सजीव आणि निर्जीव वस्तूंत स्वतःला पहाणारे, पूर्ण ब्रह्माशी एकरूप झालेले संत

हे मृत्यू, हे नश्वर शरीर हवे तर खुशाल घेऊन जा ! मला त्याची खंत नाही. मी कुठल्याही मूर्त-अमूर्त शरिराने कार्यरत राहू शकतो. या शीतल चंद्रकिरणांना धारण करून मी पृथ्वीवर संचार करीन, पर्वतावरून खळखळणाऱ्या झऱ्याचे, ओढ्या-नाल्याचे वस्त्र पांघरून दिव्य संचार करीन, समुद्राच्या लाटेच्या रूपाने मी नृत्य करीन. मंद वाऱ्याची झुळूक हीच माझी प्रसन्न धुंद पाऊले असतील….. … Read more

महाराष्ट्र म्हणजे हिंदुस्थानचा खड्गहस्त

हिंदुस्थान सोडून बाकीच्या सर्व लघुराष्ट्रांना आपल्या हिंदु धर्म जीवनाची, शिकवण देण्याचे दायित्व आपल्या महाराष्ट्र्राचे आहे बरं कां ! म्हणून तर आपले राष्ट्र महान आहे. ३०० वर्षांपूर्वीच ही जाणीव समर्थांनी त्यांच्या ‘दासबोध’ नामक ग्रंथात देऊन ठेवली आहे. ‘मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ।’ ‘मराठा’ म्हणजे क्षात्रवृत्ती होय. मराठा हा शब्द जातिवाचक नसून भाववाचक आहे. स्वातंत्र्यवीर … Read more

हिंदुत्वाच्या र्‍हासामुळे लोकराज्यात लोकसंख्या नियंत्रणाबाहेर जाणे

१. हिंदु धर्मात सांगितलेल्या आचारधर्माचे पालन न करणे २. धर्मशिक्षण न देणे : धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी लहानपणी धर्माचे महत्त्व मनावर बिंबवल्यामुळे अर्थ आणि काम मर्यादेत रहायचे आणि पुढे ते सोडून मोक्षाकडे जायची ओढ असायची. धर्मशिक्षण न देता केवळ नैतिकमूल्ये शिकवली आणि गर्भधारणा प्रतिबंधक उपाय विज्ञानाच्या साहाय्याने केले, तरी त्यांची परिणामकारकता … Read more

आज धर्मरक्षणाकरता स्त्रियांनी सर्वस्व त्यागण्याचा विलक्षण दुर्धर प्रसंग ओढवला आहे !

धर्माकरता केलेला सर्व त्यागच ‘इह’ आणि ‘पर’ जीवन कृतार्थ करतो. स्त्रीची तृप्ती मातृत्वात असली, तरी त्याहीपेक्षा श्रेष्ठतम, परमतृप्ती देणारा स्व-धर्माकरता मातृत्वाचाही त्याग करण्यात, प्रसंगी सर्वस्वाचा होम करण्यात आहे. हे सतीचे वाण आहे. किंबहुना त्याहीपेक्षा दिव्यदाहक आहे. सतीला किमान सरणावरच्या पतीशवाचा तरी आधार असतो. इथे तोही नाही. धर्म ही चीजच मुळी अमूर्त, अदृष्ट आहे. आज धर्मरक्षणाकरता … Read more

साधनेने संचित आणि इच्छा यांचा नाश होणे

विद्यारण्य स्वामी फारच गरीब होते. अर्थप्राप्तीसाठी त्यांनी गायत्रीची २४ पुरश्चरणे केली; पण अर्थप्राप्ती झाली नाही. तेव्हा त्यांनी थकून संन्यास घेतला. त्या वेळी गायत्री मातेचे दर्शन झाले. देवी म्हणाली, ‘मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग.’ स्वामी म्हणाले, ‘आता मला काही मागायची इच्छा नाही. इच्छा होती, तेव्हा तू मला प्रसन्न झाली नाहीस. असे का झाले … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे हास्यास्पद !

शाळेतल्या मुलांनी ‘फ्रेंच भाषा नाही’ किंवा ‘हिमालय नाही’, असे म्हणणे जसे हास्यास्पद आहे, तसेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे हास्यास्पद आहे. – डॉ. आठवले (३०.६.२०१४)

हिंदूंचा कल्पनातीत सर्वधर्मसमभाव

विष्णूचा अवतार असलेल्या रामाने रावणाला युद्धात मारले. त्या रावणाची रावण महाराज या नावाची भारतात २ – ३ ठिकाणी मंदिरे आहेत ! म्हणूनच हिंदूंना कोणी सर्वधर्मसमभाव शिकवायला नको ! – डॉ. आठवले (२६.६.२०१४)

लो. टिळकांप्रमाणे साधना करणारे नेते भारताला मिळाले असते, तर एव्हाना भारत जगातील राष्ट्रांत पहिल्या क्रमांकाला पोहोचला असता !

सन १८९८ साली चाफेकर प्रकरणामुळे झालेली शिक्षा भोगून लोकमान्य तुरुंगातून ज्या वेळी सुटून बाहेर आले, त्या वेळी ते कसब्याच्या श्रीगणपतीस प्रथम आणि नंतर श्री. अण्णासाहेब यांच्या दर्शनास गेलेे. अगोदर घरी जाऊन आला का ? असा श्री. अण्णासाहेबांनी जो प्रश्‍न विचारला त्यावर लोकमान्य एकदम उद्गारले, प्रथम श्री गणपति नंतर तुम्ही ! गीतारहस्य छापल्यानंतर पहिली प्रत पंढरपूरच्या … Read more

भीक आणि भिक्षा यांमधील भेद

१. भिक्षा मागण्याचे लाभ : सनातन धर्मात ब्रह्मचारी आणि संन्यासी यांनी काही ठराविक घरांतून भिक्षा मागून अन्न खावे, असे सांगितले आहे. २. ब्रह्मचर्याश्रम : गुरुकुलात रहाणारी काही मुले श्रीमंत घरांतील असतात आणि त्यांचे पालक त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकतात; पण राजा असो वा रंक प्रत्येकाने भिक्षा, म्हणजेच माधुकरी मागून पोट भरावे, असा गुरुकुलाचा नियम असल्यामुळेे … Read more

अध्यात्माचे अर्धवट ज्ञान असल्यास होणारी हानी

१९४२ या वर्षी देशाची स्थिती पहावली नाही; म्हणून साधना करणारे एकजण क्रांतीकारक बनले. ते पकडले गेल्यावर पोलिसांनी सहकाऱ्यांची नावे विचारली. तेव्हा अध्यात्माचा अर्धवट अभ्यास झाल्याने, म्हणजे ‘सत्यं ब्रूयात् (सत्य बोलावे)’ एवढेच माहित असल्याने त्यांनी सत्य सांगितले, म्हणजे त्यांच्या बरोबरच्या इतर क्रांतीकारकांची नावे सांगितली. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्या सहकाऱ्यांनाही फासावर लटकवले. त्यांनी अध्यात्माचा पूर्ण अभ्यास केला असता, … Read more