बुद्धीवाद संपल्यावर ईश्वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होणे

बुद्धीवादाच्या मर्यादा जेथे संपतात, तेथेच ईश्वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होतो. इथेच मनुष्य आध्यात्मिक विचार करू लागतो.- योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन खरा एकांत माणूस कुठेही गेला, तरी त्याला इतर कुठलेही नसेल; पण स्वतःच्या शरिराचे बंधन राहीलच; म्हणून शारीरिक आणि सांसारिक विचारांपासून मुक्त होणे, हाच खरा एकांत. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

मंत्रजपाचे महत्त्व

समजा, मनाची एकाग्रता साधली नाही, तरी पावित्र्याने कर्तव्य म्हणून मंत्रजप केल्यावर मन आपोआप स्थिर होत जाईल. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन अहंभाव, म्हणजे मीपणा. हा अहंभाव सोडला, तर माणसांच्या समूहात तुम्ही आश्चर्यकारक एकांताचा अनुभव मिळवाल. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

आत्मप्रौढी नको !

स्वतःच्या प्रगतीचा विचार करावा; पण अहंकाराची जोपासना करू नये. आत्मप्रौढीपेक्षा अधिक कोणता वेडेपणा नाही. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन कोणतीही कृती करण्यापूर्वी थोडा वेळ थांबून ती खरोखरंच हितावह आहे का ? याचा विचार करण्याची स्वतःला सवय लावावी. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

खरे दान

खरे दान सत्पात्री असावे आणि त्याची वाच्यता दुसऱ्यांजवळ होऊ नये. त्याची आठवणही क्षणार्धात विसरण्याचा प्रयत्न करावा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन श्रमाची कास धरा ! ईश्वरी शक्ती अगाध आहे. तुमच्या साधनेने तुमची दुःखे निश्चितच पळून जातील; पण त्यासाठी श्रमाची कास धरा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

मन आणि इंद्रिय यांच्या आधीन होऊ नका !

जो मन आणि इंद्रिये यांच्या आधीन नसतो, तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होय. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन दुसऱ्याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करा ! गुणग्राहकता हा सद्गुण अंगिकारून दुसऱ्याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करावा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

न्यूनगंड बाळगू नका !

आपल्या उणिवांची जाणीव ठेवून त्यांविषयी न्यूनगंड न बाळगता त्यांवर मात करण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन शिष्याने नेहमी सद्गुरूंशी एकनिष्ठ रहावे ! भाग्याने सद्गुरु लाभल्यास शिष्याने एकनिष्ठ रहावे, म्हणजे त्याच्याही नकळत त्याचा आध्यात्मिक विकास होत जाईल. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ संतांचा संकल्प आणि अस्तित्व यांमुळे होणार असणे !

आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यरत हिंदुत्ववादी कार्यकर्ते अन् नेते यांचे कार्य आणि संत करत असलेले कार्य यांत जमीन-आकाशाइतका पुढीलप्रमाणे भेद आहे. येथे लक्षात घेतले पाहिजे की, संतांमध्येही प्रकार आहेत. येथे उल्लेख केलेले संत उच्च स्तराचे आहेत. १. कार्यकर्ते : हे मन आणि स्थूल देह यांच्या स्तरांवर कार्य करतात. २. नेते : हे बुद्धीच्या स्तरावर कार्य … Read more

भारताच्या रक्तरंजित फाळणीचे काहीच न वाटणारे भारतीय कवी !

आमचे लेखन, भाषण, चिंतन, स्वप्न, शिंका, भावना असे सगळे अमेरिकन झाले आहे. अमेरिकन संस्कृतीने आमच्या देशाला अंतर्बाह्य व्यापून टाकले आहे. हिरोशिमावर आमचे कवी काव्य करतात ! हिटलरच्या क्रौर्याला आणि संहाराला लाजवणारे हत्याकांड फाळणीच्या प्रसंगी घडले. त्यावर किती काव्ये झाली ? किती नाटके झाली ? व्हिएतनाम, हिरोशिमा आम्हाला जर्जर करते. भारताच्या फाळणीचे ते भयानक प्रसंग मात्र… … Read more

प्रसिद्धीमाध्यमांनो याकडे लक्ष द्या!

एक मास जरी प्रसिद्धीमाध्यमांनी योग्य पद्धतीने विषयांना प्रसिद्धी दिली, तरी एका मासात देशाची स्थिती पालटेल ! – श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंदसरस्वती महाराज, पूर्वाम्नाय श्रीगोवर्धनमठ, पुरी पिठाधीश्वर (२१.११.२०१३)

स्वतंत्र आणि स्वातंत्र्य

 भारताला ‘स्वातंत्र्य’ मिळाले, म्हणजे नेमके काय झाले ? बाह्यतः परकियांची राजवट गेली आणि स्वकियांची राजवट आली, इतकेच स्वातंत्र्य मिळाले, याचा अर्थ जाणवतो. ‘स्वम् आत्मानं शास्ति सः स्वतन्त्रः ।’, म्हणजे ‘जो स्वत़ःचे, स्वतःच्या आशा-आकांक्षा, भाव-भावना, विकार आणि विचार इत्यादींचे नियमन करतो, तो स्वतंत्र’. येथे आत्मा याचा लौकिक अर्थ अपेक्षित आहे, अध्यात्माचा संबंध नाही. त्याचा भाव आणि … Read more