क्रूरतेचा इतिहास नसलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे हिंदु धर्म !

धर्म एकच आहे आणि तो म्हणजे हिंदु धर्म. इतर सर्व पंथ आहेत. हिंदु धर्म सोडून इतर धर्मांचा (पंथांचा) इतिहास पाहिला, तर त्यात विविध काळांत केलेल्या लाखो हत्यांचा, क्रूरतेचा, बलात्कारांचा, जिंकलेल्या प्रदेशातील स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून विकण्याच्या हजारो नोंदी आहेत. फक्त अनादी काळापासून अस्तित्वात असलेल्या हिंदु धर्माच्या इतिहासात असे एकही उदाहरण नाही. – (प.पू.) डॉ. आठवले

मायेपासून दूर जाणे एक वेळ सुलभ आहे; पणमायेतील ब्रह्माची अनुभूती घेणे संतांनाही अती कठीणअसल्याने भगवंताला अवतार घ्यावा लागतो !

साधना करून कुंडलिनीला मूलाधारचक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत नेणे, म्हणजेच सगुणातून निर्गुणाकडे जाणे एक वेळ सुलभ आहे; पण सगुणातील राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी ब्रह्मरंध्रापासून परत मूलाधारचक्रापर्यंत येणे बहुतेक संतांनाही अती कठीण जाते. ज्या सगुणाला सोडून निर्गुणाकडे जाण्यासाठी त्यांनी साधना केली, त्या सगुणाकडे पुन्हा जाण्यास ते तयार नसतात आणि म्हणूनच भगवंताला अवतार घ्यावा लागतो. हे व्यष्टी साधना … Read more

विज्ञानाची अपूर्णता आणि अध्यात्माची पूर्णता

मायेत पुढे पुढे अनेक शोध लागत जातात; कारण माया अनंत आहे आणि विज्ञान अपूर्ण आहे. याउलट अध्यात्मात नवीन शोध लागत नाहीत; कारण ईश्‍वर एक आहे आणि ईश्‍वरप्राप्तीचे सर्व मार्ग परिपूर्ण असल्याने काही शोध लावायचे बाकी नाही. – (प.पू) डॉ. आठवले

जीवन म्हणजे थोड्या काळासाठी एकत्र येणे आणि नंतर कायमचे दूर जाणे !

१. मुलगा जन्माला आल्यापासून नोकरी लागेपर्यंत जवळ रहातो; पण नंतर नोकरीच्या गावी जातो. २. मुलगी जन्माला आल्यावर लग्न होईपर्यंत जवळ रहाते; पण नंतर सासरी जाते. ३. नोकरी करतांना सहकार्‍यांबरोबर काही वर्षे असतात; पण नंतर सेवानिवृत्त झाल्यावर कोणाशीच भेट होत नाही. ४. पती-पत्नी काही वर्षे एकत्र; पण नंतर एक आधी मृत्यू पावतो. तात्पर्य, जीवन म्हणजे थोड्या … Read more

वाईट शक्तींचा त्रास दूर करणे आणि सत्त्वगुण वाढवणे, या दोन्हींसाठी नामजप उपयोगी

काही जणांना वाटते, वाईट शक्तींचा त्रास नसला, तर नामजप करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, स्वभावदोष रज-तम गुणांमुळे निर्माण होतात. नामजपामुळे सत्त्वगुण वाढतो. तो वाढला की, रज-तम गुण अल्प होऊ लागतात, म्हणजेच साधनेत प्रगती होऊ लागते. याचा अर्थ हा की, वाईट शक्तींचा त्रास दूर करणे आणि सत्त्वगुण वाढवणे, या दोन्हींसाठी नामजप उपयोगी … Read more

५० टक्के आणि त्यापुढील पातळीनुसार पुढील जन्म पृथ्वीवर होण्याचा कार्यकारणभाव

१. ५० ते ६९ टक्के पातळी : हे साधक पुढील साधनेसाठी स्वेच्छेने पृथ्वीवर जन्म घेतात. २. ७० ते ८९ टक्के पातळी : या संतांना ईश्‍वरेच्छा ज्ञात असल्याने ते ईश्‍वरेच्छेने ईश्‍वरी कार्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतात. ३. ९० ते १०० टक्के पातळी : हे संत ईश्‍वराशी एकरूप होत असल्यामुळे त्यांच्या इच्छेत आणि ईश्‍वराच्या इच्छेत भेद नसतो. बहुधा … Read more

बुद्धीवाद्यांनो, साधनेच्या संदर्भात का ? आणि कसे ? यांत अडकू नका !

साधना करू इच्छिणारे; पण बुद्धीचा वापर करणारे काही वेळा साधनेच्या संदर्भात का ? कसे ?, असे प्रश्‍न विचारतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, का ? कसे ?, असे प्रश्‍न न विचारणारे साधनेत त्यांच्या पुढे जातात. पुढे त्यांचा बुद्धीलय झाल्यावर त्यांना सर्व प्रश्‍नांची उत्तरे आतूनच समजतात. यावरून हे लक्षात येते की, कार्यकारणभाव ज्ञात नसला, तरी … Read more

मुले मोठेपणी चांगली व्हावीत, यासाठी त्यांच्यावर लहानपणीच साधनेचे संस्कार करा !

आजार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे (Prevention is Better Than Cure), अशा अर्थाची एक म्हण आहे. ती नुसतीच सांगण्याऐवजी मोठेपणी दुर्गुण असू नये, यासाठी लहानपणापासूनच सात्त्विक संस्कार करणे आवश्यक आहे. मुलांना लहानपणी कचरा करू नकोस, खोटे बोलू नकोस, कोणाला मारू नकोस, असे मानसिक स्तरावरचे शिकवण्याच्या जोडीला त्याच्याकडून आध्यात्मिक स्तरावरील … Read more

बुद्धीप्रामाण्यवादी आणि सनातन संस्था यांच्या कार्यपद्धतीतील भेद

बुद्धीप्रामाण्यवादी धर्माचा काहीएक अभ्यास न करता धर्मातील अनेक गोष्टी खोट्या आहेत, असेे सांगतात. त्यामुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा उडते आणि ते नास्तिक होतात. याउलट सनातन संस्था त्या गोष्टींमागचे अध्यात्मशास्त्र सांगते. त्यामुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा वाढते आणि ते साधक होतात. – (प. पू.) डॉ. आठवले

शंकराचार्य आणि संत यांचे कार्य

विविध पिठांचे शंकराचार्य ज्ञानमार्गी असतात, तर संत भक्तीमार्गी असतात. भक्तीमार्ग सुलभ असल्यामुळे भक्तीमार्गी संतांकडे हजारो मार्गदर्शनासाठी येतात, तर ज्ञानमार्ग कठीण असल्यामुळे शंकराचार्यांकडे थोडेच जण जातात. असे जरी असले, तरी धर्मासंदर्भात काही प्रश्‍न असल्यास ते शंकराचार्य त्यांच्या ज्ञानामुळे सोडवू शकतात. – (प. पू.) डॉ. आठवले