विज्ञानाची किंमत शून्य आहे !

ज्या विज्ञानाला ईश्‍वर म्हणजे काय ?, याची तोंडओळखही नाही, ते कधी ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवू शकेल का ? नाही. त्यामुळेच विज्ञानाची किंमत शून्य आहे ! – डॉ. आठवले (आषाढ शुक्ल पक्ष १३/१४, कलियुग वर्ष ५११५ (२१.७.२०१३))

देव हवा असेल, तर साधनाच करावी लागते !

आपल्याला व्यवहारातील काही हवे असेल, तर आपण प्रार्थना करतो. आपल्याला देव हवा असेल, तर प्रार्थना करून भागत नाही, तर साधनाच करावी लागते ! – डॉ. आठवले (७.५.२०१४)

आवश्यक त्या मार्गानुसार उन्नतांंनी साधना सांगणे

एका साधूकडे एक जिज्ञासू तरुण गेला आणि त्याने त्याला विचारले ‘महाराज, मुक्ती मिळवण्यासाठी वनात जायला हवे का ?’ साधू म्हणाला, ‘असे कोण म्हणतो ? तसे असते, तर जनकराजाला राजवैभवात राहूनही जी मुक्ती मिळाली, ती मिळाली असती का ?’ साधूचे हे उत्तर ऐकून तो जिज्ञासू तरुण निघून गेला. थोड्याच वेळात दुसरा एक जिज्ञासू त्या साधूकडे आला. … Read more

संतांचे महत्व!

रोग बरा करणार्‍या आधुनिक वैद्यांपेक्षा भवरोगातून, जन्म-मृत्यूतून मुक्त करणारे संत महत्त्वाचे ! – डॉ. आठवले (११.५.२०१४)

खरी समाजसेवा, म्हणजे समाजाला साधना शिकवणे !

काही जण समाजसेवा करतात. आत्मकेंद्रित, स्वार्थी व्यक्तींपेक्षा समाजसेवा करणारे निश्‍चितच उच्च स्तराचे होत; कारण ते स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत नाहीत. असे असले, तरी साधकांनी समाजसेवेत अडकू नये; कारण समाजसेवा करणे हेही सात्त्विक मायेत येते. साधकांना याच्याही, म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे जायचे असल्याने त्यांनी समाजासाठी काही करावे, असे वाटत असले, तर समाजाला साधना शिकवावी. त्याच्याकडून साधना करवून … Read more

ऋषींचे अध्यात्मिक महत्व!

ऋषींनी सगुण-निर्गुण, पंचमहाभूते, कालमाहात्म्य, कर्मफलन्याय, पुनर्जन्म इत्यादींविषयी सांगितले नसते, तर अध्यात्म कधी शब्दांत मांडता आले असते का ? – डॉ. आठवले (७.५.२०१४)

देवळे आणि व्यासपीठ येथे चपला न वापरण्याची कारणे

१. देऊळ आणि तीर्थक्षेत्र अशा चैतन्यमय जागी चपला वापरल्या, तर पावलांतून चैतन्य ग्रहण होत नाही. २. व्यासपीठ व्यासपिठाला व्यासपीठ म्हणतात; कारण त्यावर खरा अधिकार महर्षी व्यासांचाच आहे. ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।’ म्हणजे या जगातील अध्यात्मविषयक सर्व ज्ञान हे महर्षि व्यासांचे उच्छिष्ट (उष्टे) आहे, अशी लोकोक्ती रूढ झाली आहे. आपण तेथे जातो, तेव्हा त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून … Read more

कलियुगातील आध्यात्मिक गुरू !

हे कलियुग आहे. हे दांभिकपणा आणि ढोंगीपणा यांचे युग आहे. आजच्या युगातले काही स्वामी जे शिकवितात, ते स्वतः ते आचरणात आणत असतीलच असे नाही. काही आध्यात्मिक गुरु लबाड असू शकतात. याचा असा अर्थ नाही की, आध्यात्मिक गुरु प्रामाणिक असूच शकत नाहीत. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (वाङ्मय पत्रिका घनगर्जित, वर्ष दुसरे, अंक ११)

दया म्हणजे दुसऱ्याच्या जीवनाचे मूल्य समजणे

आपल्या आतील परमात्म्याला पहाणे हे ज्ञान आहे. दुसऱ्यांमध्ये परमात्मा आहे हे न विसरणे, म्हणजे करुणा, दया. घराचा आश्रम किंवा आश्रमाचे घर होणे घरात राहूनही तुम्ही कोणाला उद्विग्न करत नसाल, तर तुमचे घर आश्रमच आहे. वाल्मीकींच्या आश्रमात जाऊनही तुमचे मन उद्विग्न होत असेल, तर तुम्ही वाल्मीकींना ओळखले नाही. – डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

पू. अप्पाकाका यांचे चिंतन !

निंदा-स्तुती दुसर्‍याचा स्वभाव आणि त्याची कर्मे यांची निंदा करू नये. जो सर्व भूतांमध्ये परमेश्‍वर पहातो, तो कोणाचीही निंदा करूच शकत नाही. जेथून आपल्याला अपाय, धोका होण्याचा संभव वाटतो, तेथे भगवत्भाव ठेवावा, म्हणजे अपाय, धोका घालवण्याचा तो उपाय होऊन जातो. – (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९८०)