गुरु आणि ईश्‍वर

यांच्या संदर्भात बोलतांना बरेच जण पुढील ओळी सांगतात. गुरु थोर की देव थोर म्हणावा नमस्कार आधी कुणासी करावा । मनी चिंतिता सद्गुरु थोर वाटे तयाचे प्रसादे रघुनाथ भेटे ॥ (पाठभेद – गुरु थोर कि देव थोर म्हणावा नमस्कार आधी कोणा करावा । मना माझीया गुरु थोर वाटे जयाच्या कृपाप्रसादे रघुराज भेटे ॥ ) त्यांनी हे … Read more

तंत्रशास्त्राची वैशिष्टे

१. तंत्रशास्त्र शक्तीशी संबंधित आहे. त्याच्या पुढे भाव, चैतन्य, आनंद आणि शांती असे स्तर आहेत. २. तंत्रशास्त्राप्रमाणे कृती करतांना बहुदा स्थुलातील वस्तू लागतात, तर भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या अनुभूतीसाठी स्थुलातील वस्तू लागत नाहीत. ३. व्यवहारातील अडचणी सोडवण्यासाठी तंत्रशास्त्र उपयुक्त आहे. – डॉ. आठवले (१४.४.२०१४)

स्वभावदोष आणि अहं यांच्या त्यागाचे महत्त्व

साधनेत केवळ तन, मन आणि धन यांचा त्याग पुरेसा नाही. अहंचा त्याग महत्त्वाचा असतो. अहंचा त्याग करणे अत्यंत कठीण असल्यामुळे सुरूवातीला तन, मन आणि धन यांचा त्याग करण्यास सांगितले जाते. त्यांचा त्याग केला, तरी मी त्याग केला, असा अहं रहातो. त्याचबरोबर काही स्वभावदोषही रहातात. यासाठी साधनेत तन, मन आणि धन यांच्या त्यागापेक्षा स्वभावदोष आणि अहं … Read more

नामजप लिहून खिशात ठेवा

प्रसारात असलेल्या साधकांना बर्‍याचदा नामजप करण्यास वेळ मिळत नाही. अशा वेळी त्यांनी नामजप लिहिलेला कागद खिशात आणि साधिकांनी पर्समध्ये ठेवावा. – डॉ. आठवले (२१.२.२०१४)

देवघरातील प्रत्येक देवतेला निराळा नमस्कार करा !

घरी एखाद्याने पूजा केली की, घरातील इतर देवघरापुढे उभे राहून सर्व देवांना मिळून एक नमस्कार करतात. याऐवजी त्यांनी प्रत्येक देवतेच्या चित्राकडे किंवा मूर्तीकडे पाहून तिला तिचे नाव घेऊन नमस्कार केल्यास नमस्काराचा, साधनेचा अवधी थोडा वाढतो, तसेच त्यामुळे प्रत्येक देवतेबद्दल प्रेम निर्माण व्हायला लागते. – डॉ. आठवले (२१.३.२०१४)

भाव असला, तरी अहंभाव असू शकतो !

हल्लीच एकजण भेटायला आले होते. त्यांच्या चेहर्‍यावर भाव दिसत होता आणि त्यांच्या डोळ्यांत भावाश्रूही होते. ते बोलतांना त्यांची साधना, त्यांचे कार्य, त्यांना आलेल्या अनुभूती इत्यादींविषयी ते बोलायला लागल्यावर त्यांच्यात अहं असल्याचे जाणवले. नंतर हे लक्षात आले की, एखाद्यात भाव असला, तरी अहंभावही असू शकतो ! हे आयुष्यात पाहिलेले पहिलेच उदाहरण आहे. – प.पू. डॉ. जयंत … Read more

भक्तांना आरसे महाल अनावश्यक !

पूर्वीच्या काळी राजवाड्यात आरसे महाल असत. महालात व्यक्ती कुठेही असली, तरी ती दिसते. त्यामुळे ती सर्वत्र आहे, असे दिसायचे. भक्तांना आरसे महाल तयार करावा लागत नाही; कारण त्यांना देव केवळ सर्वत्रच नाही, तर स्वतःमध्येही दिसतो. – डॉ. आठवले (२८.१०.२०१३)

प्रार्थनेचे टप्पे

१. अहं न्यून करण्यासाठी प्रार्थना आवश्यक असते. प्रार्थना करतांना काहीतरी स्वेच्छा असते. अगदी विश्‍वासाठी प्रार्थना केली, तरी तिच्यात स्वेच्छा असते. २. पुढे ईश्‍वरेच्छेवर सगळे सोडल्यावर प्रार्थनेऐवजी मनाला निर्विचार स्थिती आणि शांती अनुभवता येते. – डॉ. आठवले (आषाढ कृष्ण पक्ष ११, कलियुग वर्ष ५११५ (२.८.२०१३))

कर्तेपण श्रीकृष्णाला अर्पण करणे आवश्यक !

श्रीकृष्ण माझ्या रूपात अनुभूती देतो. साधकांना वाटते, प.पू. डॉक्टरांमुळे अनुभूती आल्या. यातून शिकण्यासारखे हे की, श्रीकृष्णाने अनुभूती दिल्या, तरी तो कर्तेपण मला देतो. साधकांनीही हे लक्षात ठेवून प्रत्येक कृतीचे कर्तेपण श्रीकृष्णाला अर्पण केले पाहिजे. – डॉ. आठवले (वैशाख शुक्ल पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११५ (२२.५.२०१३))