विदेशात वस्तूंची निर्यात करायची असली, तर इतर देशांतील अनुभवी निर्यातदार…

विदेशात वस्तूंची निर्यात करायची असली, तर इतर देशांतील अनुभवी निर्यातदार विविध देशांचा दौरा करतात. याउलट भारताचे मंत्री विदेशांत भटकायचे संधी साधतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सांप्रदायिक साधनेमुळे अहंभाव निर्माण होऊ शकण्याचे कारण

एखादा ध्यानमार्गाने साधना करणारा असल्यास त्याला काही तास ध्यान लावू शकणार्‍याची साधना चांगली आहे, असे वाटते. एखाद्याचा भाव जागृत होत असला, तरी त्याला तो कनिष्ठच वाटतो. असे होऊ नये म्हणून कोणाचा आध्यात्मिक स्तर किती आहे, हे कळण्यासाठी विविध योगमार्गांचा थोडातरी अभ्यास असणे आणि सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. – डॉ. आठवले

देवाकडे काही मागणे किंवा न मागणे

१. देवाकडे काही मागणे : आपली पात्रता असल्याशिवाय देव काही देत नाही. असे असतांना देवाला प्रार्थना कशाला करायची ?, असे काही जणांना वाटते. याचे उत्तर असे की, प्रार्थनेमुळे नम्रता निर्माण होण्यास साहाय्य होते. प्रार्थनेच्या जोडीला इतर साधना केल्यास पात्रता निर्माण होते. मग देव पाहिजे ते देतो. २. देवाकडे काही न मागणे : पात्रता असलेले देवाकडे … Read more

हिंदु धर्माप्रमाणे साधना करणार्‍यांची प्रगती जलद होण्याचे एक कारण

प्रत्येकाचा धनप्राप्तीचा मार्ग निरनिराळा असतो, तसा ईश्‍वरप्राप्तीचा मार्गही निरनिराळा असतो. हे वैशिष्ट्य फक्त हिंदु धर्मातच आहे; म्हणून हिंदु धर्माप्रमाणे साधना करणार्‍यांची प्रगती जलद होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांनो, चारही वर्णांनुसार साधना करता येत नाही; म्हणून दुःख करू नका !

धर्मरक्षणाचे वर्णानुसार (जातीनुसार नव्हे !) पुढील चार प्रकार आहेत. वर्ण साधना श्रीकृष्णाने सर्वांसमोर ठेवलेल्या चारही वर्णांनुसारच्या साधनेची उदाहरणे १. ब्राह्मण अध्यात्माचे अध्ययन आणि अध्यापन गुरुगृही शिक्षण घेणे २. क्षत्रिय धर्मरक्षण अनेक दुर्जनांचा नाश करणे ३. वैश्य धर्मासाठी धनाचे अर्पण सुदाम्याचे दारिद्य्र दूर करणे ४. शूद्र धर्मसेवेसाठी शरीर अर्पण पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या वेळी उष्ट्या पत्रावळी उचलणे … Read more

हिंदूंनो, जात, पक्ष, संप्रदाय, प्रांत, भाषा आदी विसरून हिंदू म्हणून एक व्हा !

१. हिंदूंच्या सर्वसमावेशक ऐक्याची आवश्यकता : भारतात आज हिंदू बहुसंख्य आहेत; पण हिंदूंचे हे सामर्थ्य जात, पक्ष, संप्रदाय, प्रांत, भाषा आदी विविध घटकांमध्ये विभागले गेले आहे. हिंदूंच्या संघशक्तीच्या र्‍हासामुळेच अन्य धर्मीय अल्पसंख्यांक असूनही हिंदु धर्म आणि समाज यांवर विविध प्रकारे (उदा. लव्ह जिहाद, धार्मिक दंगली, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या, धर्मांतर आदी) अत्याचार करतात, तसेच शासनाकडूनही हिंदूंना दुय्यम … Read more

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, म्हणजेच स्वेच्छा. याउलट साधनेत स्वेच्छा नष्ट करून…

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, म्हणजेच स्वेच्छा. याउलट साधनेत स्वेच्छा नष्ट करून प्रथम परेच्छेने आणि पुढे ईश्‍वरेच्छेने वागून मायेच्या बंधनात न रहाता खरे स्वातंत्र्य उपभोगता येते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले शिकवण्यापेक्षा शिकण्यात अधिक ज्ञान मिळाल्याचा आनंद असतो, तसेच शिकवतांना अहं वाढू शकतो, तर शिकतांना न्यून होत असल्यामुळेही आनंद मिळतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे जातीवरून आरक्षण मागतांना केवळ स्वतःचाच स्वार्थ साधू इच्छिणारे, तर कुठे आत्मकल्याणासाठी (ईश्‍वरप्राप्तीसाठी) सर्वस्वाचा त्याग करायला शिकवणारा हिंदु धर्म !

१. जातीवरून आरक्षण मागणारे : हे केवळ स्वतःचाच विचार करणारे, स्वार्थी असतात. ते केवळ स्वतःच्या जातीचा विचार करतात. समाजातील इतर जाती आणि राष्ट्र अन् धर्म यांचे त्यांना सोयर-सुतक नसते. त्यामुळे साहजिकच ते ईश्‍वरापासून दूर असतात. २. आत्मकल्याणासाठी (ईश्‍वरप्राप्तीसाठी) सर्वस्वाचा त्याग करायला शिकवणारा हिंदु धर्म : दुर्योधन हा कौरवकुळाच्या विनाशाला कारण ठरणार आहे, हे ऋषीमुनींना ठाऊक … Read more

तन, मन आणि धन यांच्या त्यागांपैकी धनाचा त्याग करणे सर्वांत कमी कष्टदायक !

याचे कारण हे की, त्यात आपल्याकडचे पैसे किंवा कागदावर सही करून ते कागद द्यायचे असतात. याला विशेष श्रम करावे लागत नाहीत. याउलट तनाचा त्याग करण्यासाठी वर्षानुवर्षे सेवा करावी लागते आणि मनाचा त्याग करण्यासाठी नामजप करणे, तसेच स्वभावदोष निर्मूलनासाठीच्या स्वयंसूचना देणे, हेही वर्षानुवर्षे करावे लागते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आग लागू नये याची काळजी न घेता आग सर्वत्र लागल्यावर…

आग लागू नये याची काळजी न घेता आग सर्वत्र लागल्यावर पाणी शिंपडणे जसे मूर्खपणाचे आहे, तसेच साधना न शिकवता विविध माध्यमांतून भ्रष्टाचार, गुंडगिरी, अनैतिकता इत्यादी पसरू द्यायचे आणि नंतर काहीतरी केले, असे दाखवायचे, ही आहे विविध राज्यकर्त्या पक्षांची कार्यपद्धत ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले