संतांच्या कार्य करण्याच्या पद्धती

काही संत त्यांच्या गुरूंकडून आदेश आल्यावर त्याप्रमाणे कार्य करतात, तर काही संत कार्यासंदर्भात काही प्रश्‍न असल्यास ते गुरूंना सूक्ष्मातून विचारून लगेच उत्तर मिळवतात आणि त्याप्रमाणे कार्य करतात. त्यामुळे त्यांना कार्य लगेच करता येते. – डॉ. आठवले (१८.५.२०१४)

मनापासून विषयांचा त्याग केल्यासच प्रगती होणे

एकदा संत तुकारामांनी आपल्या पत्नीस बराच वैराग्यपर उपदेश केला आणि विषय कसे वाईट आहेत, हे पटवून दिले अन् विठोबाचे नामस्मरण करण्यास सांगितले. उपदेश ऐकून तिच्या मनात वैराग्य आले. दुसऱ्या दिवशी तिने स्नान करून देवपूजा केली आणि ब्राह्मणांस बोलावून सर्व घर लुटवले. घरात काही एक ठेवले नाही. दुपारच्या वेळी घरात अन्न नाही, असे पाहून ती विचारात … Read more

गुरुपादुकांचे मूल्य प्राणापेक्षाही अधिक असणे

एका भक्ताला गुरूंचे दर्शन झाले नाही. दुसरा भक्त गुरूंना भेटला, तेव्हा गुरूंनी त्याच्या पुत्राच्या विवाहानिमित्त त्याला पादुका दिल्या. त्याने हे पहिल्या भक्ताला सांगितल्यावर तो म्हणाला, ‘मला गुरूंच्या पादुका दे, मी तुला माझी जीवनभराची मिळकत देतो.’ दुसऱ्या भक्ताने त्याला पादुका दिल्या. पहिल्या भक्ताने पादुका हृदयाला लावल्या आणि तो नाचू लागला. गुरूंना हे समजल्यावर त्यांनी पहिल्या भक्ताला … Read more

धर्मशिक्षणाची अत्यावश्यकता !

ख्रिस्ती प्रसारक हिंदूंच्या मनात ख्रिस्ती पंथासंदर्भात श्रद्धा निर्माण करू शकतात, तर जन्महिंदूंच्या मनातही हिंदूंना श्रद्धा निर्माण करता येत नाही; कारण ते धर्मशिक्षण देत नाहीत. – डॉ. आठवले (१५.५.२०१४)

विज्ञानाच्या निकषावर सर्व पडताळून पहाण्यास सांगणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, या प्रश्‍नाचे उत्तर द्या !

बुद्धीप्रामाण्यवादी प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या निकषावर पडताळून पहाण्यास सांगतात. त्यांना स्वप्न पडताळून पहाण्यास सांगितले, तर ते काय सिद्ध करून दाखवतील ? साध्या स्वप्नाचे विज्ञानाच्या दृष्टीने विश्‍लेषण करता न येणारे बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अनुभूतींचे काय विश्‍लेषण करणार ? – डॉ. आठवले (२१.१.२०१४)

दया

१. व्याख्या परे वा बन्धुवर्गे वा मित्रे द्वेष्टरि वा तथा । आपन्ने रक्षितव्यं तु दयैषा परिकीर्तिता ॥ – अत्रिसंहिता अर्थ : आपले भाऊबंध किंवा ओळख नसलेले, मित्र किंवा शत्रू किंवा आपला मत्सर किंवा द्वेष करणाऱ्यांवर आपत्ती आल्यास त्यांचे रक्षण करून त्यांना संकट आणि दुःख यांपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या मनोवृत्तीला ‘दया’ म्हणतात. भेद न करणे … Read more

लक्ष्मी अणि सरस्वती एकत्र नांदू शकत नाहीत, असे का म्हटले जाते ?

लक्ष्मी ही संपत्ती आणि ऐश्वर्य यांची देवता आहे, तर सरस्वती ही विद्येची देवता आहे. आत्मज्ञान येण्यासाठी भौतिक सुखाचे वैराग्य येणे आवश्यक आहे. व्यक्तीकडे जेवढी जास्त संपत्ती आणि भौतिक सुखे असतील, तेवढी त्याला आसक्ती जास्त असते. जेवढी आसक्ती जास्त तेवढी आत्मज्ञान मिळण्याची शक्यता अल्प असते. येशू ख्रिस्ताने म्हटले आहे, ‘सुईच्या छिद्रातून उंट जाऊ शकेल; पण धनाढ्य … Read more

देव, मानव आणि राक्षस यांना भगवंताने सांगितलेली साधना

एकदा देव, मानव आणि राक्षस भगवंताकडे गेले आणि त्यांनी विचारले, ‘आम्ही कोणती साधना करावी की, ज्यामुळे आमचे कल्याण होईल ?’ भगवंताने सर्वांना ‘द’ हा मंत्र दिला. त्याचा अर्थ त्यांना कळेना. तेव्हा भगवान म्हणाला, ‘देवांनी ‘द’ म्हणजे ‘दमन’ म्हणजे इंद्रियनिग्रह करावा; कारण ते सतत उच्च लोकांतील सुखोपभोगात रममाण असतात. मानवांनी ‘द’ म्हणजे ‘दान’ करावे; कारण मानव … Read more

अपसमज होण्याची कारणे

१. आपल्यावर आलेले दुःख किंवा संकट यांचे आपण कारण नसून दोष दुसऱ्या व्यक्तीचा, समाजाचा, दैवाचा आहे, असे समजणे २. मी कोणाचाही गुलाम नाही, अशा अपसमजुतीत सतत दुसऱ्याची गुलामगिरी पत्करणे ३. आपल्या अंगावर यायला नको; म्हणून नेहमी संदिग्ध भाषेत बोलणे ४. आपण कोणाचेही वाईट केले नाही; म्हणून माझे कोणी वाईट करणार नाही, असे समजणे ५. माझे … Read more

देहासक्ती नको !

देह सांडावा ना मांडावा । येणे परमार्थचि साधावा ॥ सांडोनिया देहाभिमान । ब्रह्मसमाधान पावले ॥ – एकनाथी भागवत २०.१४७ अर्थ : देह सोडून देऊ नये आणि त्याचे लाडही करू नयेत. देहाभिमान सोडून साधना करून परमार्थ साधावा. त्याने ब्रह्मरूप झाल्याचे समाधान मिळते. एकनाथ महाराजांनी याचे एक उदाहरण दिले आहे. पक्षी वृक्षावर घरटे करून रहातो. निर्दय मनुष्य … Read more