साधनेत तन, मन आणि धन यांचा त्याग करणे

साधनेत तन, मन आणि धन यांचा त्याग करणे अपेक्षित असले, तरी ते क्षमतेप्रमाणे अपेक्षित असते. एखादा आजारी असल्यास त्याने तनाने, म्हणजे शरिराने सेवा करणे अपेक्षित नसते. एखाद्याकडे धन नसल्यास त्याने धनाचा त्याग करणे अपेक्षित नसते. मनाचा त्याग करणेही मनोरुग्णाला शक्य नसते. यामुळे तन, मन आणि धन यांपैकी ज्याचा जेवढा त्याग करणे शक्य असेल, तेवढे करत … Read more

जगद्गुरु कृष्ण

कृष्णं वन्दे जगद्गुरुम् । म्हणजे जगद्गुरु कृष्णाला वंदन करतो. सर्व देवांत फक्त कृष्णालाच जगद्गुरु संबोधले आहे. याचे कारण हे की, त्याने कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग इत्यादी योगमार्ग शिकवलेले आहेत. – डॉ. आठवले (१८.७.२०१४)

स्वतःच्या आवडीचे नाम आणि गुरूंनी दिलेले नाम

भावार्थ : स्वतःच्या आवडीचे नाम घेतांना त्यात थोडा तरी अहंभाव असतो. याउलट गुरूंनी दिलेले नाम घेतांना अहंभाव तर नसतोच; पण त्या नामात चैतन्य असल्याने प्रगती लवकर होते. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्‍तराज

खरा ज्ञानी

खरा ज्ञानी निरिच्छ असतो. त्याने षड्रिपूही जिंकलेले असतात. त्याच्या प्रत्येक कृतीला कार्यकारणभाव असतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

जलद उन्नतीसाठी एकांतात राहून केलेल्या व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधना उपयुक्त !

हिमालयात एकांतात राहून आयुष्यभर साधना केली, तरी साधकातील स्वभावदोष आणि अहंभाव नष्ट झाले, याची खात्री देता येत नाही. असा साधक जेव्हा समाजात येतो, तेव्हा अनेक वर्षे प्रसंगच न घडल्याने निद्रिस्त असलेले त्याचे दोष बहुदा उफाळून येतात. याचाच अर्थ हा की, एकांतातील व्यष्टी साधनेत दोष लक्षात येत नाहीत. याउलट समष्टी साधनेत इतरांशी वारंवार संबंध येत असल्यामुळे … Read more

कुळाचाराचे पालन करा !

ईश्वरावर श्रद्धा ठेवा. घरातील वातावरण आधुनिक असले, तरी देवघर असावे. कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन मनाची एकाग्रता मनाची एकाग्रता ही अशी शक्ती आहे की, जी प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

खरे ज्ञान

माणूस जेव्हा खरे ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा त्याला कळते की, मी विश्वातील अमर्याद ज्ञानभांडारातील अत्यल्प असे ज्ञान प्राप्त केले आहे. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन आध्यात्मिक प्रगतीचे महत्त्व आध्यात्मिक प्रगती होऊ लागल्यावर माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आपोआप पालटत जातो आणि शाश्वत सुखाच्या दिशेने त्याची वाटचाल चालू होते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

अधोगतीला नेणारे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, स्वेच्छेने वागण्याचा हक्क !

शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कसेही वागायला कोणी संमती देत नाही. रस्त्यावरून गाडी कशीही चालवायला व्यक्तीस्वातंत्र्य नसते. आधुनिक वैद्य नसलेल्याला औषधे द्यायला संमती नसते. याचा अर्थ हा की, समाजातील सर्वच क्षेत्रांत व्यक्तीस्वातंत्र्याला संमती नसते. असे असतांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात स्वेच्छेने कसेही वागायला संमती मागतांना कोणाला काहीच कसे वाटत नाही ? १. स्वेच्छेने वागणे : … Read more

सद्गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवा !

परमेश्‍वराप्रमाणेच सद्गुरूंवर दृढ श्रद्धा असेल, तर सद्गुरूंच्या रूपात परमेश्‍वर दिसतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन सद्गुरूंचा शोध घेऊ नये ! खराखुरा सद्गुरु लाभणे, ही सुकृतावर आधारित गोष्ट आहे. आपल्या संचितानुसार योग्य वेळी सद्गुरूंची भेट होते. वृथा शोध घेऊ नये. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

प्रत्येक कृती परमेश्वरी कार्य म्हणून करा !

जे काम कराल, ते श्रद्धेने, सचोटीने, शुद्ध मनाने आणि परमेश्वरी कार्य म्हणून करा, म्हणजे ईश्वर आपल्यापासून फार दूर नाही. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळे समजू नका ! जो सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळा आणि दूर समजतो, तो त्यांच्यापासून पूर्ण लाभ मिळवू शकत नाही. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन