हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी संत आणि साधक यांचे महत्व

व्यवहारात स्वार्थ असतो, तर अध्यात्मात सर्वस्वाचा त्याग असतो. यामुळे व्यवहारातील राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यापेक्षा संत आणि साधक हिंदु राष्ट्राची स्थापना करून खर्‍या अर्थाने समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे हित करू शकतात. – डॉ. आठवले (२६.५.२०१४)

अध्यात्म समजायला विज्ञानाची भाषा उपयुक्त

पंचमहाभूतांनी जग बनले आहे, असे सांगितल्यावर काही जणांना वाटते, हे कसे शक्य आहे ? त्यांना हायड्रोजनचे दोन भाग आणि ऑक्सिजनचा एक भाग एकत्र आले की, पाणी (H2O) बनते, त्याप्रमाणे पंचमहाभूतांच्या विविध प्रमाणांतील एकत्रिकरणामुळे जग बनते, असे सांगितले की, त्यांना ते पटते. यांमुळेच सनातनचे ग्रंथ वैज्ञानिक पद्धतीने लिहिले आहेत. – डॉ. आठवले (२७.५.२०१४)

एकत्र कुटुंबपद्धतीमुळे भारतामध्ये आपत्काळात केवळ १.२५ टक्के आपद्ग्रस्तांचे मनोधैर्य ढासळणे, तर पाश्‍चात्त्य देशांत ३० ते ४० टक्के एवढ्या जणांचे मनोधैर्य ढासळणे

त्सुनामी झाली, तरी तामिळनाडूचा समुद्रकिनारा आणि अंदमान-निकोबार येथील उद्ध्वस्त कुटुंबे केवळ त्यांच्या एकत्र कुटुंबपद्धतीमुळे, तसेच नातेवाईक आणि जातभाई यांच्याकडून मिळालेल्या आश्‍वासक साहाय्यामुळे स्वतःला सावरू शकली. ख्रिस्ताब्द १९९९ मध्ये लातूर आणि ख्रिस्ताब्द २००० मध्ये भूज येथे झालेल्या भूकंपांत कुटुंब, तसेच नातेवाईक यांच्याशी असलेल्या संबंधामुळे लोक सावरू शकले. केवळ १.२५ टक्के आपद्ग्रस्तांचे मानसिक स्थैर्य ढासळले. याउलट पाश्‍चात्त्य … Read more

हिंंदु संस्कृतीची वैशिष्ट्ये

१. हिंदु संस्कृती पिढ्यानपिढ्या टिकवण्यासाठी नवीन पिढीवरील संस्कार महत्त्वाचे ! : प्रत्येक देशाचे अस्तित्व म्हणजेच त्या देशाची जीवनप्रणाली आणि संस्कृती यांचे अस्तित्व. ही संस्कृती पिढ्यानपिढ्या टिकण्यासाठी नवीन पिढीवर जन्मापासून केलेले संस्कार महत्त्वाचे ठरतात. २. हिंदु संस्कृतीनुसार विवाह हा करार नसून ईश्वराने निर्माण केलेला संस्कार असणे : आपली संस्कृती ४ आश्रम, १६ संस्कार, पंचयज्ञ आणि सनातन … Read more

सजीव आणि निर्जीव वस्तूंत स्वतःला पहाणारे, पूर्ण ब्रह्माशी एकरूप झालेले संत

हे मृत्यू, हे नश्वर शरीर हवे तर खुशाल घेऊन जा ! मला त्याची खंत नाही. मी कुठल्याही मूर्त-अमूर्त शरिराने कार्यरत राहू शकतो. या शीतल चंद्रकिरणांना धारण करून मी पृथ्वीवर संचार करीन, पर्वतावरून खळखळणाऱ्या झऱ्याचे, ओढ्या-नाल्याचे वस्त्र पांघरून दिव्य संचार करीन, समुद्राच्या लाटेच्या रूपाने मी नृत्य करीन. मंद वाऱ्याची झुळूक हीच माझी प्रसन्न धुंद पाऊले असतील….. … Read more

महाराष्ट्र म्हणजे हिंदुस्थानचा खड्गहस्त

हिंदुस्थान सोडून बाकीच्या सर्व लघुराष्ट्रांना आपल्या हिंदु धर्म जीवनाची, शिकवण देण्याचे दायित्व आपल्या महाराष्ट्र्राचे आहे बरं कां ! म्हणून तर आपले राष्ट्र महान आहे. ३०० वर्षांपूर्वीच ही जाणीव समर्थांनी त्यांच्या ‘दासबोध’ नामक ग्रंथात देऊन ठेवली आहे. ‘मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ।’ ‘मराठा’ म्हणजे क्षात्रवृत्ती होय. मराठा हा शब्द जातिवाचक नसून भाववाचक आहे. स्वातंत्र्यवीर … Read more

हिंदुत्वाच्या र्‍हासामुळे लोकराज्यात लोकसंख्या नियंत्रणाबाहेर जाणे

१. हिंदु धर्मात सांगितलेल्या आचारधर्माचे पालन न करणे २. धर्मशिक्षण न देणे : धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी लहानपणी धर्माचे महत्त्व मनावर बिंबवल्यामुळे अर्थ आणि काम मर्यादेत रहायचे आणि पुढे ते सोडून मोक्षाकडे जायची ओढ असायची. धर्मशिक्षण न देता केवळ नैतिकमूल्ये शिकवली आणि गर्भधारणा प्रतिबंधक उपाय विज्ञानाच्या साहाय्याने केले, तरी त्यांची परिणामकारकता … Read more

आज धर्मरक्षणाकरता स्त्रियांनी सर्वस्व त्यागण्याचा विलक्षण दुर्धर प्रसंग ओढवला आहे !

धर्माकरता केलेला सर्व त्यागच ‘इह’ आणि ‘पर’ जीवन कृतार्थ करतो. स्त्रीची तृप्ती मातृत्वात असली, तरी त्याहीपेक्षा श्रेष्ठतम, परमतृप्ती देणारा स्व-धर्माकरता मातृत्वाचाही त्याग करण्यात, प्रसंगी सर्वस्वाचा होम करण्यात आहे. हे सतीचे वाण आहे. किंबहुना त्याहीपेक्षा दिव्यदाहक आहे. सतीला किमान सरणावरच्या पतीशवाचा तरी आधार असतो. इथे तोही नाही. धर्म ही चीजच मुळी अमूर्त, अदृष्ट आहे. आज धर्मरक्षणाकरता … Read more

साधनेने संचित आणि इच्छा यांचा नाश होणे

विद्यारण्य स्वामी फारच गरीब होते. अर्थप्राप्तीसाठी त्यांनी गायत्रीची २४ पुरश्चरणे केली; पण अर्थप्राप्ती झाली नाही. तेव्हा त्यांनी थकून संन्यास घेतला. त्या वेळी गायत्री मातेचे दर्शन झाले. देवी म्हणाली, ‘मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग.’ स्वामी म्हणाले, ‘आता मला काही मागायची इच्छा नाही. इच्छा होती, तेव्हा तू मला प्रसन्न झाली नाहीस. असे का झाले … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे हास्यास्पद !

शाळेतल्या मुलांनी ‘फ्रेंच भाषा नाही’ किंवा ‘हिमालय नाही’, असे म्हणणे जसे हास्यास्पद आहे, तसेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे हास्यास्पद आहे. – डॉ. आठवले (३०.६.२०१४)