‘मनाला सातत्याने वळण लावून आत्म्याशी अनुसंधानित करण्याचे प्रयत्न करावा. प्रत्येक कृती, उदा. चालणे, बोलणे, पहाणे आत्म्याशी अनुसंधानित करावी. ‘स्वतः करतो’, अशी जाणीव असल्यास कृती करतांना थकवा येतो; मात्र अनुसंधानित कृतीमुळे थकवा येत नाही.’ – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१४)

कुठे शोधिसी रामेश्‍वर अन् कुठे शोधिसी काशी ।

अशी गीते लिहून कवींनी आणि ती वारंवार ऐकवून सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या मनात तीर्थक्षेत्रांविषयी नकारात्मक भावना निर्माण केली. त्याचे फळ म्हणजे हल्लीची हिंदूंची कमालीची दुरवस्था ! – (प.पू.) डॉ. आठवले

सनातनचे प्रत्येक क्षेत्रातील साधक<br>ती गोष्ट सात्त्विक असावी, यादृष्टीने प्रयत्न करतात !

याचे एक उदाहरण म्हणजे वास्तूविशारद वास्तू बनवतात ती आर्थिकदृष्ट्या अल्प किमतीत आणि दिसायला चांगली हवी, या दृष्टीकोनातून बनवतात. याउलट सनातनचे वास्तूविशारद वास्तू बनवतात ती आध्यात्मिकदृष्ट्या सात्त्विक कशी असेल, याचा विचार करून ! – (प.पू.) डॉ. आठवले

कोणीतरी निर्माण केल्याशिवाय काहीही आपोआप निर्माण होत नाही. असे असतांना…

कोणीतरी निर्माण केल्याशिवाय काहीही आपोआप निर्माण होत नाही. असे असतांना बुद्धीच्या निर्मात्याचा, ईश्‍वराचा शोध न घेता बुद्धीद्वारे त्याने निर्माण केलेल्या गोष्टींचा शोध घेत असतांना ईश्‍वर नाही, असे म्हणणे, ही आहे बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या बुद्धीची झेप ! – (प.पू.) डॉ. आठवले

त्याग केल्यावर ईश्‍वरप्राप्ती होते !

देशासाठी प्राण अर्पण करणार्‍या क्रांतीकारकांना कुटुंबीय विरोध करत नाहीत; पण ईश्‍वरप्राप्तीसाठी कुटुंब सोडणार्‍याला सर्वच विरोध करतात. – (प. पू.) डॉ. आठवले ‘ईश्वर, अध्यात्म नाही’ असे म्हणणे हास्यास्पद ‘एखाद्या अशिक्षिताने ‘विज्ञान नाही’, असे म्हणणे जेवढे हास्यास्पद आहे, त्याहूनही जास्त हास्यास्पद बुद्धीवाद्यांनी ‘ईश्वर, अध्यात्म नाही’, असे म्हणणे आहे !’ – (प. पू.) डॉ. आठवले

एखाद्या बाळाने आई-वडील कोण ? यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करून…

एखाद्या बाळाने आई-वडील कोण ? यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करून उत्तर मिळाले नाही की, आई-वडील नसतातच असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी देव नसतो, असे म्हणणेे हास्यास्पद आहे ! – (प.पू.) डॉ. आठवले

केवळ साधकांच्या सेवावृत्तीमुळे आणि हितचिंतकांमुळे सनातन संस्थेचे अन् हिंदू जनजागृती समितीचे कार्य चालते, हे लक्षात घ्या !

बर्‍याच जणांना वाटते सनातन संस्थेचे आणि हिंदू जनजागृती समितीचे प्रतिमास लाखो रूपये लागतील, एवढे कार्य होते कसे ? कार्य होण्यात काहीच गुपित नाही. सनातन संस्थेचे हजारो साधक सेवा म्हणून कार्य करतात. त्यातले काही जण आधुनिक वैद्य, वकील, अभियंता, संगणकतज्ञ इत्यादी आहेत. व्यवहारात असतांना त्यांना हल्लीच्या १ लाख रूपयांहूनही अधिक मासिक मिळकत होती. आता तेही सर्व … Read more

संतांचे महत्व !

सत्ताधिकार्‍यांशी असलेल्या ओळखीचा उपयोग संकटात होत नाही. खरे साहाय्य संतच करतात ! – (प.पू.) डॉ. आठवले ‘कमी संख्याबळ असूनही पांडव विजयी झाले; कारण श्रीकृष्णाने त्यांच्या मनात संकल्पयुक्त चैतन्यमयी बिजे पेरली. आपले संतही सध्या तेच कार्य करत आहेत.’ – (प.पू.) डॉ. आठवले

आज्ञापालनाचे महत्त्व !

साधना करतांना मनोलय होणे, हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. नामजप, प्रार्थना अशा भक्तीमार्गातील साधनांनी, तसेच कर्मयोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग या मार्गांनीही मनोलय होण्यास बराच काळ लागतो. याउलट आज्ञापालन करत गेल्यास मनोलय आणि बुद्धीलय होण्यास साहाय्य होते. यावरून साधकाने उत्तरदायीत्व असलेल्याचे आणि शिष्याने गुरूंच्या आज्ञेचे पालन करण्याचे महत्त्व लक्षात येते. – (प,पू.) डॉ. आठवले

अधात्म विज्ञाननिष्ठ नको तर विज्ञान अधात्मनिष्ठ हवे !

देवाला न मानणार्‍यांनो, देवाने बनवलेल्या वस्तू न वापरता तुम्ही प्राणी तर दूरचीच गोष्ट आहे; पण मातीचा एक कण तरी बनवून दाखवता का ? – (प.पू.) डॉ. आठवले अधात्म विज्ञाननिष्ठ नको तर विज्ञान अधात्मनिष्ठ हवे. – (प.पू.) डॉ. आठवले, (७.१२.२००७) ‘विज्ञान बुद्धीलय करण्याऐवजी बुद्धीचे कार्य वाढवते; म्हणजे ईश्वरापासून दूर नेते. ईश्वरप्राप्ती करून न देणार्‍या विज्ञानाची किंमत … Read more