध्वी पतिव्रतेचा … Read more

धर्मबंधन का आवश्यक ?

अ. कायद्याने का समाज वळतो ? तिथे धर्म हवा ! गर्भपाताला शासनाची संमती आहे, हे खरं; परंतु गर्भजल चिकित्सेविरुद्ध शासकीय कायदे आहेत. कायद्याने का समाज वळतो ? तिथे धर्म हवा ! टाईम्सचा लेख (४.७.१९८८) सांगतो की, आता धार्मिक संस्थांनी या कामी पुढाकार घ्यावा. म्हणजे स्त्रियांना गर्भजल चिकित्सेपासून परावृत्त करावे. या बाबतीत कायदा हतबल आहे. अन्य … Read more

समष्टी साधना करतांना संचित आणि प्रारब्ध नष्ट कसे होते?

समष्टी साधना करतांना साधक जसजसा समाज, राष्ट्र आणि सनातन धर्म यांच्याशी हळूहळू एकरूप होतो, तसतसा त्याचा अहं हळूहळू न्यून होत जातो. साधक समष्टीशी पूर्णपणे एकरूप झाला की, त्याचा अहं पूर्णपणे नाहीसा होतो. अहंकार, मीपणा संपला की, पाप-पुण्य, क्रियमाण, संचित, प्रारब्ध इत्यादी काहीच उरत नाही. – (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले, चेंबूर, मुंबई.(२५.६.२०१३)

प्रल्हादाच्या भक्तीचा उगम त्याच्या जन्मापूर्वीच्या संस्कारांत असणे

१. एकदा हिरण्यकश्यपू तप करण्यासाठी वनात गेला होता. तेव्हा बृहस्पतीने पोपटाचे रूप घेऊन नारायण नारायण असे म्हणत त्याचा तपोभंग केला. हिरण्यकश्यपू रागावून घरी आला. पत्नी कयाधूने विचारले, पोपट काय म्हणत होता ? हिरण्यकश्यपू म्हणाला, नारायण नारायण. तिने पुनःपुन्हा तेच विचारले. तेव्हा हिरण्यकश्यपूचा १०८ वेळा नारायण नारायण असा जप झाला. त्या रात्री संभोग होऊन कयाधूला गर्भधारणा … Read more