बुद्धीवाद्यांनो, साधनेच्या संदर्भात का ? आणि कसे ? यांत अडकू नका !

साधना करू इच्छिणारे; पण बुद्धीचा वापर करणारे काही वेळा साधनेच्या संदर्भात का ? कसे ?, असे प्रश्‍न विचारतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, का ? कसे ?, असे प्रश्‍न न विचारणारे साधनेत त्यांच्या पुढे जातात. पुढे त्यांचा बुद्धीलय झाल्यावर त्यांना सर्व प्रश्‍नांची उत्तरे आतूनच समजतात. यावरून हे लक्षात येते की, कार्यकारणभाव ज्ञात नसला, तरी … Read more

मुले मोठेपणी चांगली व्हावीत, यासाठी त्यांच्यावर लहानपणीच साधनेचे संस्कार करा !

आजार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे (Prevention is Better Than Cure), अशा अर्थाची एक म्हण आहे. ती नुसतीच सांगण्याऐवजी मोठेपणी दुर्गुण असू नये, यासाठी लहानपणापासूनच सात्त्विक संस्कार करणे आवश्यक आहे. मुलांना लहानपणी कचरा करू नकोस, खोटे बोलू नकोस, कोणाला मारू नकोस, असे मानसिक स्तरावरचे शिकवण्याच्या जोडीला त्याच्याकडून आध्यात्मिक स्तरावरील … Read more

बुद्धीप्रामाण्यवादी आणि सनातन संस्था यांच्या कार्यपद्धतीतील भेद

बुद्धीप्रामाण्यवादी धर्माचा काहीएक अभ्यास न करता धर्मातील अनेक गोष्टी खोट्या आहेत, असेे सांगतात. त्यामुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा उडते आणि ते नास्तिक होतात. याउलट सनातन संस्था त्या गोष्टींमागचे अध्यात्मशास्त्र सांगते. त्यामुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा वाढते आणि ते साधक होतात. – (प. पू.) डॉ. आठवले

शंकराचार्य आणि संत यांचे कार्य

विविध पिठांचे शंकराचार्य ज्ञानमार्गी असतात, तर संत भक्तीमार्गी असतात. भक्तीमार्ग सुलभ असल्यामुळे भक्तीमार्गी संतांकडे हजारो मार्गदर्शनासाठी येतात, तर ज्ञानमार्ग कठीण असल्यामुळे शंकराचार्यांकडे थोडेच जण जातात. असे जरी असले, तरी धर्मासंदर्भात काही प्रश्‍न असल्यास ते शंकराचार्य त्यांच्या ज्ञानामुळे सोडवू शकतात. – (प. पू.) डॉ. आठवले

विज्ञानाचा खरा लाभ करून न घेतल्याने झपाट्याने पराकोटीच्या अधोगतीला गेलेला मानव

विज्ञानामुळे मानवाला यंत्रे, सोयी इत्यादी उपलब्ध करून दिल्यामुळे मानवाचा दैनंदिन कामातील बराच वेळ वाचला; पण त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा, हे विज्ञानाने न शिकवल्यामुळे मानव सुखलोलुप झाला आणि झपाट्याने पराकोटीच्या अधोगतीला गेला ! त्याने रिकामे मन, भुताचे घर !, ही म्हण सार्थ केली आहे. तो ईश्‍वरापासून दूर गेला आहे. त्याने रिकामा वेळ साधनेसाठी वापरला असता, … Read more

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनी स्वेच्छेऐवजी परेच्छेला प्राधान्य न दिल्याने त्यांची आणि त्यांच्या विचारसरणीप्रमाणे वागणार्‍यांची अतिशय हानी होणे

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांची विचारसरणी असते, मला वाटते तेच बरोबर. मी तसेच करणार. यामुळे ते स्वेच्छेतच अडकतात. त्यांचा साधकांप्रमाणे स्वेच्छेऐवजी परेच्छेला प्राधान्य देणे आणि शेवटी ईश्‍वरेच्छेने वागणे, असा ईश्‍वराच्या दिशेने प्रवास न होता, ते स्वैराचारी हाेतात; म्हणून दिवसाही बलात्कार, भ्रष्टाचार, गुंडगिरी इत्यादी अनेक गुन्हे घडतात. – (प. पू.) डॉ. आठवले

मुसलमान मक्केला आणि हिंदू साधू-संत कुंभमेळ्याला एकत्र येण्यातील भेद

मुसलमान मक्केला एकत्र येऊन जगातील सर्व मुसलमानांशी मैत्री करतात आणि पुढचे धोरण ठरवतात. याउलट अनेक हिंदू साधू-संतांत कुंभमेळ्याला एकत्र आल्यावर मोठेपणा मिरवायची चढाओढ असते ! – (प.पू.) डॉ. आठवले (२५.१२.२०१४) साधू-संतांपैकी फक्त २० टक्केच खरे साधू-संत असतात ! – (प.पू.) डॉ. आठवले (२५.१२.२०१४)

आत्मज्ञान

जे अज्ञात आहे, म्हणजे सध्या ज्ञात नाही, आठवत नाही, असे आत्मज्ञान सत्संग, सेवा यांद्वारे तात्पुरते आवरण निघाल्यामुळे (तात्पुरते) प्राप्त झाल्यासारखे वाटते. हे आवरण कायमस्वरूपी काढण्याचा प्रयत्न येथे (आश्रमात) चालू आहे, उदा. संगणकाच्या हार्ड-डिस्कमध्ये माहिती आहे; मात्र ती त्याविषयी माहिती नसणार्‍याला अज्ञात आहे. जेव्हा आपण योग्य कळ दाबतो, आज्ञा देतो, तेव्हा ती प्रकट होते, दृश्य स्वरूपात … Read more

साधना म्हणून राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य केल्यास ईश्‍वर स्वतःहून साहाय्य करतो !

व्यवहारात कोणाचे साहाय्य हवे असल्यास त्यांना कार्याविषयी बरीच माहिती सांगावी लागते किंवा कोणाच्या तरी ओळखीने त्यांना भेटलो, तरच ते साहाय्य करण्याचा विचार करतात. याउलट संतांकडे गेल्यावर त्यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती ही नावे सांगितली, तरी साधकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या साधनेमुळे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या ध्येयामुळे ते पुरेसे असते. खरे म्हटले, तर संतांना काहीच … Read more

हस्तसामुद्रिकांना भोंदू म्हणणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, बुद्धीने एवढे तरी समजून घ्या !

मनाचा शरिरावर आणि शरिराचा मनावर परिणाम होतो; म्हणूनच मनाच्या काळजीने आम्लपित्त, रक्तदाब इत्यादी शारीरिक विकार होतात आणि शारीरिक विकारामुळे मनाला निराशा येणे इत्यादी विकार होतात. मनाचा शरिरावर परिणाम होत असल्यामुळे परिणाम होणार्‍या इतर अवयवांप्रमाणे हात आणि पाय यांच्यावरही परिणाम होऊन त्यांवरील रेषांतही पालट होतात. ते पालट केवळ या जन्मातील घटनांच्या संदर्भातील नसून जन्मोजन्मी तेच मन … Read more